अपशिंगे मिलिटरी

अपशिंगे मिलिटरी ईथे घडती वीर जवान
शूर वीरांची भूमी अपशिंगे मिलिटरी

Apshinge Village of warriors
==HISTORY of those BRAVE 46==
The Nikams are not just a family of armymen, they are a family of armymen who’ve fought wars — big ones like the First and Second World Wars, and the 1971 India-Pakistan War. Brigadier Mohan Nikam (Retd), 64, credits his family’s wartime profile to his village, Apshinge, “where every boy dreamt of being in the Army”. Speaking with the prec

ision of a soldier, he says, “Apshinge is approximately 16 km south of Satara and 2 km off the Mumbai-Bangalore highway.” During World War I, he says, “90 per cent of the able-bodied men in Apshinge were employed with the British Army.” One of them was his grandfather, Havaldar Dhondi Nikam, of the 1/103 Maratha Light Infantry.

।। दुःखद घटना ।।*आमचे वर्गमित्र, कामेरी गावचे भूषण,श्री.शुभम समाधान घाडगे (फौजी) यांना देशसेवा बजावत असताना वीरमरण आले. ...
25/12/2024

।। दुःखद घटना ।।

*आमचे वर्गमित्र, कामेरी गावचे भूषण,श्री.शुभम समाधान घाडगे (फौजी) यांना देशसेवा बजावत असताना वीरमरण आले. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यातून त्यांना सावरण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🌼🙏🏻 ।।भावपूर्ण श्रद्धांजली दोस्ता🥺।।*

30/01/2024
अपशिंगे गावचे सुपुत्र व आमचे परममित्र इंजिनियर अजय रविंद्र निकम यांची जिद्द कष्ट व चिकाटीच्या जोरावर SBM Offshore, बेंगल...
20/01/2024

अपशिंगे गावचे सुपुत्र व आमचे परममित्र इंजिनियर अजय रविंद्र निकम यांची जिद्द कष्ट व चिकाटीच्या जोरावर SBM Offshore, बेंगलोर तर्फे ऑईल & गॅस मरीन शिप प्रोजेक्ट साठी प्रमुख डिझाईन इंजिनिअर म्हणून नेदरलॅंड, युरोप येथे निवड झाल्याबद्दल हार्दीक हार्दीक अभिनंदन तसेच भावी वाटचालीसाठी त्यांना हार्दीक शुभेच्छा 🎊🎉🤟🏻

#करून_दाखवलय
#संधी_अशीच_सहज_मिळत_नसते_तर_संधी_कष्टाने_तयार_करावी_लागते

अपशिंगे गावच्या नागरिक सौ. रोहिणी शंकर निकम ( ताई ) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांना समस्त अपशिंगे...
16/08/2023

अपशिंगे गावच्या नागरिक सौ. रोहिणी शंकर निकम ( ताई ) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांना समस्त अपशिंगे ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. 💐💐💐🙏💐💐💐

मुंबई स्थित आचार्य ट्रस्ट तर्फे गावातील शाळांना पाच लाखांची मदत.अपशिंगे गावावरती विशेष प्रेम असलेल्या आचार्य परिवार संचा...
16/08/2023

मुंबई स्थित आचार्य ट्रस्ट तर्फे गावातील शाळांना पाच लाखांची मदत.

अपशिंगे गावावरती विशेष प्रेम असलेल्या आचार्य परिवार संचालित आचार्य ट्रस्ट च्या वतीने
जिल्हा परिषद शाळा अपशिंगे यांना दोन लाख रुपये सुरक्षा ठेव

छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांना तीन लाख रुपये सुरक्षा ठेव ज्याच्या व्याजाच्या मार्फत विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी यांना दरवर्षी बक्षीस वितरण करण्यात येईल.

ह्या आधी देखील असेम्ब्ली हॉल सुशोभीकरण व हॉल कॅटरिंग व इतर साहित्य भेट असे विविध सेवाकार्य आचार्य ट्रस्ट च्या वतीने गावात करण्यात आले आहे ह्या प्रेमाबद्दल व गौरवाबद्दल आचार्य परिवार व ट्रस्ट यांचे विशेष आभार ह्या निमित्ताने सौ अरुणा नागेंद्र आचार्य संचालिका आचार्य ट्रस्ट यांनी रणगाडा परिसरातील ध्वजारोहण केले.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या भूमिपुत्र यांचा हस्ते ध्वजारोहण संपन्न.आजच्या ७७ व्या स्वत्रंत्रदिना निम्मित एक...
15/08/2023

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या भूमिपुत्र यांचा हस्ते ध्वजारोहण संपन्न.

आजच्या ७७ व्या स्वत्रंत्रदिना निम्मित एक अनोख्या पद्धतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला गेल्या वर्षीच्या सामाजिक, शैक्षणिक,स्पर्धा परीक्षा, क्रिडा सर्व क्षेत्रात प्रविण्या तसेच उल्लेखनीय काम करत गावचे नाव उज्ज्वल केलेल्या भूमिपुत्रांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

(ध्वजारोहण ठिकाण)

१.अभिलाष प्रभाकर निकम सेल टॅक्स इन्स्पेक्टर (मुंबई हायस्कूल शाळा),
२.अविराज अर्जुन मोरे कक्ष अधिकारी मंत्रालय (विजयस्तंभ),
३.शुभम दिलीप निकम ए डी ओ एल आय सी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अपशिंगे),
४.महेश तुकाराम निकम (सुभेदार निवृत्त ग्रामपंचायत अपशिंगे)
५.प्रीतम संपत निकम निवृत्त सैनिक
(आरोग्य केंद्र अपशिंगे) झेंडावंदन केले आहे,

तसेच कार्यक्रमाच्या निमिताने खालील अपशिंगकरांचे विशेष अभिनंदन करण्यात आले,
१.कुमारी.शामली दीपक निकम पीएसआय
२.वरून संतोष निकम आयआयटी खरगपूर प्रवेश
३.पाकीजा इनुस शेख शिखर बँक अधिकारी
४.अमित गडांकुश खाशाबा जाधव सातारा जिल्हा पुरस्कार
५.सुमैम्या मुलाणी कोण बनेगा करोडपती मध्ये सहभाग या सर्वांचे अभिनंदन

*मेरी मिट्टी ,मेरा देश* या कार्यक्रमअंतर्गत अपशिंगे मिलिटरी येथे ग्रामपंचायत तर्फे ध्वजारोहण व स्वातंत्र्योत्तर कालावधीम...
15/08/2023

*मेरी मिट्टी ,मेरा देश* या कार्यक्रमअंतर्गत अपशिंगे मिलिटरी येथे ग्रामपंचायत तर्फे ध्वजारोहण व स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये देशाच्या रक्षणासठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर योध्याना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच श्री तुषार निकम यांनी केले व सर्व ग्रा . प. सदस्य आणि ग्रामपंचायीमार्फत या देशसेवा करणाऱ्या जवाना प्रती सन्मान करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्रिगेडयर मोहन निकम यांच्या हस्ते प्रथम शहिदांना पुष्पचक्रअर्पण केले. व ध्वजारोहण केले. सैनिक सहकारी बँकेचे अध्यक्ष कॅप्टन उदाजी निकम यांनीही पुष्पचक्र अर्पण केले. या कार्यक्रमात गावातील सर्व संस्था, मंडळे, शाळेतील मुले व शिक्षक, समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. मुलांनी राष्ट्रभक्ती पर गीते सादर केली. या प्रसंगी कमांडंट तानाजी पवार, डॉ. राजेंद्र मोरे, सातारा तालुक्याचे बी डी ओ श्री वाघमले आवर्जून उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्योत्तर काळात 1948 ते 1999 दरम्यानच्या काळात शहिदांच्या वीरमाता, वीरपत्नी व वीर योद्धा यांचा मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचयतीतर्फे सन्मान पत्र व पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. दिल्लीतील शहीद स्मारकांसाठी देशातील सर्व गावातील माती संकलित करण्यात येत आहे म्हणून गावातील माती सर्वांच्या शुभहस्ते कलशात भरण्यात आली. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे असे मत कॅप्टन उदाजी निकम यांनी व्यक्त केले. गावात नवीन झालेल्या अग्नीवीर ट्रेनिंग सेंटर चा सर्व मुलामुलींनी लाभ घेऊन सैनिकी परंपरा अशीच अजून सक्षमतेने पुढे नेण्यासाठी आवाहन ब्रिगेडयर मोहन निकम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राजेंद्र मोरे व हेमंत निकम यांनी केले व श्री सतीश निकम यांनी आभार व्यक्त केले.

विजयस्तंभाला अभिवादन करताना धैर्यशील कदम आणि मान्यवर 🙏🏼
13/08/2023

विजयस्तंभाला अभिवादन करताना धैर्यशील कदम आणि मान्यवर 🙏🏼

अतिशय दुःखद घटना ...............आपल्या गावचे थोर व्यक्तिमत्व आदरणीय ऑ कॅप्टन दिनकर लक्ष्मण करांडे साहेब (बाबा) यांना रात...
13/08/2023

अतिशय दुःखद घटना ...............
आपल्या गावचे थोर व्यक्तिमत्व आदरणीय ऑ कॅप्टन दिनकर लक्ष्मण करांडे साहेब (बाबा) यांना रात्री देवाज्ञा झाली. समस्त ग्रामस्थांनकडून त्यांना विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐

गौरव शुरांचा गौरव अपशिंगे च्या मातीचा..आपल्या अपशिंगे भूमीतील १९६२ चीन, १९६५ बांगलादेश मुक्ती संग्राम,१९७१ भारत पाकिस्ता...
13/08/2023

गौरव शुरांचा गौरव अपशिंगे च्या मातीचा..

आपल्या अपशिंगे भूमीतील १९६२ चीन, १९६५ बांगलादेश मुक्ती संग्राम,१९७१ भारत पाकिस्तान युद्ध व विविध सेवाकार्यत शहीद झालेले शुर जवानांचे स्मरण तसेच ह्या सर्व युद्धात सक्रिय सहभाग घेतलेले अश्या ४७ शुर माजी सैनिक यांचा येत्या ७६ स्वतंत्रादिनी जाहीर सत्कार घेण्याचे योजिले आहे.

आपला देश अमृत्कालात (२०२३-२०४७) प्रवेश करत आहे अश्या वेळी आपल्या देशाची मान उंच करून तिरंगा फडकवत राहण्यासाठी बलिदान व योगदान दिलेल्या जवानांचा सन्मान आणि सत्कार करणे हे आमचे भाग्य आणि कर्तव्य समजतो...आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

माझी माती माझा देश...माझा अभिमान..

१४ ऑगस्ट २०२३ असेम्ब्ली हॉल परिसर.सकाळी ९ वाजता.

Address

Satara
415518

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अपशिंगे मिलिटरी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to अपशिंगे मिलिटरी:

Share

Category