
26/02/2025
शिवमुद्रण प्रकाशन तर्फे महाशिवरात्रीच्या हार्दिक शिवमय शुभेच्छा - #संचालक #लेखक #कवी डॉ. #कुणाल #रसाळ🙏🙏🙏🙏🙏☘️☘️☘️☘️☘️☘️💮💮🌱🌱🌱💮💮💮
अनादि मी अनंत मी अवध्य मी भला |
मारिल रिपु जगति असा कवण जन्मला ||ध्रु||
अट्टहास करित जाई धर्मधारणी
मृत्युसीच गाठ घालू मी घुसे रणी
अग्नि जाळी मजसी ना खड्ग छेदितो
भिउनी मला भ्याड मृत्यु पळत सुटतो
खुळा रिपु तया स्वये
मृत्युच्याच भीतीने भिववु मजसी ये ||१||
लोटी हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळी ज्वालांच्या फेकशी जरी
हटुनी भवति रचिल शीत सुप्रभावती
आण तुझ्या तोफाना क्रूर सैन्य ते
यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते
हलाहला त्रिनेत्र तो
मी तुम्हासी तैसाची गिळुनी जिरवितो ||२||