
20/07/2025
*🌹 "स्वाभिमानाचा युवा तरुणाईचा चेहरा – धीरज राजपूत!"*
*🎉 आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎉*
शिरपूर शहराच्या मातीतील सुपुत्र, युवा उद्योजक, तरुणांचे लाडके नेतृत्व, अखिल भारतीय क्षत्रिय सभा – धुळे जिल्हाध्यक्ष मा.भाऊसाहेब धीरज केवलसिंह राजपूत यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि मनःपूर्वक शुभकामना!
धीरजभाऊंच्या व्यक्तिमत्त्वात एक आगळीच तेजस्विता आहे. राजकारण आणि समाजकारण यांचा वारसा त्यांना घरातूनच लाभलेला, मात्र त्यांनी तो वारसा केवळ जपलेला नाही, तर अधिक प्रगल्भतेने, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पुढे नेलेला आहे. वडील केवलसिंह आप्पा यांच्यासारखा कणखर आणि स्पष्टवक्त्या नेतृत्वाचा वारसा धीरजभाऊंनी आपल्या विचारधारेत, कामात आणि प्रत्येक कृतीत सार्थ केला आहे.
आजच्या काळात, जेव्हा विचारांची तडजोड करणाऱ्यांची रांग असते, लोकसत्तेच्या प्रवाहाकडे होऊन जातात,तेव्हा धीरज राजपूत हे नाव ठाम उभं राहतं – कोणत्याही आमिषाला बळी न पडणारा, कोणत्याही भीतीपुढे न झुकणारा, आणि कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमानाशी तडजोड न करणारा सच्चा आणि स्वाभिमानी कार्यकर्ता.
त्यांचा मित्रमंडळीत आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेला प्रभाव म्हणजे त्यांची माणूस जोडणारी तळमळ, प्रत्येकाच्या दुःखात सहभागी होणारी मन:पूर्वकता, आणि कामाच्या बाबतीत असलेली शिस्त. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्यासोबत खांद्याला खांदा लावत त्यांनी जी भूमिका निभावली, ती एक प्रामाणिकतेची आणि पक्षाशी नव्हे, तर विचाराशी बांधिलकीची होती. यात त्यांनी अजिबात विश्वासाला तडा जाऊ दिला नाही.
शिरपूरच्या जनतेच्या हक्कांसाठी सतत लढणाऱ्या, संघटनांना साथ देणाऱ्या, आणि नव्या पिढीला स्वाभिमानाने उभं राहण्याची प्रेरणा देणाऱ्या धीरजभाऊंचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. आणि म्हणून ते शिरपूर फर्स्ट सारखा संघटनेचा युवा चेहरा म्हणून समोर आले.
🌟 आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या नेतृत्वाला, संघर्षाला, विचारनिष्ठतेला आणि माणुसकीला मानाचा मुजरा करत, त्यांच्या यशस्वी, दीर्घ आणि समाजसेवेमय आयुष्याची ईश्वरचरणी प्रार्थना . 🌟
*"तुमच्या विचारांचा वणवा असाच धगधगत राहो,आपली साथ जनतेला सदैव लाभो,*
*आपले स्वाभिमानाचे झेंडे सदा उंच राहो!"*
*✍️🎂🎉💐 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा – महेंद्रसिंह राजपूत ,संपादक निर्भीड विचार 💐🎉🎂*