16/09/2025
तुतारी एक्सप्रेसने गावाकडचा प्रवास - घराचे बांधकाम | Konkan Railway Journey Vlog | Kokankar Avinash
आज गावी जायचे होते तर बऱ्याच दिवसांनी दादर वरून निघणारी तुतारी एक्सप्रेस गाडीची तिकीट काढली आणि नशिबाने ती कन्फर्म पण झाली. मग काय ? रात्री अवनी मयुरीला टाटा करून मी दादर गाठले. दादरला प्लॅटफॉर्म क्रमांक ११ वर गाडी रात्री ११.४५ वाजताच आली. मात्र निघाली १२.०५ वाजता. अगदी वेळेवर. या गाडीची तिकीट काढत असाल तर तारीख मध्ये गफलत करू नका म्हणजे झाले. (आपण निघालो ११ तारखेला रात्री पण तिकीट काढायची असते १२ तारखेची कारण गाडी निघते १२ वाजून ५ मिनिटांनी ) आज गर्दी ठीकठाक होती. ठाणे स्टेशन गेले आणि झोपून गेलो. सकाळी चिपळूण मध्ये जाग आली. चिपळूण ते संगमेश्वर प्रवास केला आणि सकाळची आपल्या गावी जाणारी लालपरी शास्त्री पुलावरच गाठली आणि गावी गेलो. आज गावाकडे घराचे पायऱ्यांचे काम आणि पूढच्या ढोलपुरी लावायचे काम चालू होते.
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 11 & 12 Sept 2025 (Monsoon Season Vlogs)
नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा
11003/Tutari Express | Other Names: Rajya Rani Express | तुतारी एक्सप्रेस
DR/Dadar Central - SWV/Sawantwadi Road
The 11003 Tutari Express is a daily Indian Railways train running from Dadar Central (DR) in Mumbai to Sawantwadi Road - SWV in Maharashtra. It departs Dadar Central at 00:05, covers a distance of approximately 647 km in about 12 hours and 25 minutes, and arrives at Sawantwadi Road at around 12:30. The train offers Second Seating (2S), Sleeper (SL), Third AC (3A), and Second AC (2A) classes, but does not have an on-board pantry service.
तुतारी एक्सप्रेस (Tutari Express), ज्याचा क्रमांक 11003 आहे, ही मुंबई दादर (DR) ते सावंतवाडी रोड (SWV) दरम्यान धावणारी रेल्वे आहे. ही रेल्वे दादरहून रात्री 12:05 वाजता निघते आणि सावंतवाडी रोडला सकाळी 10:25 वाजता पोहोचते. ही रेल्वे एका कोल्हापूर शहरातून धावणारी रेल्वे आहे, ज्याला तुतारी असे नाव कोल्हापूरच्या प्रसिद्ध कवितेतील कवितेच्या नावावरुन दिले आहे. या रेल्वेमध्ये AC 2-टियर, AC 3-टियर, स्लीपर क्लास आणि जनरल क्लासचे डबे असतात.
ट्रेनची माहिती:
ट्रेन क्रमांक: 11003
ट्रेनचे नाव: तुतारी एक्सप्रेस (Tutari Express)
प्रवासाची सुरुवात: दादर (Dadar), मुंबई
प्रवासाचा शेवट: सावंतवाडी रोड (Sawantwadi Road)
निघण्याची वेळ: रात्री 12:05 वाजता
पोहोचण्याची वेळ: सकाळी 10:25 वाजता
इतर माहिती:
या ट्रेनचे नाव प्रसिद्ध मराठी कवी केशवसुत यांच्या "तुतारी" या कवितेवरून ठेवण्यात आले आहे, ज्यातून स्वातंत्र्याचा लढा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे प्रेरणादायी संदेश मिळतो.