Siddhant Media & Publicity

Siddhant Media & Publicity # PR SERVICES
# Film Production
# Events
Media Marketing
& Branding
& Videography
Management

Siddhant Media & Publicity

a Pune based company offers specialised services in Events, Film PR, Film Production and Advertising. PUBLIC RELATIONS SERVICES

Public Relations are important for all those entities and people who have their presence amongst the masses in some way and are recognized by them. It is important for them to retain their positive perceptions in the minds of people for the lo

ngest period of time for their ultimate success. These perceptions can be created by taking a pro-active or a responsive approach depending upon the requirements of the client and situations. Approach Communications , one of the leading PR agencies in India, has a reputation of developing innovative and effective PR strategies to help corporate develop their own and their brand’s positive image as also to manage the dwindling reputation of the celebrities. As one of the foremost PR consultancies in India, we offer our time-tested as well as new and creative PR ideas on the following services:

CORPORATE RELATIONS MANAGEMENT

In exercise of the duties, the media queries are taken up by our trained experts who know what to say to media and how. This corporate PR management exercise is not limited to the public or the customers, but is also done very carefully with the stakeholders. The experts of our PR agency Delhi office set target-oriented objectives and see to it that they are seamlessly executed through effective messaging, training for effective message delivery, focused outreach programmes and finally, evaluation of measurable results. REPUTATION MANAGEMENT BY OUR PR AGENCY

In this age of media activeness, there is a good chance that the image of a corporate or a public figure can get marred due to adverse factual or fictional reporting. Even a trivial issue can assume astronomical proportions due to the media hype and do incalculable damage to the goodwill and image of a public figure. That is where being one of the topmost integrated marketing communications agencies India helps our clients a lot. With our PR services in India, we can launch a corporate reputation management India wide campaign with a well thought out and calculated PR exercise across different media of communication to contain the negative fallout of the adverse publicity. This also makes us one of the most trusted image management agencies in India. About Us -

Siddhant Media & Publicity Established in 2014, our agency has successfully ideated, themed, conceptualized, planned, promoted and implemented variety of events, Promotion campaigns, innovative publicity ground promotions and many more...
Clear transparent communication with client, impeccable client servicing standards and working in close coordination with the clients team is our way of working. Our CORE COMPETENCIES -

# Events (Corporate /Cultural/ Themed /
# Social/General, Sports)
# Advertising & Branding (Design/Branding/Strategy/Media Budget & Allocation)
# Public Relations (Marathi Film PR, corporate PR)
# Film Production

स्वातंत्र्य दिना निमित्त कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप- ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले आण...
17/08/2023

स्वातंत्र्य दिना निमित्त कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप

- ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले आणि पुण्याचे पॅड मॅन योगेश पवार यांचा पुढाकार

पुणे : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने पुण्यातील शिवाजीनगर भागातील महात्मा गांधी वसाहत,पाटील इस्टेट समोर या परिसरातील सुमारे साडेतीनशे हून अधिक घरांमध्ये महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले.

पुण्याचे पॅड मॅन अशी ओळख असलेल्या योगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने महिलांविषयक आरोग्य जनजागृती करण्यासाठी दुर्गम,झोपडपट्टी अशा भागात सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात येत आहे.आज या उपक्रमाअंतर्गत पुण्यात सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले. यावेळी पुण्याचे पॅड मॅन योगेश पवार,ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले,पूजा वाघ,प्रियंका मिसाळ,अंजली रघुनाथ वाघ,अर्चना माघाडे,रोहित गोडबोले,श्वेता ओव्हाळ,तेजस रायभार,डॉ मनोज देशपांडे,ऍड स्वप्नील जोशी,अविनाश भेकरे,सनी कारोसे,हिरा शिवांगी,मोहन कोळी,सिलो घाडगे, जगदीश परदेशी,नितीन गायकवाड,महात्मा गांधी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आदी मान्यरांनी घरोघरी जाऊन वाटप केले.

या उपक्रमाबद्दल बोलताना योगेश पवार म्हणाले, मासिक पाळी या अतिशय महत्वाच्या आणि नाजुक विषयांवर जनजागृती करण्याचे काम कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने केले जात आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून आम्ही डॉक्टर्स चा चॅरिटी फॅशन शो घेतला होता त्या अंतर्गत १ लाख सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात येणार आहे. त्यातील ४० हजार सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप आजपर्यंत पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या दुर्गम भागात करण्यात आले आहे.

ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले म्हणाले, ग्रामीण तसेच शहरी भागातही बहुतांश कुटूंबात आजही मासिक पाळी विषयी मोकळेपणाने बोलले जात नाही. त्यामुळे या काळातील महिलांची शारीरीक व मानसिक स्थिती समजून घेतली जात नाही असे दिसते. या पार्श्वभूमीवर कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने मासिक पाळी दरम्यानची स्वच्छता विषयी जनजागृती करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमाचा एक भाग होता आले याचा आनंद वाटतो.

प्रत्येकाने आपण देशासाठी काय करू शकतो यांचा विचार केला पाहिजे - मंत्री मंगल प्रभात लोढा- "इंडियन बँक" च्या वतीने ‘विभाजन...
17/08/2023

प्रत्येकाने आपण देशासाठी काय करू शकतो यांचा विचार केला पाहिजे - मंत्री मंगल प्रभात लोढा

- "इंडियन बँक" च्या वतीने ‘विभाजन विभीषिका दिवस' निमित्त फोटो प्रदर्शन

मुंबई : आजचे हे प्रदर्शन म्हणजे केवळ ऐतिहासिक फोटोंचे प्रदर्शन नाही तर प्रत्येक फोटो मध्ये एक गोष्ट आहे, या गोष्टी फक्त सांगण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी नाहीत, आज भारतात ज्या पद्धतीने बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसत आहेत त्यामुळे भविष्यात आपल्या पुढच्या पिढ्यासोबत असे पुन्हा घडू नये यांची काळजी घेण्यासाठी यातून शिकण्याची गरज आहे. आजघडीला देशाची जबाबदारी फक्त सरकारवर ढकलून चालणार नाही. प्रत्येकाने आपले काम सांभाळून आपण देशासाठी काय करू शकतो यांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता, महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्या नुसार 14 ऑगस्ट हा दिवस ‘विभाजन विभीषिका दिवस म्हणून साजरा केला जात आहे. सांस्कृतिक मंत्रालया ने दिलेल्या निर्देशना नुसार सोमवारी "इंडियन बँक" च्या वतीने त्यांच्या फोर्ट मुंबई कार्यालय येथे या भीषण दिवसावर उजाळा टाकण्यासाठी एक फोटो प्रदर्शन आयोजित केले होते, त्यांच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री लोढा बोलत होते. यावेळी इंडियन बँकेचे फील्ड जनरल मॅनेजर,एस एस पी रॉय,स्वातंत्र्य सेनानी श्रीमती गुणवंती जोशी, स्वातंत्र्य सेनानी श्रीमती प्रतिभा देसाई आदि मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, भारतात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत होते, मात्र इंग्रजांच्या एका निर्णयाने धर्माच्या नावावर देशाचे दोन तुकडे झाले आणि लाखो परिवार बेघर झाले, अनेक कुटुंब विभक्त झाली, हजारो लोकांचा मृत्यू या देशाच्या फाळणी दरम्यान झाला, असंख्य कुटुंबांना आपले आप्तस्वकीय जीवंत आहे की नाहीत हे सुद्धा कळले नाही, विशेषता कुटुंबापासून दुरावलेल्या महिलांचे, त्यांचे धर्माचे पुढे काय झाले हे माहीत नाही, यामुळे त्यांचे कुटुंबीय त्यांना श्रद्धांजली सुद्धा वाहू शकले नाहीत. या घटनेला जबाबदार कोण? असंख्य लोकांची त्यात काय चूक होती? असा सवाल मंत्री लोढा यांनी उपस्थित केला.

तसेच, इंडियन बँकेचे मी विशेष अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय उत्साहाने हे प्रदर्शन भरविले आहे. माझी एस. एस. पी. रॉय साहेबांना विनंती आहे की, हे प्रदर्शन झाल्यानंतर त्यांनी हे फोटो मला द्यावेत मंत्रालयाच्या सेंट्रल हॉल मध्ये 5 ते 7 दिवस हे प्रदर्शन भरविण्याची माझी इच्छा आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रातून येणारे लोक याला पाहतील असेही लोढा म्हणाले.

इंडियन बँकेचे फील्ड जनरल मॅनेजर, श्री. एस. एस. पी. रॉय म्हणाले की, उद्या इंडियन बँकेचा 170 वा स्थापना दिवस आहे, त्यामुळे आज मंत्री महोदयांच्या उपस्थितीत होत असलेला हा कार्यक्रम त्यांची शोभा वाढविणार आहे. फाळणीची घोषणा झाल्यानंतर लाखो लोक विस्थापित झाले, हा केवळ प्रवास नव्हता तर अत्यंत वेदनादायी काळ होता. आज स्वातंत्र्याच्या अमृत काळातून मागे वळून बघितले तर जाणवते की स्वातंत्र्य लढ्यातील वीरांनी, शहीदांनी ज्या भारताची कल्पना केली असेल ती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वास येत आहे. या विकासाच्या वाटचालीत, आर्थिक जडणघडणीत इंडियन बँकेचे योगदान महत्वपूर्ण आहे यांचा आम्हाला अभिमान वाटतो. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. वजाहात अली, मुख्य प्रबंधक, सरकारी व्यवसाय, यांनी केले.

कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने २५ हजार सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटपपुणे : भारतीय समाज आज खूप विकसित झाला आहे. मात्र, तरी देखील ...
08/06/2023

कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने २५ हजार सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप

पुणे : भारतीय समाज आज खूप विकसित झाला आहे. मात्र, तरी देखील मासिक पाळी आणि त्या काळा दारम्यानची स्वच्छता यांविषयी अनेक गैरसमज आहेत. मासिक पाळी या अतिशय महत्वाच्या आणि नाजुक विषयांवर ग्रामीण, दुर्गम भागातील महिलांमध्ये जनजागृती करण्याचे काम कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने केले जात आहे. याचच एक भाग म्हणून कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने जवळपास २५ हजार सॅनिटरी नॅपकिन्सचे ग्रामीण भागातील महिलांना वाटप करण्यात आले आहे.

कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी आणि महिला आरोग्य जनजागृती घडवणारा व फक्त महिला डॉक्टरांचा समावेश असणार 'ग्लॅम डॉक' चॅरिटी फॅशन शो आयोजित केला जाणार आहे. या चॅरिटी फॅशन शोच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून राज्याच्या दुर्गम भागातील एक लाख महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स दिले जाणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात आज एकाच दिवसात २५ हजार सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले. यामध्ये पुण्यातील गणेशखिंड रोड येथील खैरेवाडी परिसर, साने गुरुजी शाळा दांडेकर पुल पुणे तसेच सातारा जिल्ह्यातील परळी, लावघर, आबेवाडी, गोळेवाडी या गावांमध्ये या सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले. यावेळी कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पवार, डॉ.राजश्री ठोके, डॉ. श्रद्धा जवंजाळ, डॉ. राहुल जवंजाळ, डॉ. स्नेहल जगताप, डॉ. रेश्मा मिरगे, डॉ. प्रज्ञा भालेराव, पूजा वाघ, अंजली वाघ, केसर तिवारी, कुणाल नारदेलवार, ओंकार सातळकर, अफिया शेख, महेश आठल्ये, मेघना आठल्ये, रोहित पाटील, सिद्धार्थ आठल्ये, अर्चना माघाडे, आदी यावेळी उपस्थित होते.

कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पवार यावेळी बोलताना म्हणाले, ग्रामीण तसेच शहरी भागातही बहुतांश कुटूंबात आजही मासिक पाळी विषयी मोकळेपणाने बोलले जात नाही. त्यामुळे या काळातील महिलांची शारीरीक व मानसिक स्थिती समजून घेतली जात नाही. तसेच मासिक पाळी दरम्यान कापडाचा वापर केल्याने अनेक समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर मासिक पाळी दरम्यानची स्वच्छता यांविषयी जनजागृती करण्याची काळाची गरज आहे.

पुण्यात भारतातील पहिल्या अभिनव हार्मोन रिप्लेसमेंट आणि वेलनेस सेंटरचे उद्घाटन पुणे : पाश्चिमात्य देशात हार्मोन रिप्लेसमे...
08/06/2023

पुण्यात भारतातील पहिल्या अभिनव हार्मोन रिप्लेसमेंट आणि वेलनेस सेंटरचे उद्घाटन

पुणे : पाश्चिमात्य देशात हार्मोन रिप्लेसमेंट, थेरपी सेंटरचे प्रमाण मोठे आहे. पण भारतात आजही ठराविक उपचार वगळता इतर ग्रंथीच्या आजारांवर पारंपरिक पद्धतीनेच उपचार केले जातात. मात्र, काळाची गरज ओळखून आता पुण्यात भारतातील पहिल्या हार्मोन हब(हार्मोन रिप्लेसमेंट आणि वेलनेस क्लिनिक) चे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी हार्मोन वेलनेस क्लिनिक्स प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. महेश ब्राम्हणकर, डॉ विक्रम डोसी (संचालक), डॉ. सूरज कोडक (एम डी) संचालक, डॉ नुपूर काळे - उमराणीकर (स्त्रीरोग तज्ञ) डॉ पियुष लोढा (डी एम एंडोक्रिनोलॉजी), डॉ. मुकेश बुधवाणी (एम डी) फेलोशिप साइको-सेक्शुअल मेडिसिन, डॉ राकेश नेवे (ज्येष्ठ कर्करोग तज्ञ), आहारतज्ञ डॉ अनूज गावंडे, हिंदुस्थानी क्लासिकल पंडीत पुष्कर लेले आणि म्यूजिक थेरपी तज्ञ डॉ शुभम कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर म्हणाल्या, हार्मोन रिप्लेसमेंट ही एक आधुनिक उपचार पद्धत आहे. या बद्दल ऐकताना एखाद्या फिक्शन् फिल्म प्रमाणे वाटतय. मात्र हार्मोन रिप्लेसमेंट ही एक परवडू शकेल अशी उपचार पद्धत आहे, यातून रुग्णांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात, आणि यांचा सक्सेस रेट खूप चांगला आहे, हे बघून या अभिनव उपक्रमाचा मी भाग झाले यांचा अतिशय आनंद वाटतो.

हार्मोन हब विषयी बोलताना हार्मोन वेलनेस क्लिनिक्स प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. महेश ब्राम्हणकर म्हणाले, हार्मोन हब म्हणजेच हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आणि वेलनेस सेंटर ही एक अशी अभिनव संकल्पना आहे की, ज्यात आपल्या हार्मोन्स च्या समस्यांवर तज्ञाकडून एलोपथीं उपचार तर होतीलच, परंतु त्यासोबत म्युझिक थेरपी,प्राणिक हिलिंग,कौन्सेलिंग प्रोग्राम्स,आहाराचा सल्ला तसेच लाइफ कोचिंग आदि वैविध्यपूर्ण दृष्टीकोनातून रुग्णाचा सर्वांगीण उपचार केला जाईल.

मैत्री बॉक्स प्रीमियर लीग-२०२३ क्रिकेट चषक 'मनसे' ने पटकावला- मनसेच्या विजयात चंद्रकांतदादा आनंदीपुणे : राजकीय पक्ष, साम...
08/06/2023

मैत्री बॉक्स प्रीमियर लीग-२०२३ क्रिकेट चषक 'मनसे' ने पटकावला

- मनसेच्या विजयात चंद्रकांतदादा आनंदी

पुणे : राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या तीन दिवसीय मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात झाला. अतिशय रंगतदार झालेल्या या सामन्यात मनसेने विजय मिळवत 'मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धे'च्या चषकावर आपले नाव कोरले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम योद्धा फाउंडेशन आयोजित क्रिएटिव्ह फाउंडेशन निमंत्रित स्वर्गीय डी.बी देवधर स्मरणार्थ मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा.आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भाजप, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मनसे, मराठी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, पत्रकार आणि कलाकार यांच्या टीम सहभागी झाल्या होत्या. ही स्पर्धा अंतिम सामना व बक्षीस वितरणावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भीमयोद्धा फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. मंदार जोशी, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे संदिप खर्डेकर यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांमध्ये एका टीकेला दुसऱ्या टीकेने उत्तर दिल्याचे पाहायला मिळत आहे. ही केलेली सर्व वक्तव्य ही मनापासून नसतात. राजकारणाचा तो एक भाग आहे. आशा परिस्थितीत जेव्हा या मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेची संकल्पना माझ्यापुढे आली तेव्हा मला खूप आनंद झाला. या स्पर्धेच्या माध्यमातून राजकीय कार्यकर्ते, कलाकार, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी जी खिलाडू वृत्ती दाखवली ती अशीच टिकवून ठेवावी, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

या स्पर्धेच्या निमित्ताने अॅड. मंदार जोशी यांच्या भीमयोद्धा फाउंडेशनच्या वतीने ऑनलाइन व डिस्टंस लर्निंग साठी युवा सामाजिक, राजकीय कार्यकर्त्याला स्कॉलरशिप देण्यात आली, तसेच ज्येष्ठ क्रिकेटपटू अन्वर शेख, महिला क्रिकेट निवड समिती अध्यक्ष रेखा गद्रे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. स्पर्धेचे समालोचन योगेश सुपेकर यांनी केले.

विचारधारा कोणतीही असली तरी सर्वांचे ध्येय देशाला पुढे घेऊन जाणे हेच आहे -  खासदार अॅड. वंदना चव्हाण यांचे मत- मैत्री बॉक...
08/06/2023

विचारधारा कोणतीही असली तरी सर्वांचे ध्येय देशाला पुढे घेऊन जाणे हेच आहे - खासदार अॅड. वंदना चव्हाण यांचे मत

- मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला राज्यघटना दिली. त्यामध्ये सर्वधर्म समभाव, समतेचा संदेश दिलेला आहे. खऱ्या अर्थाने आपण ते विसरून चाललोय की काय? असा प्रश्न आज पडतो. अशा काळात मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा अतिशय महत्वाची आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना एकमेकांना भेटायला जमात नाही, खेळ तर दूरची गोष्ट आहे. मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने आजच्या सामाजिक - राजकीय गढूळलेल्या वातावरणात विविध विचाराधारेचे कार्यकर्ते आणि पत्रकार एकत्र येत आहे ही आनंदाची बाब आहे. विचारधारा कोणतीही असली तरी सर्वांचे ध्येय देशाला पुढे घेऊन जाणे हेच आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने हे काम खेळाच्या माध्यमातून होतेय असे मत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या, राज्यसभा खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम योद्धा फाउंडेशन आयोजित क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि छत्रपती कलाकार लीग निमंत्रित स्वर्गीय डी.बी देवधर स्मरणार्थ मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अॅड. वंदना चव्हाण बोलत होत्या. याप्रसंगी आमदार माधुरी मिसाळ, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा चे मेघराज राजेभोसले, नगरसेविका मंजुश्री संदीप खर्डेकर,आर पी आय प्रदेश सचिव ऍड अर्चिता मंदार जोशी,काँग्रेस आय प्रदेश उपाध्यक्ष संगीता तिवारी ,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ता ऍड रुपाली पाटील, युवासेनेचे किरण साळी, आयोजक ॲड मंदारभाऊ जोशी- भीमयोद्धा फाउंडेशन, संदीप खर्डेकर- क्रिएटिव्ह फाउंडेशन, रमेश परदेशी- छत्रपती कलाकार लीग आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, भीमयोद्धा फाउंडेशनने या स्पर्धेच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणले आहे. आजच्या राजकीय परिस्थितिमध्ये ही बाब खूप गरजेचे आहे,

मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट या स्पर्धेत भाजप, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मनसे, मराठी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, पत्रकार आणि कलाकार यांच्या टीम सहभागी असून ही स्पर्धा गेम ऑन स्पोर्ट्स ग्राऊंड, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर, कोथरूड येथे ३१ मे पर्यन्त सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सुरू आहे.
या स्पर्धेची फायनल मॅच आणि बक्षीस समारंभ व समारोप बुधवार ३१ मे २०२३ रोजी सायंकाळीं ६:३० वा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि अभिनेते सुबोध भावे यांच्या सह सर्व पक्षीय प्रमुख यांचे उपस्थितीत होणार आहे. असे भीमयोद्धा फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. मंदार जोशी आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन चे संदिप खर्डेकर यांनी सांगितले.

हार्मोन हब: हार्मोन रिप्लेसमेंट आणि वेलनेस सेंटरचे  3 जून रोजी होणार उद्घाटनपुणे : पाश्चिमात्य देशात ‘हार्मोन रिप्लेसमें...
08/06/2023

हार्मोन हब: हार्मोन रिप्लेसमेंट आणि वेलनेस सेंटरचे 3 जून रोजी होणार उद्घाटन

पुणे : पाश्चिमात्य देशात ‘हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी सेंटरचे’ प्रमाण मोठे आहे. पण भारतात आजही ठराविक आजारांवरचे उपचार वगळता इतरत्र पारंपरिक पद्धतीनेच उपचार केले जातात.मात्र, काळाची गरज ओळखून आता भारतातही हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी सेंटर सुरू होत आहे.

अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिच्या उपस्थितीत येत्या ३ जून २०२३ रोजी एफ. सी रोड, पुणे येथे हार्मोन हब, हार्मोन रिप्लेसमेंट आणि वेलनेस सेंटरचे उद्घाटन होणार आहे. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत.

हार्मोन हब विषयी बोलताना हार्मोन वेलनेस क्लिनिक्स प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. महेश ब्राम्हणकर म्हणाले, हार्मोन हब म्हणजेच हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आणि वेलनेस सेंटर ही एक अशी अभिनव संकल्पना आहे की, ज्यात आपल्या हार्मोन्स च्या समस्यांवर तज्ञाकडून एलोपथीं उपचार तर होतीलच, परंतु त्यासोबत म्युझिक थेरपी,प्राणिक हिलिंग,कौन्सेलिंग प्रोग्राम्स,आहाराचा सल्ला तसेच लाइफ कोचिंग अश्या ३६० डिग्री दृष्टीकोनातून रुग्णाचा सर्वांगीण उपचार केला जाईल.

इथे रुग्णाला सरसकट ठराविक औषधे किंवा एकसमान उपचार पद्धती न अवलंबता, रुग्णांच्या गरजेनुसार प्रत्येकावर उपचार केले जाणार आहेत. असे ‘हार्मोन हब’ चे संचालक डॉ विक्रम दोशी म्हणाले.

आपल्या शरीरातील ग्रंथी या हार्मोन्स सीक्रेट करत असतात. ज्यामुळे शरीरात शारीरीक, मानसिक असे अनेक अंतर्बाह्य बदल होत आसतात. राजोवृत्ती, नैराश्य, वंध्यत्व, शारीरिक कमजोरी, उंची खुंटणे, इरेक्टाईल डिसफंक्शन, केस गळणे, अकारण थकवा जाणवणे, तणाव जाणवणे अश्या अनेकविध समस्या चे निराकरण अभिनव उपचार पद्धतीने केले जाईल असे संचालक डॉ सूरज कोडक (एम डी) म्हणाले.

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये देखील हॉर्मोन थेरपी ने सकारात्मक बदल घडू शकतात, असे मत ‘हार्मोन हब’ चे संचालक ज्येष्ठ कॅन्सर सर्जन डॉ. राकेश नेवे ह्यानी व्यक्त केले.

हे अश्या प्रकारचे आपल्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिलेच हार्मोन क्लिनिक असणार आहे. येत्या काळात ज्याची पुनरावृत्ती अनेक मोठ्या शहरात करण्याचा आमचा मानस आहे असेही डॉ महेश ब्राह्मणकर यांनी सांगितले.

रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने आयोजित कोथरूड शॉपिंग फेस्टला उत्स्फूर्त प्रतिसादपुणे : महिला नवउद्योजकांनी तयार केलेल्...
08/06/2023

रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने आयोजित कोथरूड शॉपिंग फेस्टला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : महिला नवउद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भरवण्यात आलेल्या रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या कोथरूड शॉपिंग फेस्टला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उन्हाची तीव्रता असतानाही कोथरूडकरांनी महिला नव उद्योजिकांना प्रोत्साहन दिले.

सामाजिक दायित्वाच्या जाणिवेतून महिला नव उद्योजिका आणि सेवाभावी संस्था यांना व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने कोथरूड शॉपिंग फेस्ट सीजन २ भरवण्यात आले होते. रोटरियन डॉ. ऋचा वझे - मोकाशी यांच्या संकल्पनेतून या 'कोथरूड शॉपिंग फेस्ट सीजन २' भरवण्यात आले. यामध्ये रोटरी क्लब ऑफ गांधी भवनचे अध्यक्ष रोटरियन पद्मजा जोशी, सचिव रोटरियन अश्विनी शिलेदार, पुष्कर मोकाशी, शशांक टिळक, मनीष धोत्रे, दीपा पुजारी, प्रसाद पुजारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

याविषयी माहिती देताना डॉ. ऋचा वझे - मोकाशी म्हणाल्या, महिला उद्योजिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने व सामाजिक कार्याला हातभार लावण्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या शॉपिंग फेस्ट मध्ये १०० हून अधिक महिला नव उद्योजिकांनी सहभाग घेतला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी केलेल्या आवाहनाला पुणेकरांनी आणि कोथरूडवासीयांनी प्रतिसाद देत हा फेस्ट यशस्वी केला.

दरम्यान, कोथरूड शॉपिंग फेस्ट मध्ये अभिनेत्री विभावारी देशपांडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या, महिला उद्योजकांवर आधारीत 'बटरफ्लाय' या चित्रपटांचे प्रमोशन करण्यात आले. याशिवाय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेटी दिल्या.

रोटरी क्लब गांधी भवन मागील २२ वर्षांपासून कार्यरत असून या काळात क्लबने विविध सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला आहे. या उपक्रमाचे सुवर्ण प्रायोजक गंगोत्री हॉलिडे आणि होम्स,इव्हेंट प्रायोजक वासू इव्हेंट्स तर पावर्ड बाय क्रिस्टल किया आणि खादी वर्ल्ड आहेत.

रोटरी तर्फे महिला उत्पादकांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी - चंद्रकांतदादा पाटीलरोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या व...
08/06/2023

रोटरी तर्फे महिला उत्पादकांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी - चंद्रकांतदादा पाटील

रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने आयोजित कोथरूड शॉपिंग फेस्ट सुरू

पुणे : महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळाली नाही तर त्या खूप खचतात, आशा वेळी त्यांच्या प्रॉडक्टला ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचे काम रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने कोथरूड शॉपिंग फेस्ट च्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून होत आहे. ही खूप चांगली बाब आहे. मात्र, वर्षातील काही दिवसच अशी सोय उपलब्ध करून देण्यापेक्षा रोटरी तर्फे महिला उत्पादकांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी. तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना यामध्ये प्राधान्यक्रमाने स्थान द्यावे, अशी अपेक्षा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

सामाजिक दायितवाच्या जाणिवेतून महिला नव उद्योजिका आणि सेवाभावी संस्था यांना व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने कोथरूड शॉपिंग फेस्ट सीजन २ भरवण्यात आले आहे. याचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. अनिल परमार, डिस्ट्रिक्ट ऑफिसर आदी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच रोटरियन डॉ. ऋचा वझे - मोकाशी, रोटरी क्लब ऑफ गांधी भवनचे अध्यक्ष रोटरियन पद्मजा जोशी, सचिव रोटरियन अश्विनी शिलेदार, पुष्कर मोकाशी, शशांक टिळक, मनीष धोत्रे, दीपा पुजारी, प्रसाद पुजारी, ऍड मंदार जोशी रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय निमंत्रक, ऍड अर्चिता मंदार जोशी मा. सदस्य बार असोसिएशन आदी उपस्थित होते. हा शॉपिंग फेस्ट उद्या (दि. २८ मे ) पर्यंत सर्वांसाठी खुला असणार आहे.

डॉ. ऋचा वझे - मोकाशी यांच्या संकल्पनेतून या कोथरूड शॉपिंग फेस्ट ची सुरूवात झाली. याविषयी माहिती देताना डॉ. ऋचा वझे - मोकाशी म्हणाल्या, सामाजिक कार्याला हातभार लावण्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या शॉपिंग फेस्ट मध्ये १०० हून अधिक महिला नव उद्योजिका सहभाग घेतला आहे. महिला उद्योजिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतु आहे यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी शॉपिंग फेस्ट ला भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

रोटरी क्लब गांधी भवन मागील २२ वर्षांपासून कार्यरत असून या काळात क्लबने विविध सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला आहे. या उपक्रमाचे सुवर्ण प्रायोजक गंगोत्री हॉलिडे आणि होम्स,इव्हेंट प्रायोजक वासू इव्हेंट्स तर पावर्ड बाय क्रिस्टल किया आणि खादी वर्ल्ड आहेत.

रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने कोथरूड शॉपिंग फेस्ट चे आयोजन- २७ आणि २८ मे २०२३ रोजी महिला नव उद्योजिका, सेवाभावी संस्...
08/06/2023

रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने कोथरूड शॉपिंग फेस्ट चे आयोजन

- २७ आणि २८ मे २०२३ रोजी महिला नव उद्योजिका, सेवाभावी संस्थांना मिळणार व्यासपीठ

पुणे : रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने कोथरूड शॉपिंग फेस्ट सीजन २ चे आयोजन करण्यात आले आहे. २७ आणि २८ मे २०२३ रोजी होणाऱ्या या शॉपिंग फेस्ट सीजन २ मध्ये रोटरी क्लबने सामाजिक दायितवाच्या जाणिवेतून महिला नव उद्योजिका आणि सेवाभावी संस्था यांना व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याची माहिती रोटरियन डॉ. ऋचा वझे - मोकाशी यांनी दिली. तसेच यावेळी महासंचालक डॉ.अनिल परमार हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हा उपक्रम डॉ ऋचा वझे - मोकाशी यांच्या पुढाकाराने होत आहे. तर यामध्ये रोटरी क्लब ऑफ गांधी भवनचे अध्यक्ष रोटरियन पद्मजा जोशी, सचिव रोटरियन अश्विनी शिलेदार, पुष्कर मोकाशी, शशांक टिळक, मनीष धोत्रे, दीपा पुजारी, प्रसाद पुजारी यांचा सहभाग असणार आहे.

कोथरूड शॉपिंग फेस्ट सीजन २ बद्दल अधिक माहिती देताना डॉ. ऋचा वझे - मोकाशी म्हणाल्या, सामाजिक कार्याला हातभार लावण्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शॉपिंग फेस्ट चे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते २७ मे रोजी सकाळी १० वाजता गांधी भवन कोथरूड येथे होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या शॉपिंग फेस्ट मध्ये ८० हून अधिक महिला नव उद्योजिका सहभाग घेणार आहेत. महिला उद्योजिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतु आहे यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी शॉपिंग फेस्ट ला भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

रोटरी क्लब गांधी भवन मागील २२ वर्षांपासून कार्यरत असून या काळात क्लबने विविध सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला आहे. या उपक्रमाचे सुवर्ण प्रायोजक गंगोत्री हॉलिडे आणि होम्स,इव्हेंट प्रायोजक वासू इव्हेंट्स तर पावर्ड बाय क्रिस्टल किया आणि खादी वर्ल्ड आहेत.

भीमयोद्धा फाउंडेशन आयोजित मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या लोगो आणि टी-शर्टचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटी...
08/06/2023

भीमयोद्धा फाउंडेशन आयोजित मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या लोगो आणि टी-शर्टचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते अनावरण

- मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा रंगणार २९, ३० आणि ३१ मे रोजी

- राजकीय पक्ष, कलाकार, पत्रकार, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते भिडणार क्रिकेटच्या मैदानात

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम योद्धा फाउंडेशन आयोजित क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि छत्रपती कलाकार लीग निमंत्रित स्वर्गीय डी.बी देवधर स्मरणार्थ मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा येत्या २९,३०, आणि ३१ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या क्रिकेट लिगाच्या लोगो आणि सहभागी टीमच्या टी-शर्ट चे अनावरण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे प्रमोद नाना भानगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब बोडके, आर पी आय चे परशुराम वाडेकर,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गजानन थरकुडे,भाजप चे धीरज घाटे, मनसे चे सागर पाठक,सामाजिक संस्था तर्फे लिज्जत पापड चे सुरेश कोते, कलाकार तर्फे अभिनेत्री प्रिया बेर्डे, चेतन चावडा,अभिजित कोठवालकर आयोजक ॲड मंदारभाऊ जोशी- भीमयोद्धा फाउंडेशन,संदीप खर्डेकर- क्रिएटिव्ह फाउंडेशन,रमेश परदेशी- छत्रपती कलाकार लीग यांच्यासह जितेश दामोदरे, भारत भोसले, गणेश गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, अनेकदा दैनंदिन आयुष्यात राजकारणात भाष्य करताना एकमेकांबद्दल मनात कटुता नसतानाही कडू बोलावं लागतं. ही कटूता संपावी या उद्देशाने भीम योद्धा फाउंडेशनच्या वतीने राजकीय पक्ष, कलाकार, पत्रकार, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये राजकीय पक्ष कार्यकर्ते, कलाकार, पत्रकार, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट लीग बद्दल माहिती देताना ॲड मंदारभाऊ जोशी म्हणाले, या स्पर्धेत भाजप, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मनसे, मराठी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, पत्रकार आणि कलाकार यांच्या टीम सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा येत्या २९,३०, आणि ३१ मे २०२३ रोजी गेम ऑन स्पोर्ट्स ग्राऊंड, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर, कोथरूड येथे सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत रंगणार आहे.

शिवकालीन मर्दानी खेळ आणि लाईट साउंड शो मधून साजरा झाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवपुणे : तलवारबाजी, दांडपट्ट...
08/06/2023

शिवकालीन मर्दानी खेळ आणि लाईट साउंड शो मधून साजरा झाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव

पुणे : तलवारबाजी, दांडपट्टा असे शिवकालीन मर्दानी खेळ, लाईट अँड साउंड शो आणि 'स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी' या मालिकेतील कलाकारांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात कसबा पेठेतील फडके हौद चौकात साजरा करण्यात आला.

या भव्य, नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन किशोर उर्फ राजेंद्र भगवान तरवडे, संचालक, जय भवानी सहकारी बँक लिमिटेड , नवदीप तरुण मंडळ, शिवशक्ती प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले होते.

याप्रसंगी हेमंत रासने मा.अध्यक्ष स्थायी समिती,प्रसिद्धी प्रमुख भाजपा हेमंत लेले, मा.नगरसेवक धीरज घाटे, मा.नगरसेवक पल्लवी जावळे, भाजपा मा. विरोधी पक्ष नेते सुहास कुलकर्णी, प्रमोद कोंढरे-अध्यक्ष कसबा मतदारसंघ, ऍड. मंदार जोशी राष्ट्रीय निमंत्रक आर पी आय, भाजप सरचिटणीस राजेंद्र काकडे,मा. नगरसेवक योगेश समेळ, सामाजिक कार्यकर्ते उमेश चव्हाण,अरविंद कोठारी लक्ष्मण आबा तरवडे , नवदीप तरुण मंडळ, शिवशक्ती प्रतिष्ठान, प्रभाग क्रमांक १६ आणि १७ मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते व व्यापारी आघाडी संघटना सदस्य आदि उपस्थित होते.

यावेळी मर्दानी खेळ त्र्यंबकेश्वर प्रतिष्ठान आखाडा, कसबा पेठ यांनीं सादर केले तर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेतील बहिर्जी नाईक ( अजय तापकिरे) , हिरोजी फर्जद ( रमेश रोकडे), सिद्धी खेरत ( विश्वजित फडते) , अनाजी पंत ( महेश कोकाटे), ज्योत्येजी ( गणेश लोणारे) आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आयोजक किशोर उर्फ राजेंद्र भगवान तरवडे म्हणाले, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी प्रत्येक गावातील आणि शहरातील मंडळांनी धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती वैविध्यपूर्ण उपक्रमांनी साजरी केली पाहिजे. या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्यानिमित्त आयोजकांनी अनाथांना अन्नदान केले.

प्रणव रावराणे झळकणार 'गुगल आई' चित्रपटात- दाक्षिणात्य निर्माता, दिग्दर्शकाचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पणसध्या दाक्षिणात...
08/06/2023

प्रणव रावराणे झळकणार 'गुगल आई' चित्रपटात

- दाक्षिणात्य निर्माता, दिग्दर्शकाचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना पॅन इंडिया ओळख मिळाली आहे. दाक्षिणात्य चित्रपट बॉलीवूडला टक्कर देत असले तरी मराठी चित्रपट कंटेंट च्या जोरावर आपले वेगळेपण टिकवून आहेत. मराठी चित्रपटांचे हेच वेगळेपण लक्षात घेऊन पहिल्यांदाच दाक्षिणात्य निर्मिती संस्था, निर्माते आणि दिग्दर्शक एक हटके मराठी चित्रपट घेऊन येत आहेत. 'गुगल आई' असे या चित्रपटाचे नाव असून यामध्ये अभिनेता प्रणव रावराणे चित्रपटात बघायला मिळणार आहे.

आंध्र प्रदेश येथील प्रथितयश निर्माते सी दिवाकर रेड्डी हे आपल्या डॉलर्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि या संस्थेच्या माध्यमातून गुगल आई ची निर्मिती करत आहेत. तर गोविंद वराह यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तेलगू , तामिळ आणि कन्नड भाषेतील चित्रपट त्यांनी यापूर्वी दिग्दर्शित केले आहेत.

माय लेकीच्या नात्याचा आणि आई मुलीच्या गोडव्या चा वेगळा प्रवास 'गूगल आई' ह्या हटके टायटल असलेल्या चित्रपटांमधून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा व पटकथा गोविंद वराह यांचीच असून अमित नंदकुमार बेंद्रे ह्यांनी संवाद लिहिले आहेत. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सचिन अशोक वाडकर आहेत तर असोसिएट दिग्दर्शक म्हणून अर्जुन भोसले हे काम पहात आहेत, चित्रपटात चार श्रवणीय गाणी असून ती गाणी संगीतबध्द करण्याची उत्तम कामगिरी सागर शिंदे ह्यांनी पार पाडली आहे.ह्या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन मयूर आडागळे हे करणार आहेत.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक गोविंद वराह म्हणाले की, अनेक सिनेमा मधून आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिकणार प्रवण रावराणे प्रमुख भूमिकेत असून ह्या चित्रपट प्रणव ने आता पर्यंत केलेल्या कामांपेक्षा वेगळा असेल.तसेच ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर, अश्विनी कुलकर्णी यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रासह हैद्राबाद, सिकंदराबाद व आसपासच्या भव्य लोकेशन वर होणार असल्याचे गोविंद वराह ह्यांनी सांगितले.

निर्माते सी दिवाकर रेड्डी म्हणाले, मराठी माणसे पहिल्या पासून मदतीला धावून येण्यास तत्पर असतात हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे. ह्याला ही रसिकांनी अशीच भरभरून दाद द्यावी ही गणपती बाप्पा आणि व्यंकटेश भगवान चरणी प्रार्थना.

याप्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले असे वेगवेगळे भाषिक निर्माते दिग्दर्शक मराठी कडे आकर्षित होत आहेत.ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे.यामुळे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये चांगली चांगली निर्मिती होईल. उत्तर भाषिक चित्रपटा प्रमाणे वेगळे दर्जेचे चित्रपट या माध्यमातून येतील.कलाकार तंत्रज्ञ यांना काम मिळेल आणि अशा निर्मात्यांचे दिग्दर्शकांचे मराठी चित्रपट सृष्टीत स्वागत आहे. आणि चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

आयपीईव्ही च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाले भारतीय हवाई दलातील करिअर विषयक मार्गदर्शनपुणे : भारतीय हवाई दलाचा इतिहा...
08/06/2023

आयपीईव्ही च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाले भारतीय हवाई दलातील करिअर विषयक मार्गदर्शन

पुणे : भारतीय हवाई दलाचा इतिहास व त्यातील करिअरच्या संधी याविषयीचे मार्गदर्शन भारतीय हवाई दल प्राधिकरणाने इंडक्शन पब्लिसिटी एक्झिबिशन व्हेईकलच्या माध्यमातून आज पुणे इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना मिळाले.

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजीचे संस्थापक भारत नामदेव पाटील यांच्या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी “भारतीय हवाई दलातील करिअर मार्गदर्शन (IAF)” या विषयावर एक दिवसीय कार्यक्रमाचे (ड्राइव्ह) आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी भारतीय हवाई दल प्राधिकरणाने इंडक्शन पब्लिसिटी एक्झिबिशन व्हेईकल (IPEV) ड्राईव्हची व्यवस्था या विद्यार्थ्यांसाठी आज उपलब्ध करून देण्यात आली. तसेच यावेळी पुणे इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी संस्थेमध्ये इंडक्शन पब्लिसिटी एक्झिबिशन व्हेईकल (IPEV) चे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी कमिशंड ऑफिसर फ्लाइट लेफ्टनंट जी. सिंग यांनी व त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, इंडक्शन पब्लिसिटी एक्झिबिशन व्हेईकल मध्ये सुखोईचे एअरक्राफ्ट सिम्युलेटर बसवलेल आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी विमानाच्या सिम्युलेटर फ्लाइंग चा अनुभव घेतला. यामध्ये फायटर पायलटचा अद्यावत गणवेश देखील आहे. तसेच भारतीय हवाई वायु दलाच्या विविध लढावू विमानाच्या प्रतिकृती व त्या विषयीची माहिती विद्यार्थ्यांना जाणून घेता आली.

याविषयी बोलताना पुणे इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजीचे संस्थापक भारत नामदेव पाटील, म्हणाले, 10 वी, 12 वी, व पदवी झाल्यावर भारतीय हवाई दलात जाण्यासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत. याशिवाय एव्हिएशन अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर भारतीय हवाई दलात नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध होवू शकतात, यावर मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची दिशा ठरवण्यास मदत होईल. भारतात केवळ दोनच ठिकाणी आयपीईव्ही ही उपलब्ध आहे. या मार्गदर्शन कार्यक्रमासाठी खास बंगलोर येथून ही आयपीईव्ही बोलवण्यात आली . विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजेरी लावली.
यावेळी यावेळी प्राचार्य जे. जे. वाणी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच शास्वत रंजन पती सर, विलास गव्हाणे सर, राकेशकुमार श्रीवास्तव सर, संतोष पाटील सर, सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आयपीईव्ही ही तीन वाहनांची तुकडी आहे ज्यात एक व्होल्वो बस आणि दोन हलकी वाहने आहेत. कमिशंड ऑफिसर फ्लाइट लेफ्टनंट जी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली IAF च्या १२ अधिकार्‍यांचा या टीममध्ये समावेश आहे.

महिला डॉक्टरांच्या चॅरिटी फॅशन शो मधून दुर्गम भागातील एक लाख महिलांना देणार सॅनिटरी नॅपकिन्स व मुलींना एचपीव्ही लसीकरण द...
08/06/2023

महिला डॉक्टरांच्या चॅरिटी फॅशन शो मधून दुर्गम भागातील एक लाख महिलांना देणार सॅनिटरी नॅपकिन्स व मुलींना एचपीव्ही लसीकरण देणार मोफत

पुणे : अलीकडे फॅशन शोचे पर्व फुटलेले आहे. पाच - सहा वर्षांच्या बालकांपासून पन्नाशी गाठलेल्या महिला - पुरुषांचेही फॅशन शो होत असतात. या सर्व फॅशन शो पेक्षा एक आगळा - वेगळा, सामाजिक बांधिलकी आणि महिला आरोग्य जनजागृती घडवणारा फॅशन शो कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशिश प्रॉडक्शन्स घेणार आहे. या 'ग्लॅम डॉक' चॅरिटी फॅशन शो मध्ये फक्त महिला डॉक्टरांचा समावेश असणार आहे, या चॅरिटी फॅशन शोच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून राज्याच्या दुर्गम भागातील एक लाख महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स दिले जाणार आहेत, अशी माहिती कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पवार यांच्यासह डॉ. राजश्री ठोके, डॉ. श्रद्धा जवंजाळ, डॉ. वर्षा एस. कुऱ्हाडे,डॉ कविता कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.

फॅशन शो विषयी माहिती देताना योगेश पवार म्हणाले, आपल्या सामाजिक कर्तव्याच्या जाणिवेतून कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशिश प्रॉडक्शन्स च्या वत्तीने हा 'ग्लॅम डॉक' फॅशन शो आयोजित केला आहे. यामध्ये फक्त महिला डॉक्टरांचा सहभाग असणार आहे. पुण्यात जुलै महिन्यात हा शो होणार असून यामध्ये संपूर्ण राज्यभरातून दीडशेहून अधिक महिला डॉक्टर सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. या शोमध्ये दोन राऊंड होतील त्यातील पहिला राऊंड हा डिझायनर अर्थात फॅन्सी ड्रेस मध्ये असेल तर दूसरा राऊंड त्यांच्या व्हाईट एप्रॉन मध्ये होणार आहे. या फॅशन शो मधून जमा झालेल्या निधीतून दुर्गम भागातील एक लाख महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स दिले जाणार आहेत, यामुळे अधिकाधिक महिला डॉक्टरांनी यामध्ये सहभागी व्हावे, तसेच विविध हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज यांनी मदत करावी, असे आवाहन योगेश पवार यांनी केले आहे.

अलीकडच्या काळात अनेक महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाला सामोरे जावे लागते. गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंध म्हणून एचपीव्ही लसीकरण केले जाते. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस लस (HPV) ही विशिष्ट प्रकारच्या मानवी पॅपिलोमाव्हायरसच्या संसर्गास प्रतिबंध करणारी लस आहेत. उपलब्ध HPV लस एकतर दोन, चार किंवा नऊ प्रकारच्या HPV पासून संरक्षण करतात. सर्व HPV लसी किमान HPV प्रकार 16 आणि 18 पासून संरक्षण करतात. डॉ. श्रद्धा जवंजाळ यांच्या वतीने हे लसीकरण करण्यात येणार आहे. 4000 रुपये किमतीची लस ही कशिश सोशल फाउंडेशन व पिंक रेवॉल्युशन च्या वतीने 9 ते 16 वयोगटातील महिलांना मोफत देण्यात येणार आहे. तसेच दुर्गम भागातील महिलांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी दुर्गम भागातील महिलांना एक लाख सॅनिटरी नॅपकिन्स देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

या सामाजिक उपक्रमांबद्दल डॉ. राजश्री ठोके म्हणाल्या, मी यापूर्वी विविध फॅशन शो मध्ये सहभाग नोंदवला, अनेक पारितोषिके जिंकली आहेत. आपण समाजाचे देणे लागतो, महिला आरोग्य जनजागृती करण्यासाठी योगेश पवार यांनी या फॅशन शो ची संकल्पना मांडली ती मला डॉक्टर म्हणून अतिशय महत्वाची वाटली यामुळे मी या संकल्पनेचा भाग बनले आहे.

डॉ. श्रद्धा जवंजाळ म्हणाल्या, महिलांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करण्याची गरज आहे. त्यातही ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांचे स्वच्छता, आरोग्य याकडे दुर्लक्ष होत असते. कशिश सोशल फाउंडेशनची दुर्गम भागातील महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स देण्याची संकल्पना ही अत्यंत महत्वाची आहे, यामुळे या 'ग्लॅम डॉक' चॅरिटी फॅशन शो चा मी भाग झाले आहे.

Address

Bhosale Tarrace, 3rd Floor, Opp Deccan Rendezvous Hotel, Apte Road
Pune
411005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Siddhant Media & Publicity posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Siddhant Media & Publicity:

Share