
25/06/2025
मोहन रानडे यांचा आज (२५ जून) स्मृतिदिन.
Weekly Magazine, News Website, Book Publishing and overall Content services
Ratnagiri
415639
Monday | 9am - 5pm |
Tuesday | 9am - 5pm |
Wednesday | 9am - 5pm |
Thursday | 9am - 5pm |
Friday | 9am - 5pm |
Saturday | 9am - 5pm |
Be the first to know and let us send you an email when Kokan Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Send a message to Kokan Media:
कोकणातील व्यक्ती, संस्था आणि संघटनांसाठी प्रसारमाध्यमांशी संबंधित सेवा देण्याचं म्हणजेच मीडिया कन्सल्टंट म्हणून भूमिका पार पाडण्याचं कोकण मीडिया कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचं उद्दिष्ट आहे. संस्थेचं कार्यालय रत्नागिरीत आहे. प्रारंभी रत्नागिरी शहर-परिसर, रत्नागिरी जिल्हा आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं कोकणातल्या इतर जिल्ह्यांमध्ये संस्थेचं कार्यक्षेत्र विस्तारित करण्याचा मानस आहे. प्रसारमाध्यमांचं महत्त्व वादातीत आहे. आधुनिक काळात आकाशवाणी, दूरदर्शन, पुस्तकांपासून फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियापर्यंत या माध्यमाची व्याप्ती पोहोचली आहे. यापुढेही विविध माध्यमं निर्माण होऊ शकतील. माध्यमांमध्ये झपाट्यानं वाढ होत असली, तरी त्यामध्ये वृत्तपत्रांना समाजात मोठं स्थान आहे. छापून आलेल्या शब्दांवर लोकांचा सर्वाधिक विश्वास आहे. वृत्तपत्रांसह विविध माध्यमांशी संपर्क साधताना सर्वसामान्यांबरोबरच विशेष व्यक्ती आणि संस्थांनाही अडचणी येत असतात. त्याच सोडविण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस करणार आहे. प्रसिद्धीपत्रकं, नियोजित कार्यक्रमांची निवेदनं, बातम्या तयार करून देणं (Drafting), सभा, संमेलनं, परिषदा, अधिवेशनांचं वार्तांकन, विविध विषयांवरील वृत्तपत्रीय प्रासंगिक लेख, विशेष वृत्तांत तयार करण्यासाठी, तसंच गरजेनुसार हे सर्व विविध वृत्तपत्रांसह अन्य प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचविण्यासाठी मदत केली जाईल. या आणि अशा वृत्तपत्रीय कामांबरोबरच स्मरणिका तयार करणं, पुस्तिकांसाठी संकलन, पुस्तकांसाठी प्रेस कॉपी तयार करणं, छायाचित्रण, पत्रकार परिषदांचं आयोजन, इनहाउस जर्नलचं संकलन-संपादन, मुद्रितशोधन इत्यादी स्वरूपाची कामं माफक मोबदल्यात केली जातील. ज्यांना बातमी द्यायची आहे किंवा ज्यांना माध्यमांशी आणि मुद्रणाशी संबंधित इतर सेवा हव्या आहेत, अशा ग्राहकांना अधिकाधिक समाधानकारक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक सेवा देण्याचाही आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यांचा तपशील सातत्यानं या संकेतस्थळावर, तसंच आमच्या फेसबुक पेजवर अद्ययावत केला जाणार आहे. त्यामुळे संकेतस्थळ, तसंच फेसबुक पेजला वारंवार भेट द्यावी, अशी अपेक्षा आहे.