अपरांत - Aprant

अपरांत - Aprant Publisher, Specially Indological Books related to Indian Culture, Art, Architecture, Literature and

अपरांत ही पुण्यामधली एक अग्रगण्य प्रकाशन संस्था आहे. अपरांत पुस्तक प्रकाशनाशिवाय पुस्तकांचे डी.टी.पी, कव्हर डिझाईन पासून ते पुस्तके छापुन बाईंडिंग करुन देण्यापर्यंतची सर्व प्रकारची कामे करते.

ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, शिवचरित्रकार श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांचे नवीन पुस्तक दि. १५ ऑगस्ट २०२५ ला उपलब्ध होईल. पुस...
12/08/2025

ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, शिवचरित्रकार श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांचे नवीन पुस्तक दि. १५ ऑगस्ट २०२५ ला उपलब्ध होईल. पुस्तकाचा विषय आपल्याला सोबतच्या मुखपृष्ठावरुन कळेलच.

अपरांतचे नवे पुस्तक कऱ्हाड प्रीतिसंगमावरचं आदितीर्थ,लेखक श्री विजय माळी.या पुस्तकात कऱ्हाडची नावाची महती आणि माहात्म्य, ...
08/08/2025

अपरांतचे नवे पुस्तक
कऱ्हाड प्रीतिसंगमावरचं आदितीर्थ,
लेखक श्री विजय माळी.
या पुस्तकात कऱ्हाडची नावाची महती आणि माहात्म्य, प्राचीन, मध्ययुगीन तसेच आर्वाचीन इतिहास, कऱ्हाड परिसरातील ऐतिहासिक अवशेष, वास्तू, प्रक्षणीय स्थळे यांची साद्यंत माहिती येते. कऱ्हाड परिसरातील जाखिणवाडी आणि आगाशिव बौद्ध गुंफा, नकट्या रावळाची विहिर, कऱ्हाडचे आद्य ग्रामदैवत श्री उत्तरालक्ष्मी, कऱ्हाड परिसरातील किल्ले तसेच गावातील भुईकोट या सगळ्यांची माहिती आहे. याशिवाय कऱ्हाडचे सुपुत्र कै. यशवंतराव चव्हाण यांचे निवासस्थान, स्मारक यांचीही माहिती दिलेली आहे. पुस्तकात भरपूर रंगीत छायाचित्रांचा सामावेश असल्याने पुस्तकाची उपयुक्तता वाढली आहे.
पुस्तकाची किंमत रु. २५०/- असुन याच किंमतीत भारतात कुठेही पुस्तक घरपोच मिळू शकते. आधिक माहितीसाठी 094036 05783 या नंबरवर संपर्क करावा.

’’कोण होते वाकाटक” जेष्ठ इतिहास संशोधक आणि डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती डॉ. अरविंद जामखेडकर यांनी लिहिलेले हे  पुस्तक अभ्य...
25/07/2025

’’कोण होते वाकाटक”
जेष्ठ इतिहास संशोधक आणि डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती डॉ. अरविंद जामखेडकर यांनी लिहिलेले हे पुस्तक अभ्यासकांना उपलब्ध आहे.
या पुस्तकात इ. सनाच्या ४थ्या ते ७व्या शतकातील मध्य भारतातील वाकाटक राजवट आणि त्यांच्या समकालीन इतर राजवटी जसे गुप्त, कदंब, कलचुरी, यांची माहिती दिलेली आहे. शिवाय तत्कालीन समाजातील राजकीय, सामाजिक आणि धार्मिक समजुती आणि चालीरितींची माहितीही दिलेली आहे.
पुस्तकाची किंमत रु. ५००/- याच किंमतीत भारतात कुठेही कुरियरने किंवा पोस्टाने घरपोच मिळेल. अधिक माहितीसाठी कृपया ९४०३६०५७८३ या नंबरवर संपर्क साधावा

देवगिरीचे यादव, मराठवाड्यातील ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांनी लिहिलेले हे पुस्तक आजही देवगिरीच्या या...
24/07/2025

देवगिरीचे यादव,
मराठवाड्यातील ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांनी लिहिलेले हे पुस्तक आजही देवगिरीच्या यादव घराण्याच्या माहितीचा प्रमुख स्त्रोत आहे. २०८ पानी या पुस्तकात यादव राजवटीतील सर्व प्रमुख राजांची आणि त्यांच्या कारकीर्दीची सविस्तर माहिती दिलेली आहे.
आर्य संस्कृतीचा भारतवर्षात प्रसार होण्यासाठी जे वंश आणि राजवटींनी महत्त्वाचे कार्य केले त्यात यादव वंशाचे नाव प्रामुख्याने घ्यायला लागेल. यादव राजवटीनेच राजपुताना, माळवा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, दक्ख्खन इत्यादी प्रदेशांत आपले राज्य स्थापन करुन आर्य संस्कृतीचा प्रचार केला.
वेसुगी, भिल्लम, सिंघण, जैतुगी, आमणदेव, रामचंद्रदेव असे अनेक एकापेक्षा एक बलाढ्य राजे यादव ३०० वर्षांच्या राजवटीत होऊन गेले.
या पुस्तकात आत्तापर्यंत यादवांचे मिळालेल्या सर्व शिलालेखांची यादी दिलेली आहे.
पुस्तकाची किंमत रु. ३००/- असुन अधिक माहितीसाठी 094036 05783 या नंबरवर संपर्क साधावा.

भारत इतिहास संशोधक मंडळाचे २०२५ चे त्रैमासिक. यावर्षी  त्रैमासिकात अनेक मान्यवर अभ्यासकांचे लेख असुन त्रैमासिकाची अनुक्र...
07/07/2025

भारत इतिहास संशोधक मंडळाचे २०२५ चे त्रैमासिक.
यावर्षी त्रैमासिकात अनेक मान्यवर अभ्यासकांचे लेख असुन त्रैमासिकाची अनुक्रमणिका सोबत जोडली आहे.
त्रैमासिकाचे प्रकाशन दि. ७ जुलैला होणार असुन १४० पानी या पुस्तकाची किंमत रु. ३०० आहे.
अधिक माहितीसाठी 094036 05783 या नंबरवर संपर्क साधावा.

भारत इतिहास संशोधक मंडळातील मोडी कागदपत्रांची सूची, खंड २ रा.  भारत इतिहास संशोधक मंडळाचे नवे पुस्तकसंपादक: वैशाली ढोरेय...
07/07/2025

भारत इतिहास संशोधक मंडळातील मोडी कागदपत्रांची सूची, खंड २ रा.
भारत इतिहास संशोधक मंडळाचे नवे पुस्तक
संपादक: वैशाली ढोरे
या पुस्तकात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित आटपाडी दफ्तर, कायगांवकर दीक्षित दफ्तर, य. न. केळकर दफ्तर आणि मंडळ संकीर्ण संग्रहातील कागदपत्रांचा समावेश आहे. मराठी नमुने दिलेले आहेत. हे कागद राजकीय, सामाजिक, आर्थिक, काौटुंबिक विषयांचे असून आर्थिक व्यवहार, जमिनीच्या संबंधित व्यवहार,लग्नाकार्याचा खर्च असे विषय आहेत.
पुस्तकाचे प्रकाशन दि. ७ जुलैला होणार असुन २०० पानी या पुस्तकाची किंमत रु. ६५० आहेभारत इतिहास संशोधक मंडळासाठी या पुस्तकाची निर्मिती अपरांतने केलेली आहे. अधिक माहितीसाठी 094036 05783 या नंबरवर संपर्क साधावा.

ऐतिहासिक संकीर्ण साहित्य, खंड २१, मराठी कागदपत्रांचे नमुनेभारत इतिहास संशोधक मंडळाचे नवे पुस्तकसंपादक: डॉ. अनुराधा कुलकर...
07/07/2025

ऐतिहासिक संकीर्ण साहित्य, खंड २१, मराठी कागदपत्रांचे नमुने
भारत इतिहास संशोधक मंडळाचे नवे पुस्तक
संपादक: डॉ. अनुराधा कुलकर्णी आणि सुषमा वैद्य.
या पुस्तकात मराठ्यांच्या इतिहासात सापडणारे १९ प्रकारचे मराठी कागदपत्रांचे नमुने दिलेले आहेत.
उदा. वाटणीपत्र, जाबिता वाटणी, सवादपत्र, कौलनामा, कतबा, खरेदीखत, आज्ञापत्र, वर्षासन, कतबा, मोईनपत्र वगैरे.
असे १९ प्रकारच्या कागदपत्रांचे नमुने या पुस्तकात दिलेले आहेत.
पुस्तकाचे प्रकाशन दि. ७ जुलैला होणार असुन १८२ पानी या पुस्तकाची किंमत रु. ६५० आहे.
भारत इतिहास संशोधक मंडळासाठी या पुस्तकाची निर्मिती अपरांतने केलेली आहे. अधिक माहितीसाठी 094036 05783 या नंबरवर संपर्क साधावा.

ऐतिहासिक संकीर्ण साहित्य, खंड २०, मराठी कागदपत्रांचे नमुनेभारत इतिहास संशोधक मंडळाचे नवे पुस्तकसंपादक: डॉ. अनुराधा कुलकर...
07/07/2025

ऐतिहासिक संकीर्ण साहित्य, खंड २०, मराठी कागदपत्रांचे नमुने
भारत इतिहास संशोधक मंडळाचे नवे पुस्तक
संपादक: डॉ. अनुराधा कुलकर्णी आणि सुषमा वैद्य.
या पुस्तकात मराठ्यांच्या इतिहासात सापडणारे ४४ प्रकारचे मराठी कागदपत्रांचे नमुने दिलेले आहेत.
उदा. बक्षिसपत्र, मिरासपत्र, मुचलका, दस्तक, गहाणखत, वरातचिठ्ठी, हप्तबंदी, साक्षपत्र, उच्चारपत्र, कबज, ताकीदपत्र वगैरे.
असे ४४ प्रकारच्या कागदपत्रांचे नमुने या पुस्तकात दिलेले आहेत.
पुस्तकाचे प्रकाशन दि. ७ जुलैला होणार असुन २२० पानी या पुस्तकाची किंमत रु. ६०० आहे
भारत इतिहास संशोधक मंडळासाठी या पुस्तकाची निर्मिती अपरांतने केलेली आहे. अधिक माहितीसाठी 094036 05783 या नंबरवर संपर्क साधावा.

संकर्षण सकळकळेकृत शिवकाव्य, छत्रपती शिवाजी महाराजांवर संकर्षण सकळकळे यांनी रचलेल्या संस्कृत काव्याच्या हस्तलिखिताचे संपा...
25/06/2025

संकर्षण सकळकळेकृत शिवकाव्य,
छत्रपती शिवाजी महाराजांवर संकर्षण सकळकळे यांनी रचलेल्या संस्कृत काव्याच्या हस्तलिखिताचे संपादन रा. पां गोस्वामी यांनी मराठी सारांशासहित केले. शिव चरित्रात घडलेल्या अनेक प्रसंगाचे वर्णन या काव्यात आलेले आहे. पुस्तकाला म. म. दत्तो वामन पोतदार यांची प्रस्तावना आहे. मूळ पुस्तक १९७४ साली भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रकाशित केले होते. आता पुन्हा ५१ वर्षानंतर मंडळ या पुस्तकाचे पुन:प्रकाशन करीत आहे. पुस्तकाची किंमत फक्त रु. १०० असुन पुस्तक मंडळात २०% सवलतीमधे उपलब्ध आहे.
भारत इतिहास संशोधक मंडळासाठी अपरांतने या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे.

शिव चरित्र वृत्तसंग्रह, खंड १ ते ३,खंड १ चे अनुवादक श्री पां. भी. देसाई आणि खंड २ व ३ चे संपादक ज्येष्ठ इतिहास संशोधक कै...
25/06/2025

शिव चरित्र वृत्तसंग्रह, खंड १ ते ३,
खंड १ चे अनुवादक श्री पां. भी. देसाई आणि खंड २ व ३ चे संपादक ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. ग. ह. खरे आहेत.
खंड १ मधे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित ८ बखरीवजा गद्यपद्यात्मक कानडी ग्रंथांचा अनुवाद दिलेला आहे. यावरुन आपल्याला कर्नाटकातील काही राजवटी, ग्रामनामे या विषयी माहिती मिळते. खंड २ मधे आदिलशाही इतिहासाची माहिती देणारे मुहम्मदनामा, तारीख-इ-अली, अलीनामा, हफ्तकुर्सी आणि बसातीनुस्सलातीन या पाच ग्रंथाचे भाषांतर सारांशरुपाने दिले आहे. खंड ३ मधे फुतुहात-इ-आदिलशाही, आलमगीर-नामा, मुस्तखबुल-लुबाब आणि मआसिर-इ- आलमगीरी या चार फार्सी ग्रंथातील फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित माहिती सारांश रुपाने दिलेली आहे. आता मंडळाने या तीनही खंडां एकत्र मिळून एक पुस्तक म्हणुन पुन:प्रकाशन करीत आहे. पुस्तकाची किंमत फक्त रु. ५०० असुन मंडळात २०% सवलतीमधे उपलब्ध असेल.
मंडळासाठी या पुस्तकाची निर्मिती अपरांतने केलेली आहे.

अपरांतचे नवे पुस्तक ’’श्री पंडरगे विठ्ठल” संत साहित्य आणि प्राचीन मराठी हस्तलिखितांचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. मधुकर रामदास ज...
30/05/2025

अपरांतचे नवे पुस्तक
’’श्री पंडरगे विठ्ठल”
संत साहित्य आणि प्राचीन मराठी हस्तलिखितांचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. मधुकर रामदास जोशी यांनी गेली काही वर्षे पंढरपूर आणि विठ्ठल यावर सखोल अभ्यास करुन लिहिलेले हे नवीन पुस्तक आता अभ्यासकांना उपलब्ध आहे.
या पुस्तकात जोशींनी पौण्डरिक क्षेत्री पुंडलिक वरद विठ्ठल, डिंडिश पांडुरंग आणि शैव संप्रदाय, पांडुरंग माहात्म्य रचना, पांडुरंग विठ्ठलच्या संबंधित ताम्रपट आणि शिलालेख यांच्यावर भाष्य केले आहे तसेच त्यांचे वाचनही दिलेले आहे. पुढील भागात दक्षिण भारतातील विठ्ठल यावर ही त्यांनी दक्षिणेतील काही नामवंत इतिहास संशोधकांनी केलेल्या मांडणीवर विवेचन केलेले आहे. याशिवाय वारकरी समाज आणि संत, आणि इतरही अनेक विषयांवर सविस्तर लिखाण केलेले आहे.
पुस्तकाला ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकरांची सुरेख प्रस्तावना आहे.
पुस्तकाची पृष्ठसंख्या ४१६ असुन किंमत रु. ६०० आहे. पुस्तक आता वाचकांना उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी कृपया 094036 05783 या नंबरवर संपर्क साधावा.

ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!।। ब्रह्मध्वजाय नम:।।नवर्षाभ...
30/03/2025

ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !
प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!
।। ब्रह्मध्वजाय नम:।।

नवर्षाभिनंदन
चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा
आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो !!!
🌷

Address

41, Girijadham, Rajendranagar, Navi Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+919822047102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अपरांत - Aprant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to अपरांत - Aprant:

Share

Category

Our Story

अपरांत ही पुण्यामधली एक प्रकाशन संस्था आहे. अपरांत पुस्तक प्रकाशनाशिवाय पुस्तकांचे डी.टी.पी, कव्हर डिझाईन पासून ते पुस्तके छापुन बाईंडिंग करुन देण्यापर्यंतची सर्व प्रकारची कामे करते. अपरांतने आत्ता पर्यंत जवळपास १०० पेक्षा जास्त पुस्तके छापुन प्रसिध्द केली आहेत.