
19/04/2025
*रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे गोठ्याला भीषण आग
11 जनावरंचा होरपळून मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील गोळप डोंगरेवाडी येथील श्री वसंत महेश्वर बापट वय 58 यांच्या गुरांच्या गोट्याला शॉर्टसर्किटने आग लागल्याने गोट्यात बांधण्यात आलेली अकरा गुरे जागीच दगावली असून तीन जनावरे गंभीरित्या भाजलेली असून त्यांची प्रकृती गंभीर असून सहा जनावरांना वाचवण्यास यश मिळाले आहे त्यामुळे गोट्याची इमारत गवत आणि गुरांसहित सुमारे 12 लाख 59 हजार चे नुकसान झाले आहे.
वसंत महेश्वर बापट यांच्या घराजवळच गेले अनेक वर्ष कार्यरत असलेला गुरांचा गोठा असून त्यामध्ये गाई वासरे म्हशी व रेडा अशी 20 जनावरे यांचे पालन पोषण केले जाते आणि चांगल्या प्रकारे संगोपन केले जाते त्या दृष्टीने त्यांच्यासाठी गोट्यामध्ये गवत पेंढा व त्यांच्यासाठी लागणारे पशुखाद्य यांची चांगल्या प्रकारे तजवीज करण्यात आलेली होती काल रात्री 17 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास या परिसरातील वीजपुरवठा खंडित झालेला होता
: त्यानंतर विद्युत पुरवठा सुरू झाल्यानंतर या ठिकाणी विजेच्या अतिरिक्त भारामुळे शॉर्ट सर्किट झाल्याचे बोलले जात आहे त्यामुळे गोट्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाताचा पेंडा व गवत असल्यामुळे पेठ घेतला त्यानंतर तातडीने पोलीस ठाणे कामांमध्ये फोन केल्यानंतर फिनोलेक्स कंपनीचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर अग्निशामक दलाने आग विझवण्याचे प्रयत्न केले त्याला काही प्रमाणात यश आले मात्र अकरा जनावरे यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर तीन जनावरे गंभीरत्या जखमी झाले आहेत तर सहा जनावरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळाले त्यातही काही जणांना काही प्रमाणात इजा झालेली आहे यातील मृत अकरा मधील तीन जनावरे बाहेर काढलेले असताना पुन्हा आत गेल्यामुळे त्यांचा जळून मृत्यू झाला आगीची तीव्रता एवढी होती की गवत आणि पेंढ्यामुळे सकाळपर्यंत आग ढुंडसत होती सकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यान शुवैद्यकीय अधिकारी श्री पोद्दार व कशालकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला त्यामध्ये गोट्याच्या इमारतीचे सुमारे सात लाख 50 हजार रुपयाचे नुकसान झाले तर भाताचा पेंडा व साठवण केलेले गवत याचे सुमारे 80 हजार चे नुकसान तर त्या जनावरांसाठी जमा करण्यात आलेले पशुखाद्य यांचे 25000 नुकसान झाले असून यामध्ये मृत्युमुखी पडलेली 11 जनावरे यांचे चार लाख चार हजार रुपयांचे नुकसान झाले असून गोठ्यामध्ये एकूण वीस जनावरे होती त्यामध्ये गाई म्हशी जनावरे व रेडा यांचा समावेश होता मृत्युमुखी पडल्या मध्ये पाच ते सहा जनावरे गाबन अवस्थेमध्ये होते तीन जनावरे भाजलेल्या अवस्थेमध्ये असून त्यांची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले त्यानंतर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेल्या सहा जनावरांना सुरक्षित स्थळी घालवण्यात आले त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांचा पोस्टमार्टम करण्यात आला
: यावेळी घटनास्थळी पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदार ग्रामविकास अधिकारी पोलीस पाटील व तलाठी व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली त्यानंतर भाजपाचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री दादा दळवी श्री नाना शिंदे सुशांत पाटकर अजय पानगले यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली यावेळी नैसर्गिक आपत्ती कार्यक्रमांतर्गत मदत मिळवण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे श्री बापट यांना आश्वासन देण्यात आले
-----------
कोट /: पावस व गोळप परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रत्नागिरी ते पावस या सागरी मार्गावरती मोकाट जनावरे सोडलेली असतात त्याचा परिणाम या मार्गावरून जाणाऱ्यांना चांगल्या प्रकारे जाणवतो त्या जनावरांच्या मालकांना कोणतीही चिंता नसते की आपल्या जनावरची स्थिती काय आहे ते कोणत्या परिस्थितीत वावरत आहे मात्र जो शेतकरी आपली जनावरे सुरक्षितपणे त्याचे पालन पोषण करून त्याची राखण करतो त्याच शेतकऱ्यावरती आज हे संकट उडवल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे