
27/06/2025
पुणे शहरातील कोंढवा खुर्द परिसरातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जात आहेत. मिठानगर गल्ली क्रमांक ९, मन्नत गार्डन आणि परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये नियमित पाणीपुरवठा न झाल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना व्हावी यासाठी अँटी करप्शन स्क्वॉड चे अध्यक्ष वाजिद एस. खान यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन सादर केले. या निवेदनातून त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जी कारभारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, तात्काळ नवीन पाईपलाईन टाकून पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
वाजिद एस. खान यांच्या नेतृत्वाखालील या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, पाणीटंचाईच्या समस्येकडे अनेकदा लक्ष वेधूनही PMC प्रशासनाने अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत. त्यामुळे नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, PMC पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आज सदर भागात भेट देऊन पाहणी करून गेले आहेत आणि लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही केली जाईल,पाणी पिण्याचे लाईन टाकण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले आहे.
या प्रसंगी मन्नत गार्डन येथील सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज शेख, शाहरुख शेख आणि अँटी करप्शन स्क्वॉडचे अध्यक्ष वाजिद एस. खान उपस्थित होते आणि पाठपुरावा करत होते.