Patan Daily

Patan Daily Media news

आज कराड येथील प्रीतिसंगम येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राचे शिल्प...
02/02/2026

आज कराड येथील प्रीतिसंगम येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यासोबतच सन्मानीय वेणुताई यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधण्यात आलेल्या स्मारकास भेट देत, स्व. यशवंतराव चव्हाण साहेब व वेणुताई चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचे नाते अत्यंत भावनिक व वैशिष्ट्यपूर्ण होते.अजितदादा अनेक वेळा कराड येथे येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेत, महाराष्ट्राच्या भाग्यविधात्यासमोर नतमस्तक होत व त्यांच्या प्रेरणेतून समाजाभिमुख कार्यास गती देत होते.

याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सौ. रुपाली चाकणकर, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. मकरंद आबा पाटील, खासदार श्री. नितीन पाटील, माजी खासदार श्री. श्रीनिवास पाटील, माजी मंत्री श्री. बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील, पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष श्री. राजेंद्रसिंह यादव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सात हजाराची लाच घेताना वनविभागाचा कर्मचारी जाळ्यात.वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही चौकशी होणे गरजेचे.पाटण डेली न्यूज.सागाच्या लाक...
02/02/2026

सात हजाराची लाच घेताना वनविभागाचा कर्मचारी जाळ्यात.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही चौकशी होणे गरजेचे.

पाटण डेली न्यूज.

सागाच्या लाकडाचा वाहतूक परवाना देणे कामी सात हजार रुपयाची लाच मागणाऱ्या कराड वन विभागातील वनपाल संतोष अनंतराव जाधवर वय 44 (राऊंड ऑफिसर वराडे कराड वनपरिक्षेत्र ) या कर्मचाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले आहे .सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून सोमवारी ही कारवाई केली .

सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पाटील,हवालदार गणेश ताटे,निलेश राजपुरे, सत्यम थोरात,नवनाथ शिंदे या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली .

यातील तक्रारदार हे लाकूड व्यावसायिक आहेत .साकुर्डी तालुका कराड येथील शेतकऱ्यांच्या परवानगीने सागाच्या लाकडाची तोड त्यांनी केली होती .या लाकडाच्या वाहतूक परवान्यासाठी वराडे येथील राऊंड ऑफिसर व वनविभागाचे वनपाल संतोष जाधव वर यांनी फिर्यादी यांच्याकडे 7600 रुपयाची लाच मागितली .तडजोडीअंतीसात हजार रुपये देण्याचे ठरले होते .तक्रारदारांनी या प्रकरणाची फिर्याद सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली असता जाधवर यांच्या कार्यालय परिसरात चारशे रुपये घनमीटर प्रमाणे 19 घनमीटर चे साडेसात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ हात पकडण्यात आले .भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 नुसार जाधवर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे .या कारवाईमुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

वनपरिक्षेत्र पाटण अंतर्गत मौजे धावडे येथे अवैध लाकुड वाहतूक करणा-या आरोंपीवर कारवाई.पाटण दि. २४/०१/२०२६ रोजी वनपरिक्षेत्...
24/01/2026

वनपरिक्षेत्र पाटण अंतर्गत मौजे धावडे येथे अवैध लाकुड वाहतूक करणा-या आरोंपीवर कारवाई.

पाटण

दि. २४/०१/२०२६ रोजी वनपरिक्षेत्र पाटण मधील मोरगिरी नियतक्षेत्रामध्ये असलेल्या मौजे धावडे गावचे हददीमध्ये लाकूड मालाची विनापासी विनापरवाना अवैध वाहतूक करत असणारा ट्रक मिळून आलेने आरोपीवर प्र.गु.रि.क्र. ०१/२०२६ दि.२४/०१/२०२६ अन्वये वनगुन्हा नोंद करणेत आला. सदर गुन्हयातील आरोपी १. संतोष शिवाजी बंदलकर सध्या रा. कराड ता. कराड जि. सातारा २. अंकुश हरिबा चोरगे रा. गोकुळ त. पाटण ता. पाटण जि.सातारा असून सदर आरोपीवर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (२) (ब) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदरचे वनगुन्हयासाठी ०१ वर्ष कारावास किंवा रू.५०००/- पर्यंतचा द्रव्य दंड किवा दोन्ही अशा शिक्षेची तदतूद कायदयामध्ये आहे. सदर वनगुन्हयामध्ये आरोपींकडून ट्रक क्र.एम एच ४३ बीबी ७२०६ व विनापरवाना तोड केलेला लाकूड माल जळावू किटा २४.५९६ घमी जप्त केला.
पाटण वनपरिक्षेत्रातील नागरिकांना आवाहन करणेत येत कि, अवैध वृक्षतोड, अवैध वाहतूक, अवैध शिकार तसेच राखीव वनामध्ये अतिक्रमण करणे हा कायदयाने गुन्हा आहे. असे घडल्यास संबंधितावर वनविभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सदरची कारवाई श्री अमोल सातपुते (भा.व.से) उपवनसंरक्षक वन विभाग सातारा, श्रीम. जयश्री जाधव सहायक वनसंरक्षक (वनी व कॅम्पा) सातारा, श्री राजेश नलवडे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) पाटण, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीनिलेश कुंभार वनपाल पाटण, श्री निखील अंकुश कदम वनरक्षक पाटण यांनी केली.

24/12/2025

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 2010 साली करण्यात आली मात्र तब्बल 15 वर्षांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा मध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर केलेली 'तारा'वाघीण ढेबेवाडी विभागाच्या जिंती या ठिकाणी दृष्टीस पडली.

महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. शंभुराज शिवाजीराव...
17/11/2025

महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!

04/10/2025
पूरस्थितीनंतर दिलासा;प्रतीक्षा शासनाच्या मदतीची_पुरामुळे घरांची पडझड;शेतीचे मोठे नुकसान_सातारा_सूर्यकांत पाटणकर._ऑगस्ट च...
21/08/2025

पूरस्थितीनंतर दिलासा;प्रतीक्षा शासनाच्या मदतीची
_
पुरामुळे घरांची पडझड;शेतीचे मोठे नुकसान
_
सातारा_सूर्यकांत पाटणकर.
_
ऑगस्ट च्या सुरुवातीला मान्सूनच्या विश्रांती घेतलेल्या पावसाने 16 ऑगस्ट नंतर झोडपून काढले.जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात जोरदार पाऊस कोसळला यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होऊन धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला.त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली तर अतिवृष्टीच्या पावसाने घरांची पडझड होऊन शेतीचे हे मोठे नुकसान झाले आहे.बुधवारी सायंकाळपासून पावसाने उघडीप दिली असून शेतकऱ्यांचे डोळे आता शासनाच्या मदतीकडे लागले आहेत.
_
सातारा जिल्ह्यात वाई महाबळेश्वर पाटण या तालुक्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो पश्चिम घाटाच्या डोंगर रांगांमध्ये येणाऱ्या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होते.गेल्या चार दिवसात अतिवृष्टीच्या पावसाने जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले होते तर कोयना,धोम,बलकवडी,कन्हेर,तारळी या प्रमुख धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन घरांची पडझड तसेच नागरिकांच्या संसार उपयोगी साहित्याचे ही प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
_
कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीकडच्या गावांना धोका निर्माण झाला होता.नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने त्यांना तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले होते.पुरामुळे शासनाने तात्पुरते स्थलांतर करून चार दिवस निवारा व जेवणाची व्यवस्था केली. मात्र पुरामुळे घरादाराचे, शेतीचे, व्यवसायाचे झालेले नुकसान कसे भरून येणार या विवंचनेत सध्या अतिवृष्टीतील पूरग्रस्त आहेत.जिल्ह्यातील १२९ कुटुंबातील ३६१ नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते.पाटण तालुक्यातील ५३ कुटुंबांचे कराड ६ महाबळेश्वर ८ वाई ४० सातारा ३० मोरेवाडी २० अशा जिल्ह्यातील १२९ कुटुंबांचे स्थलांतर पुराच्या,अतिवृष्टीच्या धोक्यामुळे करण्यात आले होते.तर महाबळेश्वर येथील पाच जणांच्या घरांची पडझड झाली असून त्यांचे ही मोठे नुकसान झाले आहे.भिलार येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची भिंत पडून नुकसान झाले होते.
जिल्ह्यातील कोयना,धोम,धोम बलकवडी, कन्हेर,तारळी,उरमोडी या प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीचा जोरदार पाऊस झाल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला होता त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शेतीचेही प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.जिल्हा प्रशासनाने अद्यापही अतिवृष्टी पूर परिस्थितीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सुरुवात केली नसून केवळ पाहणी दौरा चालू आहे.मात्र प्रत्यक्षात आपत्तीग्रस्तांना मदत मिळणे गरजेचे आहे.जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यात शेतीचे घरांचे सार्वजनिक मालमत्तांचे तसेच व्यवसायिकांचे किती व कोणत्या प्रमाणात नुकसान झाले आहे हे अद्याप जाहीर केले नाही मात्र सध्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस थांबल्याने धरणातील होणारा विसर्ग कमी झाला आहे त्यामुळे पूर परिस्थिती आटोक्यात येत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे.मात्र या पूरग्रस्तांना आता प्रतीक्षा शासनाच्या मदतीची लागली असून शासन केव्हा करणार असा प्रश्न आपत्तीग्रस्तांकडून विचारला जात आहे.
_
कोयना धरणाचे दरवाजे ३ फुटांवर
कोयना पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ही घटली आहे.परिणामी गुरुवारी रात्री धरणाचे दरवाजे तीन फुटांवर असून धरणातून केवळ १९ हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे.पाणलोट क्षेत्रातील कोयना ४,०१४ नवजा ४,९१७ तर महाबळेश्वर येथे ४,६४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

भक्तिमय वातावरणात माऊलींचे दत्त घाटावरील नीरा नदीत स्नान.माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन;चार दिवस मुक्काम.सातार...
26/06/2025

भक्तिमय वातावरणात माऊलींचे दत्त घाटावरील नीरा नदीत स्नान.
माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन;चार दिवस मुक्काम.
सातारा दि. २६
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला परंपरेची किनार आहे.दरवर्षी लाखो वारकरी या सोहळ्यात नि:स्वार्थ भावनेने सहभागी होऊन पंढरीच्या दिशेने चालत असतात वैष्णवांचा हा मेळा गुरुवारी सातारा हद्दीत दाखल झाला.वारकरी संप्रदायासाठी वारी म्हणजे केवळ प्रवास नव्हे ती श्रद्धेची आणि आत्मशुद्धीची वाटचाल आहे.याच वाटचालीतला क्षण म्हणजे माऊलींचे निरा स्नान गुरुवारी दुपारी नीरा दत्त घाटावर माऊलींनी स्नान केले.
टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब न्हाऊन निघाला.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्यावतीने पालकमंत्री शंभूराज देसाई,ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील,खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले,खासदार नितीन पाटील,आमदार सचिन पाटील,आमदार मनोज घोरपडे,माजी खासदार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी वाईचे प्रांतअधिकारी राजेंद्र कचरे यांनी पुष्प अर्पण करुन व पोलीस बँड पथकामार्फत विविध धून वाजून स्वागत केले.
नीरा नदीतील स्नानानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी तसेच लाखो भाविकांनी दर्शन घेतले. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025 निमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी गावनिहाय सुविधा माहिती व लोकेशन मार्गदर्शनाचा क्यूआर कोड पंचायत समिती खंडाळा व फलटण यांनी उत्कृष्ट पद्धतीने पहिल्यांदाच तयार केला आहे. याद्वारे वारकऱ्यांच्या सोयीसाठी काही गावांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या माध्यमातून प्रत्येक गावातील शौचालय, आरोग्य सेवा,पाणी, महिला स्नानगृहे, मुक्काम, निवास, पेट्रोल पंप व संपर्क माहिती मिळत आहे, त्यामुळे डिजिटल वारीचा अनुभव वारकऱ्यांनी घेतला.
प्रशासनाने वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाण्याचे टँकर,आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.तसेच जागोजागी स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.वारकऱ्यांच्या सुरक्षेतेसाठी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
चौकट.....
आज माऊलींचा पालखी सोहळा लोणंद नगरीत विसरणार आहे.शुक्रवारी (२७) चांदोबाच लिंब येते वारीतील पहिला उभा रिंगण सोहळा होणार आहे तर मुक्काम तरडगाव येथे होणार आहे.शनिवारी (२८) काळज,निंभोरे,वडजल असा पाहुणचार घेत हा सोहळा फलटण मुक्कामी राहील. रविवारी (२९) सकाळी विडणी,पिंपरद, निंबळक फाटा करत बरड येथे मुक्कामी पोहोचणार आहे.
सातारा जिल्ह्यातील चार दिवसांच्या पाहुणचारा नंतर सोमवारी धर्मपुरी सोलापूर जिल्ह्यात माऊलींचा प्रवेश होणार आहे.

पुणे, ता. १७ ; भारती प्रतापराव पवार (वय ७७ वर्षे) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घआजाराने निधन झाले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रताप...
17/03/2025

पुणे, ता. १७ ; भारती प्रतापराव पवार (वय ७७ वर्षे) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घआजाराने निधन झाले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे मुलगा ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार आणि मुलगी अश्विनी, सून, नातवंडे असा परिवार आहे. भारती पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. १८) पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

भारती पवार या पूर्वाश्रमीच्या भारती श्रीपतराव पाटील होत. मूळच्या मुंबईतील असलेल्या भारती यांचे बालपण शिवाजी पार्क परिसरात गेले. त्यांचे शालेय शिक्षण तेथील बालमोहन विद्या मंदिरात झाले. रुईया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. चित्रकलेत त्यांचा हातखंडा असल्यामुळे पुढे त्यात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर १९७० मध्ये त्यांचा प्रतापराव पवार यांच्याशी विवाह झाला.

सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे पुण्यात आल्यावर ‘सकाळ’च्या माध्यमातून त्या अनेक उपक्रमांत सहभागी होत. औंधजवळील बालकल्याण संस्थेमध्ये त्या सुमारे ३५ वर्षे सक्रिय होत्या. तेथे त्या विश्वस्तही होत्या. बालकल्याण संस्थेतील प्रत्येक उपक्रमात त्या सहभागी होत. अनेक मुला-मुलींना त्यांनी तेथे चित्रकलेचे धडे दिले. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तसेच ‘सकाळ’ संचलित कोरेगाव पार्क आणि कोथरूड येथील अंधशाळेतही त्या विश्वस्त होत्या. तेथील अनेक उपक्रमांत त्या सहभागी होत.
--------------

Celebrating my 5th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉
12/03/2025

Celebrating my 5th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

 #राजधानीसातारा
19/01/2025

#राजधानीसातारा





Address

Patan
Satara
415206

Alerts

Be the first to know and let us send you an email when Patan Daily posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Patan Daily:

Share