25/09/2026
राज्यात पहिल्या टप्प्यातील दुष्काळाची अधिसूचना जारी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
अमरावती/मुंबई: महाराष्ट्रातील गंभीर टंचाई सदृश परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबतची पहिली अधिसूचना (GR) जारी करण्याची घोषणा केली आहे. दुष्काळ संहितेतील 'ट्रिगर १' (Trigger 1) च्या निकषांनुसार पहिल्या टप्प्यात सर्वाधिक बाधित क्षेत्रांचा यामध्ये समावेश केला जाईल, तर सुटलेल्या भागांसाठी 'ट्रिगर ३' नुसार ग्राउंड ट्रुथिंग करून पुढील निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारच्या एनडीआरएफ (NDRF) निधीची किंवा मदतीची वाट न पाहता राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतून बाधितांना थेट आर्थिक मदत (Blanket Basis Compensation) देणार आहे. राज्यातील विदारक परिस्थिती पाहता हा १९७२ नंतरचा अत्यंत मोठा दुष्काळ असल्याचे सांगत त्यांनी खरीप व रब्बी दोन्ही हंगामांतील सोयाबीन, मका, कापूस उ�