Ratnagirikar

Ratnagirikar रत्नागिरीतील सर्व ताज्या घडामोडी जाण

प्रवासी गावी जाण्यासाठी, कामाला जाण्यासाठी एसटी बसस्थानकावर थांबलेला असतो. मात्र एसटी बस वेळेवर न आल्यास वासनतास एसटी बस...
04/10/2025

प्रवासी गावी जाण्यासाठी, कामाला जाण्यासाठी एसटी बसस्थानकावर थांबलेला असतो. मात्र एसटी बस वेळेवर न आल्यास वासनतास एसटी बसची वाट पहावी लागते. त्यावर पर्याय म्हणून आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्यावतीने रत्नागिरीसह महामंडळाच्या ७५ बसस्थानकांवर म ोफत पुस्तक वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा प्रवाशांना मराठी वृत्तपत्र, कथासंग्रह, स्पर्धा परीक्षेसाठीची पुस्तके उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे स्थानकातील कर्मचाऱ्यांकडे नोंद करून पुस्तके घरी नेवून वाचताही येणार आहेत....

प्रवासी गावी जाण्यासाठी, कामाला जाण्यासाठी एसटी बसस्थानकावर थांबलेला असतो. मात्र एसटी बस वेळेवर न आल्यास वासनता....

गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. पंचायत समितीच्या सभाप...
04/10/2025

गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. पंचायत समितीच्या सभापतिपदाची आरक्षण सोडत नुकतीच झालो. त्यामध्ये राजापूरचे सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे राजापुरात पुन्हा महिलाराज येणार आहे. अरबी समुद्रापासून थेट घाटमाथ्याच्या पायथ्यापर्यंत विस्तारलेल्या राजापूर तालुक्यामध्ये २३८ गावांचा समावेश आहे. ब्रिटिशकालीन इतिहासाची पार्श्वभूमी लाभलेल्या राजापूर तालुक्याचा कारभार पाहण्यासाठी पंचायत समितीची निर्मिती झाली. त्यापूर्वी सुमारे पंधरा वर्ष तालुक्याचा कारभार लोकल बोर्डातर्फे चालवला गेल्याची माहिती काही बुजुर्गांकडून दिली जाते....

गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. पंचायत समि....

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते व माजी आमदार राजन तेली यांनी गुरुवारी (ता. २) उपमुख्यमंत्री व शिंदे शिवसेनेचे मुख्य...
04/10/2025

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते व माजी आमदार राजन तेली यांनी गुरुवारी (ता. २) उपमुख्यमंत्री व शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे आयोजित दसरा मेळाव्यात शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे शिवसेनेला जिल्ह्यामध्ये आणखी एक धक्का बसला आहे. तेली यांनी अलीकडेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी त्यावेळी ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत युतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती....

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते व माजी आमदार राजन तेली यांनी गुरुवारी (ता. २) उपमुख्यमंत्री व शिंदे शिवसेनेच....

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातही २३ हजार बनावट मतदारांची नोंदणी झाली आहे. पगारी मतदार तयार करण्याचे हे एक षड्यंत्र आहे. आ...
04/10/2025

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातही २३ हजार बनावट मतदारांची नोंदणी झाली आहे. पगारी मतदार तयार करण्याचे हे एक षड्यंत्र आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी हा धोक्याचा इशारा असल्याचा आरोप उबाठा शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांनी केला. मतदार यादीतील ही बोगस नावे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी रद्द करावीत, अशी मागणी त्यांनी निवडणूक विभाग आणि आयोगाकडे केली आहे. माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत बाळ माने म्हणाले, मतचोरीचा मुद्दा सध्या गाजत असताना रत्नागिरी मतदारसंघातदेखील असा धक्कादायक प्रकार घडला आहे....

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातही २३ हजार बनावट मतदारांची नोंदणी झाली आहे. पगारी मतदार तयार करण्याचे हे एक षड्यंत....

रत्नागिरी तालुक्यातील नाखरे गावातील प्रत्येक घरात स्मार्ट मीटर बसवून १०० टक्के स्मार्ट मीटर गाव बनण्याचा मान नाखरेला मिळ...
04/10/2025

रत्नागिरी तालुक्यातील नाखरे गावातील प्रत्येक घरात स्मार्ट मीटर बसवून १०० टक्के स्मार्ट मीटर गाव बनण्याचा मान नाखरेला मिळाला आहे. आता या गावातील रहिवाशांना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर वापरकर्त्यांना जाहीर केल्याप्रमाणे दिवसाच्या वेळेत स्वस्त दरात वीज मिळणार आहे. या यशस्वी उपक्रमाची दखल घेऊन नाखरे ग्रामपंचायतीच्या सरपंच विद्या जाधव यांचा वीज वितरण कंपनीतर्फे गौरव करण्यात आला. कोकण विभागातील सर्व रहिवाशांनी स्मार्ट मीटरचा पर्याय स्वीकारलेले नाखरे हे पहिलेच गाव आहे....

रत्नागिरी तालुक्यातील नाखरे गावातील प्रत्येक घरात स्मार्ट मीटर बसवून १०० टक्के स्मार्ट मीटर गाव बनण्याचा मान न.....

रेवस - रेडी सागरी महामार्गातील रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या काळबादेवी खाडी पुलानंतरचा मार्ग समुद्र मार्गे एलीव्हेटेड ब्र...
04/10/2025

रेवस - रेडी सागरी महामार्गातील रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या काळबादेवी खाडी पुलानंतरचा मार्ग समुद्र मार्गे एलीव्हेटेड ब्रीजने नेण्यात येणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत ग्रामस्थांनी मंजुरी दिल्याने आता या पुलाचे कामही लवकरच सुरु होणार आहे. दरम्यान काळबादेवी खाड़ीतून पाथरदेव मार्गे मुख्य रस्त्याला फ्लायओव्हरने महामार्ग जोडण्याचा प्रस्ताव आता यामुळे रद्दबातल झाला आहे. काळबादेवी रस्ताप्रेमी संघर्ष समितीचा हा मोठा विजय मानला जात आहे....

रेवस - रेडी सागरी महामार्गातील रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या काळबादेवी खाडी पुलानंतरचा मार्ग समुद्र मार्गे एलीव...

रिक्षा चालकाच्या प्रसंगसावधानतेमुळे व माखजन पोलिसांच्या तत्परतेमुळे कर्नाटकातून पळवून आणलेल्या एका मुलीला तिच्या नातेवाई...
04/10/2025

रिक्षा चालकाच्या प्रसंगसावधानतेमुळे व माखजन पोलिसांच्या तत्परतेमुळे कर्नाटकातून पळवून आणलेल्या एका मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात यश आले. याप्रकरणी कागल (जि. कोल्हापूर) पोलिसांनी बुरंबाड (ता. संगमेश्वर) येथील तरुणावर कारवाई केली आहे. 'पोलीसांनी याबाबत पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, कोंडीवरे येथील रिक्षाचालक इरफान खान हे रिक्षा घेऊन आरवलीकडे चालले होते. याच दरम्यान एक मुलगी आरवली बाजूच्या रस्त्याने धावत चालली होती. इरफान खान यांनी आपली रिक्षा थांबवून तिला हटकले असता आपल्याला कोणीतरी पळवून आणलेले आहे असे सांगून ती रडू लागली....

रिक्षा चालकाच्या प्रसंगसावधानतेमुळे व माखजन पोलिसांच्या तत्परतेमुळे कर्नाटकातून पळवून आणलेल्या एका मुलीला ति...

रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात शनिवारी ४ ऑक्टोबरला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने दुपारी ...
04/10/2025

रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात शनिवारी ४ ऑक्टोबरला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने दुपारी १२ वा. चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. नागरिकांनी देखील या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांत मोठा गणेशोत्सव शहरातील खड्ड्यांमधुन प्रवास करूनच साजरा झाला. नवरात्रोत्सवही तसाच गेला. खड्ड्यांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. खड्ड्यांमुळे अगदी दुचाकी ते मोठ्या वाहनांपासून सर्वांचे मोठे नुकसान झाले आहे. या खड्ड्यांचा तीव्र निषेध नोंदविण्यासाठी सर्व वाहनधारकांनी ज्यांना वाटते आहे की, शहरातील रस्ते चांगले व्हावे, त्यांनी शनिवारी ४ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता तुम्ही जिथे आहे तिथे ५ मिनिटे थांबुन शहरात चक्काजाम करावा, खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेला जाग आणण्यासाठी स्वयंस्पुर्तीने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी यानिमित्ताने केले आहे....

रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात शनिवारी ४ ऑक्टोबरला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या....

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर येथे पर्यटनासाठी आलेले आठ पर्यटक समुद्रात बेपत्ता झाले. आज, शुक्रवारी दुपारच्या सुम...
04/10/2025

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर येथे पर्यटनासाठी आलेले आठ पर्यटक समुद्रात बेपत्ता झाले. आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बेळगाव येथील पर्यटक कुडाळ येथे नातेवाईकांकडे आले होते. तेथून ते शिरोडा वेळागर येथील समुद्रात पर्यटनासाठी आले. समुद्रात गेले असता हे आठ जण बेपत्ता झाले. यातील तिघांचे मृतदेह सापडले आहेत. तर एक महिलेला वाचविण्यात यश आले आहे. तर उर्वरित चार जणांचा समुद्रात शोध घेण्यात येत आहे....

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर येथे पर्यटनासाठी आलेले आठ पर्यटक समुद्रात बेपत्ता झाले. आज, शुक्रवारी दुप.....

रत्नागिरी (कोकण) आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या आंबा घाटातील प्रवास आता अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे. कारण या घाट...
04/10/2025

रत्नागिरी (कोकण) आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या आंबा घाटातील प्रवास आता अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे. कारण या घाटातील डोंगरातून साडेतीन किलोमीटरचा बोगदा काढण्यास मंजुरी मिळाली आहे. रत्नागिरी-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वळणं आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवास अत्यंत सुरक्षित आणि जलद होणार आहे. यासाठी सध्या एका खासगी एजन्सीकडून या प्रकल्पाचे सर्वे क्षण सुरु करण्यात आले आहे....

रत्नागिरी (कोकण) आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या आंबा घाटातील प्रवास आता अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे. कार.....

चिपळूण तालुक्यातील गुढे, कळंबट परिसरात वन्य प्राण्यांकडून हल्ला झाल्याची घटना सलग दुसऱ्यांदा घडल्यानंतर वन विभाग खडबडून ...
03/10/2025

चिपळूण तालुक्यातील गुढे, कळंबट परिसरात वन्य प्राण्यांकडून हल्ला झाल्याची घटना सलग दुसऱ्यांदा घडल्यानंतर वन विभाग खडबडून जागा झाला आहे. गुढेतील रवींद्र पांडुरंग आग्रे यांचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर वन विभागाने या परिसरात गस्त याशिवाय वाढवली आहे. परिसरातील ग्रामस्थांमध्ये वन्य प्राण्यांविषयी जनजागृती होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मागील आठवड्यात कळंबट येथे कार्तिक तुषार शिरकर या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती....

चिपळूण तालुक्यातील गुढे, कळंबट परिसरात वन्य प्राण्यांकडून हल्ला झाल्याची घटना सलग दुसऱ्यांदा घडल्यानंतर वन विभ...

खिणगिणी पंचक्रोशीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी आंबा व काजू बागायतींची लागवड केलेली आहे. त्या बागायतींना हंगामातील प्रतिकूल स्थि...
03/10/2025

खिणगिणी पंचक्रोशीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी आंबा व काजू बागायतींची लागवड केलेली आहे. त्या बागायतींना हंगामातील प्रतिकूल स्थिती आणि अवकाळीचा तडाखा बसून शेतकरी, बागायतदार यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. मात्र, त्या नुकसानीची पीक विमांतर्गत नुकसानभरपाई मिळताना तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे खिणगिणी गावामध्ये हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये घेण्यात आल्याची माहिती प्रशासक प्रभाकर आपटे यांनी दिली. हवामान केंद्र उभारणीसाठी आवश्यक असलेली शासकीय जागा उपलब्ध करून देण्याचे ठरले....

खिणगिणी पंचक्रोशीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी आंबा व काजू बागायतींची लागवड केलेली आहे. त्या बागायतींना हंगामातील प्र...

Address

B-2/3, Shankheswar Nagar, Arogya Mandir
Ratnagiri
415639

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ratnagirikar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ratnagirikar:

Share