28/07/2026
*पावसाळा आणि लहान मुलांची काळजी*-👶🏻🌿
तुमचेही लहान मूल सतत रडते आहे का ?
जेवण कमी करते आहे ?
मग हा पावसाळा ऋतुमुळे होणारा त्रास आहे . पावसाळ्यात पचनशक्ती कमी होते तसेच वातावरणातील आर्द्रतेमुळे विषाणू जन्य आजार वाढतात.
त्यानुसार मुलांच्या आहारात बदल करक्षे आवश्यक
*बदल*
- पाणी फिल्टरचे असले तरी मुलांसाठीचे पाणी एक उकळी दिलेले असावे .( उकळीमुळे पाणी पचण्यास हलके व विषाणूरहित होते )
- जेवण कटाक्षाने गरम व सुपाच्य च द्यावे.
- 1 tsp गाईचे तूप प्रत्येक जेवणात समाविष्ट करावे .
- मोड आलेले पदार्थ व आंबवलेले पदार्थ पावसाळ्यात प्रमाण कमी असावे.
- खूप कोरडे अन्न , पॅकेज फूड टाळावे
*उपाय*
- 1/2टीस्पून हिंग + 1 टीस्पून पाणी -
प्यायला देणे ( वय 6 महिने पुढे , 6 महिने आधीच्या बाळांना बेंबीत सोडणे)
- आल्याचे पाचक ( याआधी शेअर केले आहे , नसल्यास मेसेज करा)
- गरज पडल्यास दवाखान्यातील गट ओके ड्रॅापर , टमी बाम
*डॅा सौ कादंबरी जगताप*
एम.डी.आयुर्वेद
मूलत्वं आयुर्वेद पंचकर्म हॅास्पिटल
9404306548
अशीच उपयुक्त माहिती मिळविण्यासाठी आमचा ह्वॅाट्सअप ग्रुप जॅाईन करा