19/06/2026
छत्तीसगड लोकसेवा आयोगात राज्यात प्रथम क्रमांक; "पियुष हेरोडे" यांची राजपत्रित अधिकारीपदी दमदार निवड..
Clinical Psychologist (चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ) पदावर निवड - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागात राज्यस्तरीय Open Category मधून अव्वल यश
छत्तीसगड लोकसेवा आयोग (CGPSC) मार्फत घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत पियुष महादेवराव हेरोडे यांनी उल्लेखनीय यश संपादन करत "Clinical Psychologist (चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ)" या राजपत्रित गट 'अ' पदासाठी निवड मिळवली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी राज्यस्तरीय Open Category मधून प्रथम क्रमांक पटकावत आपल्या गुणवत्तेची आणि कठोर परिश्रमाची प्रभावी छाप उमटवली आहे.
पियुष हेरोडे, हे मुळचे आमला विश्वेश्वर , ता. चांदुर रेल्वे इथले असुन, यांनी क्लिनिकल सायकोलाॅजी मध्ये M.phil केले आहे.
पियुष यांची सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, छत्तीसगड शासन अंतर्गत होणारी ही नियुक्ती अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते.
मानसिक आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्याच्या ध्येयाने प्रेरित असलेल्या पीयूष यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या बळावर हे यश प्राप्त केले आहे. राज्यभरातील अनेक स्पर्धकांमध्ये अव्वल स्थान मिळवणे ही केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून, नव्या पिढीसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण करणारी बाब आहे.
मानसिक आरोग्य क्षेत्रात समाजोपयोगी सेवा देण्याच्या उद्देशाने त्यांनी केलेल्या अथक परिश्रमांचे हे फळ आहे.
त्यांच्या या यशामुळे वडील महादेवराव हेरोडे, आई निर्जला हेरोडे, भाऊ विवेक हेरोडे ,सर्व हेरोडे कुटुंबीय, मित्रपरिवार, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात समाजोपयोगी सेवा देण्याच्या उद्देशाने त्यांनी केलेल्या अथक परिश्रमांचे हे फळ असून, त्यांच्या या यशामुळे अनेक स्पर्धा परीक्षार्थींना नवी प्रेरणा मिळणार आहे.
त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.