09/03/2026
भूम-परांडा-वाशीवर शिवसेनेचा भगवा! 🚩
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कणखर मार्गदर्शनाखाली आणि माजी आरोग्यमंत्री, कार्यसम्राट आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या झंझावाती नेतृत्वाखाली भूम, परांडा आणि वाशी या तिन्ही पंचायत समित्यांवर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी आज सावंत साहेबांच्या शुभहस्ते विशेष 'सन्मान सोहळा' पार पडला.
यावेळी सावंत साहेबांनी नवनियुक्त सभापती व उपसभापतींचा सत्कार करून त्यांना भावी लोकसेवेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी तिन्ही तालुक्यातील शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला. हा विजय म्हणजे केवळ राजकीय यश नसून, मतदारसंघात गेल्या काही वर्षांत झालेल्या विकासकामांवर जनतेने दिलेली ही 'पावती' आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या..
#शिवसेना