संवेदनेची शाळा

संवेदनेची शाळा be candid

साहेब  #जिल्हा_परिषद_शाळा मध्ये  #शिक्षक च उपलब्ध नाहीत तेही  #गणित_विज्ञान_विषय_शिक्षक नाहीत सध्या तुम्ही संचमान्यतेचे ...
22/04/2025

साहेब #जिल्हा_परिषद_शाळा मध्ये #शिक्षक च उपलब्ध नाहीत तेही #गणित_विज्ञान_विषय_शिक्षक नाहीत सध्या तुम्ही संचमान्यतेचे सतत निकष बदलून #शिक्षकभरतीला टाळाटाळ करीत आहेत.

हे न समजायला महाराष्ट्र आहे...उत्तर प्रदेश नाही

20/04/2025

हिंदी राज्यातील लोक
महाराष्ट्रात येऊन पोटाची खळगी भरत असेल तर
महाराष्ट्राला हिंदीची नाहीतर देशाला "मराठी" भाषा शिकण्याची गरज आहे.

20/04/2025

भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते

वाणीत भीम आहे करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते

गोळी खुशाल घाला, फाशी खुशाल द्यारे
खोटे इथे खऱ्याचे दुसरेच टोक असते

तत्त्वाची जाण असती बिनडोक लोक नसते
सारे चलन तयांचे ते रोखठोक असते

सद्भाव एकतेचे जर अन्तरात असते
तुटले कुणीच नसते सारेच एक असते

वामन, समान सारे स्वार्थाने अंध नसते
तुझिया नीतीप्रमाणे सारेच नेक असते

भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते

---लोकशाहीर वामनदादा कर्डक

19/04/2025

शिक्षकभरती २०२२ मध्ये ४०००+ मागासवर्गीय उमेदवारांना ओपनच्या जागेवर गुण असुनही नाकारले जातीयवादी मानसिकतेचा अधिकाऱ्यांनी
#शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय #शिक्षकभरती
#जातीयवादी_मानसिकता #जातीयवादी_अधिकारी
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#छत्रपती_संभाजी_महाराज #जातीयवादी_महाराष्ट्र #शिक्षण_विभाग_महाराष्ट्र तील #राज्य_सरकार आणि
#बामन_मराठा_अधिकारी_जातीयवादी Maharashtra Times Maharashtra DGIPR शिक्षक मित्र - Shikshak Mitra Satya Shodhak

19/04/2025

शिक्षकभरती २०२२ मध्ये ४०००+ मागासवर्गीय उमेदवारांना ओपनच्या जागेवर गुण असुनही नाकारले जातीयवादी मानसिकतेचा अधिकाऱ्यांनी
शिक्षक मित्र - Shikshak Mitra Maharashtra Times Maharashtra DGIPR
#शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय #शिक्षकभरती
#जातीयवादी_मानसिकता #जातीयवादी_अधिकारी
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#छत्रपती_संभाजी_महाराज #जातीयवादी_महाराष्ट्र #शिक्षण_विभाग_महाराष्ट्र तील #राज्य_सरकार आणि
#बामन_मराठा_अधिकारी_जातीयवादी

कंबोडियाच्या घनदाट अरण्यात एक फ्रेंच शास्त्रज्ञ वेगवेगळी फुलपाखरे, किटक यांचा शोध घेत होता. फुलपाखरे शोधतं तो जंगलात बरा...
19/04/2025

कंबोडियाच्या घनदाट अरण्यात एक फ्रेंच शास्त्रज्ञ वेगवेगळी फुलपाखरे, किटक यांचा शोध घेत होता. फुलपाखरे शोधतं तो जंगलात बराच आतपर्यंत शिरला. कंबोडियावर त्या काळी फ्रेंच लोकाची सत्ता होती. वर्ष होते १८६०. त्या काळोख्या दाट जंगलात पुढे पाऊल ठेवण्यासाठी त्याला झुडपे, वेली तोडतच पुढे जावे लागतं होते. किर्र जंगलात शोधता शोधता अचानक त्याला समोर असे काही दिसले की त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले! क्षणभरं त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना!
समोर होती, त्याच्या नजरेच्या कवेत मावत नव्हती, एवढी प्रचंड इमारत! संपूर्ण दगडात बांधलेली! जंगलामध्ये लुप्त! शेकडो वर्षांपासून मानवी हस्तक्षेपासून दूर, महाकाय झाडांनी वेढलेली.
अवाढव्य, महाप्रचंड आणि अदभूत!
खरेतरं, अविश्वसनीय!
त्याने त्याच्या आयुष्यात एवढी महाप्रचंड इमारत पाहिली नव्हती. त्यानेचं काय, संपुर्ण युरोप खंडात कोणीही अशी इमारत पाहिली नव्हती. पाहणार तरी कशी? कारण एवढ्या प्रचंड आकाराची इमारत संपूर्ण युरोपमध्ये नव्हतीचं! कोणी बांधण्याचा विचारही करू शकतं नव्हते. आधुनिक तंत्रज्ञानात स्वत:ला खुप प्रगत समजणाऱ्या संपुर्ण युरोपला आणि जगाला थक्क करणारी ही घटना होती!
हे एक मंदिर होते.
नाव होते, 'अंग्कोर वाट'!
एक मंदिर!
भारतापासून ५००० किलोमीटर दुर देशातील एक हिंदू मंदिर!
आजमितीसही, 'अंग्कोर वाट' जगातले सर्वात मोठे प्रार्थना स्थळ आहे! जगात कुठल्याही धर्माचे एवढे मोठे प्रार्थनास्थळ नाही.
एवढे अवाढव्य प्रार्थनास्थळ त्यापुर्वी ना कोणी बांधले होते, ना कोणी नंतर बांधू शकला!
एका कंबोडियन हिंदू सम्राटाने हे बांधले होते १२व्या शतकात! इसवीसन ११५०च्या सुमारास!
मात्र, १५व्या शतकापासून काही अनाकलनीय कारणाने ते जंगलात लुप्त झाले होते. मंदिरातले बोटावर मोजण्याएवढे बौद्ध भिक्षू आणि मंदिर परीसरात राहणारे काही आदिवासी खेडूत वगळता, शेकडो किलोमीटर अंतरात लोकवस्तीही नव्हती...
५०० एकर एवढ्या भव्य क्षेत्रफळावर बांधलेले 'अंग्कोर वाट' मंदिर आहे, भगवान विष्णूचे!
पश्चिममूखी असलेले हे मंदिर किती भव्य असावे? मुख्य प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत पोहोचायलाचं ३ ते ४ किलोमीटर चालावे लागते! मंदिराच्या सभोवती एक आयताकृती कालवा आहे, त्याचीच एकत्रित लांबी ५.५ किलोमीटर आहे!
४ मिटर खोल असलेल्या या कालव्याची रूंदी आहे २५० मिटर म्हणजे पाव किलोमीटर! हा कालवा ओलांडूनच मंदिराच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतां येते! फक्त पहिल्या प्रवेशद्वारापाशी, मंदिरात नाही!
पुढे अशी अजून दोन प्रवेशद्वारे ओलांडूनचं आपण मुख्य मंदिराजवळ येतो!
तत्कालीन कंबोडियन हिंदू राजा (दुसऱ्या) सुर्यवर्मनने हे भव्यदिव्य मंदिर घडवले, तेव्हा कालांतराने ही वास्तू जगातल्या सात आश्चर्यांपैकी मानली जाईल, असे त्याला वाटलेही नसेल!
'अंग्कोर वाट'पेक्षा आकाराने निम्म्या वा त्याहूनही छोटे असणाऱ्या युरोपातले 'कॅथेड्रल्स' बांधायला १५० ते २०० वर्षे लागली, काहींना ३००!
दुसऱ्या सुर्यवर्मनने हे मंदिर घडवले ते फक्त ३० ते ३५ वर्षात!
लाखो कंबोडियन नागरिक,कामगार, कारागीर, मूर्तीकार, निष्णात अभियंते, वास्तूरचनाकार, शेकडो हत्ती, हजारो बैलगाड्या, तराफे या मंदिरासाठी ३५ वर्षे अविरतं झटतं होते!
४८ लाख टनांपेक्षा जास्त दगड लागले, ही वास्तू पुर्ण करण्यासाठी. बरं हा दगडही मंदिराच्या जवळपास ऊपलब्ध नव्हता, तो आणावा लागला दुर असलेला महेंद्र नामक पर्वत फोडून. रस्तामार्गे हे जड दगड वाहाणे अशक्य होते. नदीतून आणावे म्हंटले तर अशी नदीही या बांधकाम स्थानापासून दुर होती. अंतर जवळपास ८०-९० किलोमीटर होत होते. एवढे वजनदार आणि एवढ्या संख्येने दगड वाहून आणने, महाकठीण काम.
दुसऱ्या सुर्यवर्मनकडे या अवाढव्य महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या. वैभवशाली राज्य असल्याने पैशांचा तर महापुर होता, नव्हता तो फक्त वेळ! त्याला त्याच्या जिवनकालातचं हे मंदिर पुर्ण करायचे होते. मग या राजाच्या बुद्धिमान अभियंत्यांनी महेंद्र पर्वतापासून मंदिराच्या स्थानापर्यंत महाप्रचंड असे कालव्यांचे जाळे ऊभारले!
सारेचं अवाढव्य!
डोंगरातून कापलेले दगड तराफ्याने कालव्यांमार्गे बांधकामाच्या ठिकाणी आणले जायचे, तिथे त्यांना जरूरीप्रमाणे कापले जायचे. एकमेकांवर घासून हे कठीण दगड चारही बाजूने सपाट केले जायचे आणि मग बांधकामात वापरले जायचे! दगडाचे असे किती तुकडे एकूण बांधकामासाठी लागले, याची मोजदाद अशक्य!
या साऱ्या बांधकामासाठी ना सिमेंट, ना काँक्रीट ना लोखंड! सगळे बांधकाम दगडावर दगड रचून साकारायचे म्हणजे अतिशय कठीण आणि जोखमीचे काम!
आतमध्ये दगडी भित्तिचित्रे असलेल्या दोन-दोन किलोमीटर लांब दगडी 'गॅलरीज' आहेत (यांचे छप्परसुद्धा दगडाचेच). त्यांना आधार द्यायला जे असंख्य खांब आहेत, ते सगळे इतके काटेकोरपणे सरळ रांगेत की तसुभरही फरक नाही.
एक मिलिमीटर सुद्धा मागे पुढे नाही! आजकालच्या 'लेझर' किरणांच्या तोडीस तोड तंत्रज्ञान! बांधकामातले कौशल्य अचंबीत करते! अतिशय अवघड असे हे तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाविषयी फारशी माहिती आता ऊपलब्ध नाही, पण हे लोक फारचं प्रगत तंत्रज्ञान वापरत होते, यात शंकाच नाही!
अशा ३ गॅलरीज आहेत. ह्या ज्या लांबलचक गॅलरीज आहेत, त्यांनी संपुर्ण मंदिराला विळखा घातलायं. २५० मिटरचा कालवा ओलांडून आले की, एक प्रवेशद्वार. ते ओलांडून एक-दिड किलोमीटर पार केल्यावर दुसरे प्रवेशद्वारं. हे प्रवेशद्वार पहिल्या आयताकृती महाप्रचंड गॅलरीचा भाग आहे. ते पार करून थोड्या ऊंचावर दुसरी आयताकार गॅलरी सुरू होते. ती पार करून मग तिसरी आणि मग मुख्य मंदिराची सुरुवात!
या सगळ्या गॅलरीज एकापेक्षा एक ऊंचावर आहेत. एका पिरॅमिड सारखी रचना. सगळ्यात वर मंदिराचे आभाळात घुसलेले ५ कळसं.... एक मुख्य कळस मध्यभागी आणि चार उपदिशांना ऊंचीने थोडे कमी असलेले चार कळस. सुरूवातीला ओलांडून यायच्या कालव्यापासून ऊंची मोजली, तर मुख्य कळसाची ऊंची २३३ मिटर आहे! म्हणजेचं ७०-८० मजली ऊंच इमारती एवढी!
हे मंदिर पुर्ण झाले आणि आजुबाजुला लोकवस्ती झाली, तेव्हा लंडनची लोकसंख्या होती ३०,०००, आणि 'अंग्कोर'ची लोकसंख्या होती दहा लाख!
युरोपात औद्योगिक क्रांती होण्याअगोदरचे जगातले सर्वात मोठे शहर!
बांधकामाच्या कलेत आणि शास्त्रात प्राविण्य असलेले, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, एक सुसंस्कृत शहरं!
( हे भरभराटीला आलेले शहर, मंदिर पुढच्या दोन-तिनशे वर्षांत, ओसाड पडेल, असे तेव्हा कोणाला स्वप्नातही वाटले नसेल....)
आजही भल्या भल्या अभियंत्यांना तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या या मंदिराची रचना, बांधणी त्याकाळी कशी केली असेल या विचाराने थक्क व्हायला होते!
या गॅलरीजमध्ये अडीच मिटर ऊंच आणि एकत्रित साडेचार किलोमीटर लांब अशी दगडात कोरलेली असंख्य आणि अखंड भित्तिचित्रे आहेत!
पौराणिक कथा, रामायण, महाभारत आणि दुसऱ्या सुर्यवर्मनची कारकिर्द दगडात कोरलीयं!
मंदिरात जवळपास १५०० अप्सरा कोरल्यात, प्रत्येक अप्सरा वेगळी! एकीसारखी दुसरी नाही. सारख्या वाटल्या आणि निरखून पाहिले तर क.ते पैंजण तरी वेगळे असेल, बाजुबंद तरी वेगळा असेल, हार वा कंगण तरी वेगळे असेल वा केशभूषा!
अविश्वसनीय आणि अतर्क्य!
ही सगळी भित्तिचित्रे बघायची म्हंटली तर चार-पाच किलोमीटरची पायपीट आलीचं!
हे सारे कोरीवकाम दगडी भिंतीवर तिन ते चार इंच खोलीत!
हे कोरणे तर अवघडंच, पण असा एवढा मोठा 'कॅनव्हास' तयार करणेही सोपे नव्हते. एकावर एक अशा दहा-बारा शिळा चढवून भिंत बनवलेली. दोन दगडांमध्ये हवासुद्धा जाऊ नये इतके एकमेकांवर घासायचे, नंतर पुर्ण भिंत नाजूक छिन्नी-हातोड्याने एकसंध बनवायची आणि मुर्तीकारांच्या सुपूर्द करायची.
मग या कलाकारांचे कोरायचे काम सुरू! भित्तिचित्रे कोरताना एखाद्यावेळी हातोडा जोरात पडला, एखादी चुक झालीच,
तर संपूर्ण भिंतच परत रचायची! परतं सपाट करायची आणि परत पहिल्यापासून कोरायला सुरूवात करायची!

असे अवाढव्य मंदिर बांधायची कल्पना करणे, असंख्य अडचणींवर मात करून ती कल्पना प्रत्यक्षात आणने, हे सारेचं अफलातून!
असे म्हणतात की या मंदिराच्या ऊभारणीसाठी दुसऱ्या सुर्यवर्मनच्या राज्यातील प्रत्येक कुटूंबातील एकजण तरी सहभागी होता.
धन्य ती सारीचं मंडळी!
हे असले काही भव्यदिव्य पाहिले की हात आपोआप जोडल्या जातात. भारतीयांच्या तत्कालीन स्थापत्यज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा अभिमान वाटतो आणि आपण किती महान संस्कृतीत जन्माला आलोयं, याची जाणीव होते!
- रवी वाळेकर
🙏





15/04/2025

कुत्र्याला समजतंय कुणाचे राखण करावं आणि कुणाला चावावं

स्त्री मुक्ती चा दाता तो,बहुजनांचा वाली...अमृता च्या त्या शब्दांनासंविधाना चे आवरण सोनेरी...चौदाव्या रत्ना ने केलीअसामान...
14/04/2025

स्त्री मुक्ती चा दाता तो,
बहुजनांचा वाली...
अमृता च्या त्या शब्दांना
संविधाना चे आवरण सोनेरी...
चौदाव्या रत्ना ने केली
असामान्य अशी क्रांती...

ज्ञानाचा तो दीप लावणारा,
अंधकारावर मात करणारा...
शिकून उठ म्हटलं ज्याने,
मनुवादाला थरकावत नेलं त्याने...

भेदाभेदाला छेद देऊन,
मानवतेचं धैर्य जपले...
श्रमिक, दलित, स्त्रीसाठी,
न्यायाच्या मशाली पेटवल्या...

शब्दात नव्हे, कृतीतून,
माणसाला माणूस म्हणवलं...
भारतीय घटनेच्या प्रत्येक ओळीत,
त्याचं स्वप्न अजरामर ठेवलं...

तो होता केवळ एक नेता नाही,
तो होता क्रांतीचा झंझावात...
समतेच्या त्या पवित्र धाग्यात,
बांधला संपूर्ण भारतभूमीचा हात...

म्हणूनच आज पुन्हा पुन्हा,
आम्ही गर्जून म्हणतो —
जय भीम! जय संविधान!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३४ व्या जयंती निमित्त कोटी कोटी वंदन!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

13/04/2025


#शिक्षकभरती_अब्जावधींचा_घोटाळा
#शिक्षकभरती_अन्याय # #खाजगी_शिक्षण_संस्था_भ्रष्टाचार
#शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय
#ज्ञानज्योती_सावित्रीबाई_फुले #क्रांतीसुर्य_महात्मा_जोतिराव_फुले #स्त्री_पुरुष_समानता #पुरोगामी #राजर्षि_शाहू_महाराज #विज्ञाननिष्ठ_शिक्षण #छत्रपती #महात्मा #संसद #गांधी #राष्ट्रपिता #प्रजेची_सत्ता #अहिंसेच्या #डॉ_संग्राम_पाटील #अंधविश्वास #पाखंड #शाळा #प्राध्यापक #मुख्याध्यापक #सरकारी_शिक्षक #सरकारी_शाळा_वाचवा 😍🎉

खरी मजा होती अश्मयुगात ....ना काम ना धंदाशिकार करायची, कंदमुळे खायची, गुहेमध्ये घरटी करायची, लग्नाचे टेन्शन नाही, कर्जाच...
09/04/2025

खरी मजा होती अश्मयुगात ....
ना काम ना धंदा
शिकार करायची, कंदमुळे खायची, गुहेमध्ये घरटी करायची, लग्नाचे टेन्शन नाही, कर्जाचे टेन्शन नाही, नोकरीची चिंता नाही, निवडणूक किंवा राजकारण नाही, अटक नाही, खटला नाही,
वशील्याची भानगड नाही, कामासाठी पळापळ नाही, शिक्षण व डोनेशनची गरज नाही, पोरांच्या भविष्याची चिंता नाही, लग्नं, मानपान, ववसा, डोहाळजेवण, मूळसाडा, बाळंतइडा असली पिडा नाही, रूसवा-फुगवा नाही, ऑनलाईन नाही,
चॅटिंग नाही, त्यामुळे एक्झिट किंवा रिमूव्हड् नाही, ना डिबेटिंग ना डेटिंग... ओन्ली इटिंग, स्लिपींग, रनींग,...फुल इंजॉय लाइफ

फक्त खायचे ...... झोपायचे व वेळ येईल तेव्हा मरायचे.. पण माती नाही, दहावा नाही, उत्तरकार्य नाही, वर्षश्राद्ध नाही,

कुठल्या माकडानं प्रगतीला सुरूवात केली काय माहित ????
🤣😂
#अश्मयुगीनमानव #भटकंती #मराठी #महाराष्ट्र

सर्वात जास्त आपल्या भारत देशाला कोणी लुटले आहे..?  #क्रांतीसुर्य_जोतीबा_फुले   #सत्यशोधक  #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर  #महात्म...
07/04/2025

सर्वात जास्त आपल्या भारत देशाला कोणी लुटले आहे..?
#क्रांतीसुर्य_जोतीबा_फुले #सत्यशोधक #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #महात्माफुले #महात्मा_ज्योतिबा_फुले #मंत्री #व्यापारी #आमदार
#खासदार
#धार्मिक_व्यापारी #धार्मिक_दुकानदार #धर्म_प्रचारक

07/04/2025

राजानं किंवा कोणत्याही माणसांनी बांधलेले नाहीत अशा
गडांचे
नावं सांगा.?

31/03/2025

#दुनियदारी
#गाव #गावात_दुष्काळ
#गोष्ट_छोटी_डोंगराएवढी #निळू_फुले #सयाजी_शिंदे #मकरंद_अनासपुरे

Address

Pune
411003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when संवेदनेची शाळा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share