27/04/2025
रसिकहो नमस्कार!
तबला हे वाद्य भारतीय नसून आक्रमकांनी भारतात आणलं अशा कथा तबल्याचा इतिहास सांगताना सांगितल्या जातात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू या राज्यात इसवी सनापूर्वीच्या काळातील पुरातन शिल्पात तबला वाजवत असलेली शिल्प उपलब्ध आहेत तर इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून भारतात मिळणाऱ्या तबल्यांचा उल्लेख 'देहली का तबला' या संशोधनात्मक पुस्तकात प्रख्यात तबलावादक उमेश मोघे यांनी केला आहे. ताल सांभाळणारा हा तबला हे भारतीय संगीतातील अविभाज्य भाग असलेलं वाद्य आहे. अनेक तबला वादकांनी भारतीय संगीताच्या तालाचा तोल सांभाळला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील पांगरी हे मूळ गाव असलेलं तबला वादनातील आजचं अग्रेसर व उल्लेखनीय नाव म्हणजे केदार लिंगायत!
'कलांगण संगमेश्वर' निर्मित 'संगमेश्वर संपदा' या संवाद मालिकेची चार दशकी वाटचाल पूर्ण करताना चाळीसाव्या भागात भेटूया श्री केदार लिंगायत यांना.
संवादक - श्री निबंध कानिटकर