18/11/2022
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील तिरंगा पब्लिक स्कूल मध्ये शिकणारी इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी कुमारी स्वरा योगेश भागवत(वय ८ वर्ष) ने विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कामगिरीची दखल घेऊन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केंद्र सरकार पुरस्कृत कुमारी स्वरा भागवत हिस " राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार" मिळावा म्हणून केंद्र सरकारकडे शिफारस केली. कु. स्वरा भागवत ने वयाच्या सहाव्या वर्षी 143 किलोमीटर सायकलिंग, एका मिनिटात शंभर पुश अप्स , 50 प्रकारच्या दोरीवरील उड्या, दोर चढणे, एका हातावर जोर आणि वयाच्या तिसऱ्या वर्षी पोहायला शिकली, तसेच शिवजयंती निमित्त महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर एक तास 56 मिनिटांमध्ये सर करून सातव्या वर्षी विक्रम केला या विक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया घेतली . तिच्या सहशी कर्तुत्वाबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब, माजी मुख्यमंत्री छगनराव भुजबळ साहेब, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, आमदार राम कदम सह विविध संस्था संघटनांनी अभिनंदन केले. कुमारी स्वरा भागवत हिस केंद्र सरकार " बालशौर्य पुरस्कार " मिळावा म्हणून खासदार रणजीत सिंह निंबाळकर ,खासदार ओमराजे नाईक निंबाळकर ,खासदार मनोज कोटक, खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्राद्वारे खास खेल आणि क्रीडामंत्री स्मृती इराणी यांच्याकडे मागणी केली आहे. सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कु.स्वरा कडून तिने विविध क्षेत्रातील कामगिरीची तिच्या तोंडातून माहिती घेतली लहान वयात सायकलिंग बरोबरच गड किल्ले सर केले याबद्दल तिचे तोंड भरून कौतुक केले आणि केंद्र सरकारने स्वरा भागवत ला बाल शौर्य पुरस्कार मिळावा म्हणून शिफारस केली यावेळी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी विजय तावरे, जिल्हा पर्यवषक अतिश शिंदे, जिल्हा संरक्षण अधिकारी चेतन भारती, सामाजिक कार्यकर्ते सतिश मोने तसेच विशेष प्रयत्न तिरंगा फाउंडेशन चे संस्थापक रणजीत शिंदे सर, स्पेशल फॉर्स चे योगेश जाधव, महाराष्ट्र पोलीस तानाजी माने यांचे सहकार्य लाभले.❤️🇮🇳🙏💐