Kokan Diary-कोकण डायरी

Kokan Diary-कोकण डायरी राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय आणि दैनंदि?

📍 पुणे ब्रेकिंग न्यूजपुलाचा अपघात – अनेकजण बेपत्ता, ६ जणांचा मृत्यू असल्याची भीती!पुण्यात एक भीषण अपघात घडला आहे, जिथे ए...
15/06/2025

📍 पुणे ब्रेकिंग न्यूज
पुलाचा अपघात – अनेकजण बेपत्ता, ६ जणांचा मृत्यू असल्याची भीती!

पुण्यात एक भीषण अपघात घडला आहे, जिथे एक पूल कोसळल्याची घटना समोर आली आहे. अनेकजण नदीत वाहून गेले आहेत, तर काहीजण पुलाच्या संरचनेखाली अडकल्याची शक्यता आहे.

अद्याप नेमकं किती लोक वाहून गेले आणि कितीजण अडकल्याचे स्पष्ट झालं नाही. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.

घटनास्थळी २० हून अधिक अ‍ॅम्ब्युलन्स दाखल झाल्या आहेत. स्थानिक आमदारांच्या माहितीनुसार आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.

📌 बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे...
📌 स्थानिक प्रशासन सतर्क आहे...

📲 ताज्या अपडेटसाठी आमच्या पेज ला लाईक करा:
👉

*✈️संजय गांधींपासून ते विजय रुपाणीपर्यंत. विमान अपघातात 7 नेत्यांनी गमावले प्राण; पाहा यादी !**नवी दिल्ली :* गुजरातमधील ...
13/06/2025

*✈️संजय गांधींपासून ते विजय रुपाणीपर्यंत. विमान अपघातात 7 नेत्यांनी गमावले प्राण; पाहा यादी !*

*नवी दिल्ली :* गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान गुरुवारी (12 जून) दुपारच्या सुमारास कोसळून भीषण अपघात झाला होता. एअर इंडियाच्या बोइंग 787 या प्रवासी विमानातून क्रू मेंबर्ससह 244 प्रवासी प्रवास करत होते. हे विमान उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच मेघानी परिसरात कोसळले होते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही या अपघातात मृत्यू झाला. रुपाणी त्यांच्या पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. दरम्यान, भारतात यापूर्वी देखील झालेल्या विमान अपघातात अनेक प्रसिद्ध नेत्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया…

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांना 1980 मध्ये विमान अपघातात निधन झाले होते. संजय गांधी यांनी 23 जून 1980 रोजी पहाटे हवाई स्टंट करताना विमानावरील नियंत्रण गमावले होते. त्यानंतर संजय गांधी यांचे विमान नवी दिल्लीच्या डिप्लोमॅटिक एन्क्लेव्हमध्ये कोसळले होते. या विमान अपघातात संजय गांधी यांच्यासह कॅप्टन सुभाष सक्सेना यांचाही मृत्यू झाला होता.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नागरी विमान वाहतूक मंत्री माधवराव सिंधिया यांचे 30 सप्टेंबर 2001 रोजी कानपूर येथे एका रॅलीदरम्यान विमान अपघातात निधन झाले होते. माधवराव सिंधिया हे दहा आसनी खाजगी विमानातून प्रवास करत होते. मात्र उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे खराब हवामानाचा फटका त्यांच्या विमानाला बसला आणि त्यातच माधवराव सिंधिया यांचा मृत्यू झाला होता.

लोकसभेचे अध्यक्ष आणि तेलगू देसम पक्षाचे नेते जीएमसी बालयोगी यांचे 3 मार्च 2002 रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील भीमावरम येथून येणारे एक खाजगी हेलिकॉप्टर आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कैकलूरजवळील तलावात कोसळले होते. या अपघातात जीएमसी बालयोगी यांचा मृत्यू झाला होता.

मेघालयाचे ग्रामीण विकास मंत्री सायप्रियन संगमा यांचे 22 सप्टेंबर 2004 रोजी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. ते गुवाहाटीहून शिलाँगला पवन हंस या हेलिकॉप्टरने जात होते आणि त्यांच्यासोबत नऊ जण होते. त्यांचे हेलिकॉप्टर गुवाहाटी राज्याच्या राजधानीपासून फक्त 20 किमी अंतरावर असलेल्या बारापाणी तलावाजवळ कोसळले होते.

हरियाणाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री ओम प्रकाश जिंदाल यांचे 2005 मध्ये एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. त्यांच्यासोबत मंत्री सुरेंद्र सिंह होते. दोन्ही नेते हेलिकॉप्टरने दिल्लीहून चंदीगडला जात होते. मात्र उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले आणि या अपघातात ओम प्रकाश जिंदाल आणि सुरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाला होता.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे 30 एप्रिल 2011 मध्ये एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. दोरजी खांडू हे इतर चार जणांसोबत तवांगहून इटानगरला जात होते. त्यांचे हेलिकॉप्टर राज्याच्या पश्चिम कामेंग जिल्ह्यात कोसळले होते.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचे 2 सप्टेंबर 2009 मध्ये एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. वायएस राजशेखर रेड्डी हे त्यांच्या बेल 430 हेलिकॉप्टरमध्ये उड्डाण करत होते. त्यांचे हेलिकॉप्टर नल्लामालाच्या जंगलात कोसळले होते.

12/06/2025

अहमदाबाद विमान अपघातात एक व्यक्ती थोडक्यात बचावला आहे…
ही व्यक्ती ब्रिटिश नागरिक असून त्यांचे नाव रमेश विश्वास आहे.
विमान कोसळल्यानंतर ते स्वतःच्या पायांवर चालत सुरक्षित स्थळी पोहोचले.

कृपया शेअर करा आणि फॉलो करा 👍

12/06/2025

🔴 अहमदाबाद विमान अपघात – आतापर्यंत ५० मृतदेह सापडले, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता!

गुजरातमधील अहमदाबादहून ब्रिटनकडे जात असलेल्या एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते.

आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, मलब्यातून ५० प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे, मात्र मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विमानात असलेल्या प्रवाशांची राष्ट्रीयता पुढीलप्रमाणे होती: 🇮🇳 १६९ भारतीय नागरिक
🇬🇧 ५३ ब्रिटिश नागरिक
🇵🇹 ७ पोर्तुगीज नागरिक
🇨🇦 १ कॅनडियन नागरिक

12/06/2025

अहमदाबाद विमान अपघाताचा Live Video –

अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात २४२ प्रवासी सवार होते. अपघात होताच विमानाला आग लागली.

08/06/2025

*निवळी घाटात मिनी बस आणि सीएनजी टँकरची भीषण धडक*
*चिपळुणातील २५ शिक्षक जखमी, बचावकार्य सुरू*
निवळी घाटात आज सकाळी सुमारास एक भीषण अपघात घडला. चिपळूणहून रत्नागिरीकडे शिक्षक प्रशिक्षणासाठी निघालेल्या खासगी मिनी बसला (ट्रॅव्हल्स) भरधाव वेगाने आलेल्या सीएनजी गॅस टँकरने जोरदार धडक दिली. या अपघातात सुमारे २५ ते २६ शिक्षक जखमी झाले आहेत.
ही दुर्दैवी घटना बावनदी परिसरात घडली. धडकेनंतर मिनी बस थेट सुमारे २० फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची तीव्रता इतकी होती की मिनी बसचा अक्षरशः चक्काचूर झाला असून अनेक शिक्षक गंभीर जखमी झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते.
या धडकेनंतर टँकरमधून गॅसची गळती होऊ लागली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल, महसूल विभाग आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले असून सर्व जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या दुर्घटनेत टँकर शेजारच्या एका घरावर आणि गुरांच्या गोठ्यावर कोसळला. त्यामुळे गोठा आणि घराचे फायबर पत्रे जळून खाक झाले असून दोन दुभत्या गायी जखमी झाल्या आहेत. घराजवळ उभी असलेली एक रिक्षाही पूर्णपणे जळून गेली आहे. मात्र मोठा आवाज ऐकून घरातील ७-८ व्यक्तींनी तत्काळ घराबाहेर धाव घेतल्याने जीवितहानी टळली.
अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. सीएनजी टँकरमधील गळती थांबवण्यात प्रशासनाला यश आले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हे व्यंग चित्र खूप काही सांगून जाते
31/05/2025

हे व्यंग चित्र खूप काही सांगून जाते

31/05/2025
ऑपरेशन सिंदूर च्या 3 आठवडया नंतर ,एयर चीफ मार्शल यांनी मोदी सरकारच्या रक्षा तैयारीवर गंभीर प्रश्न विचारले आहेत.संरक्षण स...
31/05/2025

ऑपरेशन सिंदूर च्या 3 आठवडया नंतर ,
एयर चीफ मार्शल यांनी मोदी सरकारच्या रक्षा तैयारीवर गंभीर प्रश्न विचारले आहेत.

संरक्षण साहित्य कधीच वेळेवर मिळत नाही तसेच संरक्षण खर्चातील कपातीवरही ठेवले बोट...

_*जी माणसे फक्त पैशाला किंमत देतात, त्यांच्या जीवनात चांगली माणसे टिकत नाहीत.*_
31/05/2025

_*जी माणसे फक्त पैशाला किंमत देतात, त्यांच्या जीवनात चांगली माणसे टिकत नाहीत.*_

डोंबिवलीत समाजसेवा कुठल्या थराला गेली आहे ते पाहा...🤦‍♂️🫢😂
31/05/2025

डोंबिवलीत समाजसेवा कुठल्या थराला गेली आहे ते पाहा...
🤦‍♂️🫢😂

दिल्लीहून श्रीनगर – ₹५,०००श्रीनगरहून दिल्ली – ₹३०,०००हे काय चाललंय!लोक अडचणीत असताना काही विमान कंपन्या ३ ते ५ पट जास्त ...
23/04/2025

दिल्लीहून श्रीनगर – ₹५,०००
श्रीनगरहून दिल्ली – ₹३०,०००

हे काय चाललंय!

लोक अडचणीत असताना काही विमान कंपन्या ३ ते ५ पट जास्त भाडं आकारतायत.
लाज वाटली पाहिजे! मदतीचा हात देण्याऐवजी, संधीचं सोनं करताय!





या कठीण काळात माणुसकी दाखवा, फक्त नफा नाही!

Address

Ratnagiri
415612

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokan Diary-कोकण डायरी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share