19/11/2017
खरी समाजसेवा....
( सदर- काही सुखद ......)
समाजामध्ये आजही सामाजिक भावना व मानुसकी जाग्रुत असल्याचे दिसून येत आहे. येथीलच एका तरुणाने गोरगरीब, अपंग व मंतिमंदमुलांची दिवाळी नव्या कपड्यात आणी गोडमिठाईचा घास भरवून साजरी केली . एका डोंगरकपारीतील गणेवाडी सारख्या गावातील एक सुशिक्षित तरूणाने आपल्या एका दिवसाच्या मिळणाऱ्या चायनिज गाड्यावरील पदार्थाच्या उत्पन्नातून केला. त्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
न्यु इंडियन मंच्युरीयन सेंटर मल्हारपेठ यांच्या प्रथम वर्धापनदिना नीमीत्त ऐन दिवाळी सणात एक सामाजिक ऊपक्रम म्हणुन अधिक कदम या तरूणाने आपल्या एका दिवसाच्या होणाऱ्या व्यवसायातुन मिळणार्या पैशातून गणेवाडी(ता- पाटण) या त्याच्याच गावातील चार अपंग व एक मंतिमंद मुलांची दिवाळी इतर मुलांच्यासारखी गोड मिठाई भरवून आणि नव्या कपड्यात साजरी केली. त्याने स्वतःच्या हाताने गोड मिठाईचा घास या मतिमंद मुलाना भरवला यावेळी त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यावरील आनंदाश्रु अोसंडुन वहात होते. अधिकने स्वतःला सणाला कपडे न घेता या अपंग आणी मतिमंद मुलांच्या समवेत त्यांच्या बरोबर दिवाळी साजरी केली. कारण एरव्ही अशा मुलांचा सांभाळ करणे हे आईवडिलांसमोर मोठे दिव्यच असते कारण या मुलांना उचलून शाळेत न्हेवुन बसवणे शाळा सुटलेवर परत घरी आणने त्यांचा आहार कपडे लत्तेया गोष्टींची काळजी घेणे या बाबि एखाद्या घरात असलेल्या आजारी व्यक्तिच्या सेवेपेक्षाही मोठे अग्निदिव्य पार करण्यासारखेच आहे.आणी याच उद्दात्त हेतूने प्रेरीत होवुन अशा मुलांसाठी काय तरी करावे.त्यांच्याही इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात इतरांसारखे त्यांचे जीवन असावे म्हणुन त्यांच्याशी मैत्री करुन त्याना अपलसं करत आहे ,आणि यामुळेच या मुलांसाठी आपण काय तरी केलं पाहिजे या हेतूने प्रेरित होवुन अधिक धडपड करत आहे. शाळेत जाणाऱ्या या मुलांच्या वह्या पुस्तके, पेनपेन्सिल यांची तो शाळेतील गुरुंजींच्याकडे सतत चौकशी करत असतो.वेळोवेळी अधिक शालेय उपक्रमात मदत करत असतो. चायनीज गाड्यावर मंचुरियन विकण्याचा व्यवसाय करत करत अधिकमध्ये समाजसेवा ठासून भरलेली दिसुन येत आहे.
त्याने २७ ऑक्टोंम्बर दिवशी मंच्युरीयन विकुन जे पैसे जमा होतील ते गणेवाडी गावातील अपंग व मतीमंद मुलांसाठी खर्च केले जातील... असा मनोदय व्यक्त केला होता.यात. जमलेल्या ४हजार ५०० रुपयामध्ये या मुलाना नविन कपडे,मिठाई, देवून समाजातील दानशुर व्यक्तीच्या समोर एक आदर्श निमाण केला आहे. एक चायनीज गाडा चालवणारा अधिकच्या मनामध्ये समाजसेवा ठासून भरलेली आहे गेल्याच महिण्यात अधिकने हा व्यवसाय मुंबईत करत असताना वैधयकिय क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या मित्रांना आपल्या गावातील आपल्या मातीतील गोरगरिबांना मोफत सर्वरोग निदान शिबिर आयोजित केले होते त्यास चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच अधिक ने गावात मुलांसाठी गडकोट कार्यक्रम,(किल्ले स्पर्धा) व गुणगौरव सोहळा हे कार्यक्रम सुद्धा राबवले...
----------------
यावेळी अधिक कदम म्हणाला.----
मि पण एका सामान्य कुटुंबातील असुन माझेही आईवडिलानी मोलमजुरी करुन दिवस काढले आहेत . एखाद्याच्या घरी अपंग मूल जन्माला आल्यावर त्या आईवडिलांची काय मानसिकता असते हे मि जवळून पाहिले आहे ,त्यांचा सांभाळ पालनपोषण करणे ही खूपच अवघड गोष्ट असते त्यांच्याही डोळ्यावर मला इतर मुलांचेसारखॆ हसू पहायचे होते ,अशा मुलांसाठी यापुढेही मि मदतीसाठी प्रयत्न करणार आहे.
लेख :- विलास माने (पत्रकार) ठोमसे...