Bola Mauli

Bola Mauli "बोला माऊली" हे व्यासपीठ मराठी माणसाच्

शेतकऱ्यांची बरोबरी करणं हे देवाला सुद्धा शक्य नसतं...आमच्या हॉटेल महिलाराज वर पायजमा शर्ट घातलेला माणूस आला..पेहराव पाहू...
18/10/2022

शेतकऱ्यांची बरोबरी करणं हे देवाला सुद्धा शक्य नसतं...

आमच्या हॉटेल महिलाराज वर पायजमा शर्ट घातलेला माणूस आला..पेहराव पाहून मला ते शेतकरी आहेत हे सांगणं गरजेचं नव्हतं.....काउंटर ला आले अन म्हणाले मटण ताट कितीला आहेत... मी म्हटलं 250रुपयाला.. अन चिकन ताट.. मी म्हटलं 180ला... तो माणूस जरा वेळ बाहेर गेला अन म्हटला नुसता रस्सा अन भाकरी देता का... हो म्हटलं देतो की.. त्यांचीं एकूणचं हालचाल पाहून माणूस काही तरी टेंशन मध्ये असावा किंवा बचत करतं असावा असं मला वाटलं... दोन भाकरी अन रस्सा दया म्हटले... मी रस्सा आणी भाकरी भरायला लागल्यावर मला खूप अस्वस्थ वाटलं... मी त्याबरोबर मटणाची प्लेट पण दिली... ते पाहून त्या माणसानं मला मटणाची प्लेट नको आहो माझ्याकडे एवढे पैसे नाहीत म्हटले... मी म्हटलं नसू दया.... घ्या त्यांनी त्या मटणाच्या प्लेट ला अजिबात हात लावला नाही... मला माघारी घेऊन जायला भाग पाडलं...... मी त्यांना परत रस्सा मागितल्यावर रस्यात मटणाचे पीस घालून दिले.. अन त्यांना म्हटलं.. हे रस्यातले पीस आहेत त्यांनी खाल्ले... जेवण करून बडीशेप घेताना मग त्यांना विचारलं.... मी म्हटलं कुठले..काय करता.... त्यांनी गावाचं नावं सांगितले अन म्हटले भाजी इकायला आलो होतो... म्हणलं भाजी चांगल्या रेट मधी जाईल पण 1200रुपये आलं... भूक लागली म्हणून मागच्या दोन हॉटेल वर विचारलं.. तर.. एका हॉटेल वर शाकाहारी जेवणाची थाळी 120रुपयाला सांगितली.... पण तसलं पनीर बिनीर खाऊ वाटतं नाही...... मी त्यांना वरण भात मागितला तर म्हटले 60रुपये.... तुम्ही दोन भाकरी अन रस्सा 50रुपयात देतो म्हटला म्हणून जेवायला बसलोय.......आहो दोनशे अन तीनशे रुपये जेवायला घालवायला तेवढं पैसे नाहीत येत शेतकऱ्याकडे.... दिवाळी आलीय... आता पोरं मोठाली झाल्यात कॉलेज ला जात्यात पाच दहा हजार रुपये खर्च हाय..... या वाचलेल्या दोनशे रुपयात माझं दोन तीन दिवसाचं पेट्रोल भागंल.... कुठ खर्च करतं बसता.... मी म्हटलं येत जावा कधी वाटेल तवा... तवा ते बाबा हसलं अन म्हणालं.. आवं आता कवा दोन महिन्यांनी आमची अन मटणाची गाठ पडायची....
असं म्हणून ते बाहेर गेले.. अन गाडीला अडकवलेल्या पिशवीतून दोन भाजीच्या पेंड्या.. अन चार कोंबडीची अंडी आणून काउंटर वर ठेवली... मी त्यांना पैसे किती झाले ते सांगा म्हटल्यावर ते म्हणाले ... काय राव साहेब मी नको म्हटलं तर तुम्ही मला मटण रस्यातून आणून दिलंच की.. मला माहिती नाय व्हयं.... आहो शेतकरी आहे मी.. नुसतं कोंब फुटलं तर त्याला धान येईल का नाय ओळखणारी मानसं.... तुम्ही माझ्या पोटात दोन घास घातल्यात तर आम्ही तुम्हाला चार घास घालू... फक्त शेतकऱ्याला अजून या जगानं वळखलं नाही....
खरं आहे. शेतकऱ्याची बरोबरी करायला देवाला सुद्धा जमणार नाही....

मच्छिन्द्र टिंगरे -बारामती 9527547547

मोठ्या नेत्याच्या हस्तक्षेपामुळेच अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीची कार्यकारणी बदलली ?दरोडे टाका, पण अनुदानित तत्वावर याय...
21/04/2022

मोठ्या नेत्याच्या हस्तक्षेपामुळेच अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीची कार्यकारणी बदलली ?
दरोडे टाका, पण अनुदानित तत्वावर यायचं असेल तर पैसे आणा.

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे वास्तव*
ठेवींचे ना व्याज मिळाले ना मुद्दल ?

"बोला माऊली"
निखिल देशमुख

दिवसांपासून अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आल्यानंतर या का....

मनसे प्रमुख राज ठाकरे हे सध्या २ दिवसीय पुणे दौऱ्यावर असून यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देशभरातील सर्व देशभ...
17/04/2022

मनसे प्रमुख राज ठाकरे हे सध्या २ दिवसीय पुणे दौऱ्यावर असून यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांनी तयारीत राहा, असे आवाहन केले . तसेच आता रमजान सुरू आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट करायची नाही. पण ३ मे पर्यंत समजलं नाही तर जशास तसं उत्तर देणे गरजेच आहे. असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केल आहे.

राज ठाकरे म्हणाले, "मला २ घोषणा करायच्या आहेत त्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली, देशभरातील सर्वांना त्यांच एकच सांगण आहे की, हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे. त्याकडे तसेच बघितलं पाहिजे, एका मुस्लिम पत्रकाराने बाळा नांदगावकर यांना सांगितलं कि माझं लहान मूल जन्माला आलं तेव्हा सकाळचा अजान आणि बांग बंद करण्याबाबत मशिदीत जाऊन सांगितलं होतं, त्याच्या लहान मुलाला त्रास होत होता हा केवळ हिंदूंना नाही तर मुस्लिमांना देखील त्रास आहे."

"तुम्ही जर दिवसातून ५ वेळा भोंगे लावणार असाल तर आम्ही दिवसातून ५ वेळा मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू, आत्ता रमजान सुरू आहे. त्यामुळे मला कोणतीही गोष्ट करायची नाही. पण त्यांना ३ मे पर्यंत समजलं नाही तर देशातील कायद्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयापेक्षा धर्म मोठा वाटत असेल तर जशास तसे उत्तर देखील देणे गरजेचे आहे असं राज ठाकरे यांनी सांगितलं."

मनसे पक्षाची सर्व बाजूंनी तयारी सुरू आहे .तसेच महाराष्ट्रात कुठल्या प्रकारच्या दंगली नको आहेत. कुठल्या प्रकारच्या हाणामाऱ्या व्हायला नकोत. या देशातील महाराष्ट्रातील शांतता आम्हाला भंग करायची नाही मात्र माणुसकी म्हणून मुस्लीम धर्मीयांनी या गोष्टींचा विचार करायला हवा. त्यांच्या प्रार्थनेला आमचा विरोध नाही, मात्र अजाण लाऊडस्पीकर वरच ऐकवणार असाल तर आमच्या आरत्या देखील लाऊड स्पीकर वरूनच ऐकाव्या लागतील असा इशारा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिला .

Bola Mauli

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bola Mauli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bola Mauli:

Share