23/08/2022
संपूर्ण विश्वातील सर्व प्राण्यांमध्ये मानव हा सर्वात श्रेष्ठ प्राणी आहे. या विश्वाचा एक भाग असल्याने मला माझ्यासारखे लाखो माणसे असलेल्या जगात लहान वाटते. जरी प्रत्येकजण त्यांच्या स्वत: च्या मार्गाने अगदी अद्वितीय आहे. वय, लिंग, कौटुंबिक पार्श्वभूमी, राष्ट्रीयत्व किंवा वंश विचारात न घेता मी नम्र, दयाळू आणि मला भेटत असलेल्या प्रत्येकाचा आदर करण्याचा प्रयत्न करतो. स्वतःबद्दल लिहिणे हे सोपे काम नाही कारण एकतर अतिशयोक्ती करणे किंवा आवश्यक असल्यास संक्षिप्त वर्णन आणि प्रशंसा करण्यात अयशस्वी होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मी माझी ओळख करून देत आहे.
नमस्कार मंडळी! माझं नाव साईल कृष्णा राऊत आहे मी मूळचा कोकणातला पण राहणार मुंबई, मुंबईत मध्ये एका टिपिकल मध्यमवर्ग कुटुंबपद्धती मधून आहे. मी माहिती तंत्रज्ञान (संगणक अभियंता) असून सध्या एका एम.एन.सी मध्ये जॉब करतो, माझ्या संबंधित सर्व कानाडोळा करण्याबाबतच्या गोष्टींबद्दल मला वाटतं सांगून झालेले आहे… !
हे सगळं गाठीला ठेवून म्हणजे माझी कौटुंबिक जबाबदारी सांभाळून मला प्रवास करणे आणि नवीन लोकांना भेटणे आवडते. मी एक आउटगोइंग व्यक्ती आहे आणि लोकांमध्ये जाऊन लोकांशी मिळण्यात, लोकांबरोबर मिसळण्यात त्यांच्या कडच्या नवीन गोष्टी , त्यांचे विचार, त्यांची मते जाणून घेता घेता मी पूर्ण भारत भर खाद्य-भ्रमंती करत असतो, कविता तसेच लेख लिहितो तसेच भरपूर साऱ्या गोष्टी करत असतो.
मला पण तुम्ही विचाराल कि हे सगळं सांगण्याचं कारण काय तर .. तर हे सगळं सांगण्याचं कारण हेच कि, मी आज पासून माझी डिजिटल जर्नी म्हणजे सोशल मीडिया वरचा माझा प्रवास सुरु करतोय ..आणि त्याच साठी माझ्या मनात विचार आला कि का नको हे सगळं आपल्या मित्र परिवार, आप्तेष्ट यांच्यासोबत आपल्याच स्वतःच्या हक्काच्या व्यासपीठावर शेयर करावं.! तर या प्रवासात तुम्हा सगळ्यांची साथ आणि प्रेम माझ्या सोबत कायम असेल हीच अपेक्षा ठेवून माझ्या प्रवासाचा श्रीगणेशा करतो !