Raigad INFO - रायगड इन्फो

Raigad INFO - रायगड इन्फो Find every single information about Raigad. Such as popular places, news, knowledge, health, politics

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात शनिवार २७ आणि सोमवार २९ सप्टेंबर रोजी  #ऑरेंजअलर्ट, रविवारी २८ सप्टेंबर र...
26/09/2025

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात शनिवार २७ आणि सोमवार २९ सप्टेंबर रोजी #ऑरेंजअलर्ट, रविवारी २८ सप्टेंबर रोजी #रेडअलर्ट देण्यात आला आहे.

14/09/2025

मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर येथे आर्टिगा गाडी जळून खाक. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. सर्व प्रवासी सुरक्षित.

दिघी सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली असून अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. श्रीवर्...
14/09/2025

दिघी सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली असून अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. श्रीवर्धनमधील मणेरी नानवली च्या समुद्र किनारी गावातील नागरिकांना संशयित वस्तू सापडली असता लगेच दिघी सागरी पोलिस ठाण्यात संपर्क साधला..

दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली असून अमली पदार्थाचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी अंदाजे १२:३० वाजता मौजे मणेरी नानवली गावच्या हद्दीतील समुद्राकिनारी कोणीतरी अज्ञात इसमाने गैरकायद्याने विक्री करण्याच्या उद्देशाने टाकून दिलेला ११ किलो ५६६ ग्रॅम वजनाचा 'चरस' हा अमली पदार्थ पोलिसांच्या हाती लागला आहे. या अमली पदार्थाची बाजारमूल्ये तब्बल ५१ लाख ८३ हजार रुपये इतकी असल्याचे समजते.
या प्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाणे गु.रं. ६१/२०२५ नुसार एन.डी.पी.एस. अधिनियम, १९८५ चे कलम ८ (उ), २० (ब)(ळळ)ळ, २२ (ळ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक चौकशीत हा चरस परदेशातून समुद्रमार्गे आणत किनाऱ्यावर टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या मागील टोळी व संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासणी चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.
अधिकाऱ्यांचा तपास सपोनि श्री. हनुमंत शिंदे हे करीत आहेत. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर कार नेणाऱ्या अतिउत्साही चालकावर गुन्हा दाखल. पर्यटकांनी जपून स्वतः आणि इतरांची काळजी घेऊन पर्य...
14/09/2025

रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर कार नेणाऱ्या अतिउत्साही चालकावर गुन्हा दाखल. पर्यटकांनी जपून स्वतः आणि इतरांची काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा...

😱📍 नेपाळमधील अशांतीचं खरं कारण काय? भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि सोशल मीडिया बंदीमुळे तरुण रस्त्यावर! भारताचा प्रवास सल्ला ...
10/09/2025

😱📍 नेपाळमधील अशांतीचं खरं कारण काय? भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि सोशल मीडिया बंदीमुळे तरुण रस्त्यावर! भारताचा प्रवास सल्ला काय?

▶️ नेपाळ, जो भारताचा शेजारी देश आहे, सध्या दशकातील सर्वात मोठ्या राजकीय आणि सामाजिक उलथापालथीचा सामना करत आहे. ही अशांती 'जनरेशन Z' (जेन Z) म्हणजे १३ ते २८ वर्षे वयोगटातील तरुणांनी सुरू केलेल्या आंदोलनांमुळे उद्भवली आहे.

⛔ नेपाळमधील अशांतीची सुरुवात: ट्रिगर पॉइंट्स काय आहेत..
सविस्तर बातमी जाणून घ्या 👇

https://raigadexplore.in/?p=5106

महाड ते पनवेल असा प्रवास करणारी एसटी बस क्रमांक MH06 बी डब्ल्यू 7989 मारुती नेक्सा शोरूम समोर आले वेळी समोरून येणारा पिक...
07/09/2025

महाड ते पनवेल असा प्रवास करणारी एसटी बस क्रमांक MH06 बी डब्ल्यू 7989 मारुती नेक्सा शोरूम समोर आले वेळी समोरून येणारा पिकप क्रमांक 15JW 4431. चालक राहणार पंचवटी नाशिक हा अचानक रॉंग साईडला आल्याने एसटी वरील चालक हनुमंत चोरमले यांनी अपघात रोखण्याकरिता आपले ताब्यातील एसटी डाव्या बाजूला खेचली असता ती चरामध्ये कलंडली.... सदर एसटी मध्ये एकूण आठ प्रवासी होते कोणासही दुखापत नाही..

07/09/2025

इंदापूर, ता. माणगाव येथे बाप्पाच्या विसर्जनावेळी गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले होते...
Edit: designtine_7

रायगडचा राजा, पनवेल
06/09/2025

रायगडचा राजा, पनवेल

06/09/2025

इंदापूर येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागून दुकानदारांचे लाखोंचे नुकसान. माणगाव येथील अग्निशमन दलाच्या वाहनात पाणी व ड्रायवर नसल्याने रोहा येथून वाहन येईपर्यंत बाजूची दुकाने सुद्धा आगीत भस्मसात झाल्याचा दुकान मालकांचा आरोप.. मंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी पाहणी करून नुकसान भरपाई करण्याचे निर्देश दिले आहेत...

02/09/2025

02/09/25 (रात्री 11:00 वाजता): परतीच्या प्रवासात खारपाडा ब्रीजवरती थांबवलेल्या अवजड वाहनांची लांब रांग असल्याने थोड्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे...

02/09/2025

(02/09/25) कोकणकरांचा परतीचा प्रवास सुरू.. तुरळक ठिकाणी वाहतूक मंदावली आहे परंतु कोंडी नाही..

01/09/2025

कोकणातील निसर्गाच्या कुशीत साजरा होणारा गणेशोत्सव.. गणेश भक्तांच्या उत्साहाचा अभूतपूर्व सोहळा.

Address

Raigad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raigad INFO - रायगड इन्फो posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share