12/11/2023
व्यवसाय नव्हे,वाचन चळवळ ! दिवाळी बुक फेस्टीव्हल, शहादा
- लोप पावत चाललेली वाचन चळवळ वृद्धिगंत करण्यासाठी पुस्तक प्रदर्शने,वाचक मेळावे,विविध स्पर्धा,वाचन प्रेरणा दिन,वाचन कट्टा,वाचक कोपरा असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. मात्र दिवाळीच्या सुट्यांमध्ये 'फटाके नको,पुस्तके घ्या ' अस एक चांगला संदेश देणारा एक आगळावेगळा उपक्रम 'दिवाळी बुक फेस्टिवल शहादा ' ला आज भेट देण्याचा योग आला आणि विविध पुस्तकांचे,विविध लेखकांचे दर्शन घेता आले,त्यापैकी काही पुस्तके खरेदी करता आली तर काही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत हे इतरांना सांगता आले.
तळगाळात जाऊन विज्ञान तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देत समाजात असलेली अंधश्रध्दा नष्ट करणाऱ्या अंधश्रध्दा निर्मुलन समिती शहादा यांच्यातर्फे तब्बल ७ वर्षापासून शहादा शहरात ' दिवाळी बुक फेस्टिवल उपक्रम आयोजित केला जातोय.अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे कार्यवाह तथा माझ्यासारख्या असंख्य युवकांचे प्रेरणास्थान असलेले मा.विनायक सावळे सर,जिल्हाध्यक्ष मा.रवींद्र पाटील सर, कार्याध्यक्ष संतोषदादा महाजन व त्यांची सर्व टीम या फेस्टिवल चे आयोजन करत असते. याहीवर्षी दिनांक 22 नोव्हेंबर पर्यंत बुक फेस्टिवल उपक्रम चालणार आहे.यामध्ये पुस्तक विक्रीतून जमा झालेला पैसा हा वर्षभर चालणाऱ्या सामाजिक कार्यासाठी,प्रबोधन कार्यासाठी उपयोगात आणला जातो म्हणजेच पुस्तक खरेदीसाठी खर्च होणारा आपला पैसा हा चांगल्या कार्यासाठी सत्कारणी लागणार आहे. सातपुड्याच्या दऱ्या खोऱ्यातील वाचकांनी पुस्तक प्रदर्शनात भेट देऊन पुस्तके खरेदी करावीत,वाचन चळवळ वृध्दीगंत करावी अशी अपेक्षा आहे.
एका बाजूला फटाक्यांचे मोठमोठे स्टॉल आणि दुसऱ्या बाजूला असंख्य पुस्तके उपलब्ध असलेले पुस्तक प्रदर्शन व पुस्तक विक्री केंद्र ग्राहकांना,वाचकांना नेमकं पुस्तके घ्यावीत की फटाके? याबद्दल विचार करण्यास भाग पाडतं ! आणि आयुष्यात फटाक्यापेक्षा पुस्तके किती महत्वाची आहेत याचं महत्त्वही अधोरेखित करतं! सदरील पुस्तक प्रदर्शन 22 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार असून नक्कीच आपणही या पुस्तक प्रदर्शनाला भेट देऊन नवनवीन लेखकांच्या दर्जेदार साहित्याचे अवलोकन करावे,भरपूर पुस्तक खरेदी करावीत आणि वाचन चळवळ वृध्दींगत करण्यासाठी हातभार लावावा ही विनंती आहे.
- प्रवीण महाजन,पुणे/नंदुरबार
अंधश्रध्दा निर्मूलन समिती रत्नागिरी अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कळंब डॉ.नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमाला, नाशिक अंधश्रध्दा निर्मूलन - antisuperstition डॉ. नरेंद्र दाभोळकर Yuvakmitra Parivar- युवकमित्र परिवार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती