Sail Raut

Sail Raut This is the page of my youtube channel. On that channel I will post my vlogs and useful pub

Today in the early morning I went for a morning walk and I saw a crowd of people gathered around one South Indian food s...
23/04/2023

Today in the early morning I went for a morning walk and I saw a crowd of people gathered around one South Indian food stall where one typical South Indian aunty was preparing and selling Idli-Medu wada sambhar so just out of curiosity I
decided to take home that idli-wada that she was selling there.

When I started to eat that then I realized why there were so many people standing and why they were waiting
to take home breakfast (Idli & Medu Vada) prepared by Aunty.

I don't want to disclose pics of that food stall due to some reason but It is very close to Kotak IT Park, Goregaon East and I would suggest to all of you visit Aunty's stall.

बऱ्याच दिवसानी ऐरोली ला आत्याकडे जाण्याचा योग आला आणि आत्येकडे माझी चुलत मावसबहीण सुद्धा आलेली! मग काय मस्त गप्पा टप्पा ...
10/04/2023

बऱ्याच दिवसानी ऐरोली ला आत्याकडे जाण्याचा योग आला आणि आत्येकडे माझी चुलत मावसबहीण सुद्धा आलेली! मग काय मस्त गप्पा टप्पा रंगल्या आणि सर्व गप्पा संपल्या तेव्हा असं आमचं फोटोसेशन चालू होत, फोटो तसे बरेच काढलेले आहेत पण त्यात आवडीचा आणि हाच एक बरा आलेला फोटो इकडे पोस्ट करतोय!

जगात शेवटी जेव्हा माणूस आपल्या माणसांना भेटतो तेव्हाच आपलुकीच्या नात्यातल्या ओलाव्याची जाणं माणसाला होते आणि माणूस कायम आतून सदाबहार राहतो ! म्हणून आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..नाहीतर, तासभर साथ देणारी माणसे तर, बस मध्ये पण भेटतात..

चुलीवर भाजलेले काजू 😇😇❤️मला आठवतं मी जेव्हा लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये गावी जायचो तेंव्हा आम्ही सगळी मुले म्हणजे...
09/04/2023

चुलीवर भाजलेले काजू 😇😇❤️

मला आठवतं मी जेव्हा लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये गावी जायचो तेंव्हा आम्ही सगळी मुले म्हणजे मी आणि काकांची मुले सगळे मिळून आमच्या शेतातील काजूच्या झाडाच्या बिया जमवायचो आणि मग चुली मध्ये भाजायचो आणि भाजून झाल्यावर जे काजू आम्ही खायचो ना त्या काजू ची टेस्ट आताच्या पोलिश काजूला येणारच नाही … आज हा फोटो बघितला आणि लहानपणी च्या आठवणी ताज्या झाल्या !! खरंच परत कधीच येणार नाहीत ते दिवस !!

आज नको नको म्हणताना माझ्या मित्राने भरपूर आग्रह  केला आणि शेवटी मला त्याच्या घरी जेवायला जावं लागल कारण अगदीच नाही म्हणा...
07/04/2023

आज नको नको म्हणताना माझ्या मित्राने भरपूर आग्रह केला आणि शेवटी मला त्याच्या घरी जेवायला जावं लागल कारण अगदीच नाही म्हणालो असतो तर त्याला कदाचित वाईट वाटलं असत पण जेव्हा त्याच्या घरी जाऊन जेवलो तेव्हा मला कळूनं चुकलं कि आज मी जर नाही आलो असतो तर एका चांगल्या घरगुती पाककृती ला मुकलो असतो आणि ती पाककृती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या कोकणातील फिश थाळी होती.

मित्राच्या आईने जवळ्याची चटणी आणि पापलेट असे काही बनवले होते कि अगदी खाऊन मान तृप्त झाल्यासारखं वाटलं.

आणि मित्र ज्याचा फोटो मी इथे टाकत आहे ..जेवायला माझ्यासोबत कंपनी द्यायला बसलेला कारण मी जेवताना लाजू नये म्हणून अगदी जेवायला बसलेला असताना देखील त्याला मिठी मारायला मन करत होत!

ते बोलतात ना कि बाहेर किती हि चांगल्या रेस्टॉरंट मध्ये जे वा किती हि चांगलं खा पण जे घरच जेवण ते घरच जेवण!

Address

Punjab

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sail Raut posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sail Raut:

Share