04/07/2026
Breaking News
🛑 पर्यटकांचा हिरमोड!
देवकुंड धबधबा, सिकरेट पॉईंट आणि ताम्हिणी घाट ही पर्यटनस्थळे सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.
📍 माणगाव (रायगड):
पावसाळी हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत माणगाव उपविभागीय प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत जारी आदेशानुसार १ जुलै २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत खालील ठिकाणी प्रवेश बंद राहणार आहे.
🚫 बंद पर्यटनस्थळे:
• देवकुंड धबधबा
• ताम्हिणी घाट
• कुंभे (सिक्रेट पॉईंट)
⚠️ मागील काही वर्षांत या परिसरात अनेक गंभीर दुर्घटना घडल्या असून, मुसळधार पाऊस, अचानक वाढणारा पाण्याचा प्रवाह, दरडी कोसळण्याचा धोका आणि दुर्गम भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित राहावे.
🌐 www.thenewslepton.com