Shrigonda Majha

Shrigonda Majha Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shrigonda Majha, News & Media Website, Shrigonda.

23/02/2026

श्रीगोंदा यात्रा लवकरच 2k26..
#श्रीगोंदा

किरकोळ वादातून रजपूत यांची निघृण हत्याश्रीगोंदा | श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव येथे किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात भा...
18/01/2026

किरकोळ वादातून रजपूत यांची निघृण हत्या

श्रीगोंदा |
श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव येथे किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात भाऊसाहेब रजपूत (वय ४३) यांची निघृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपीने शनिवारी रात्री सुमारे ११ वाजता रजपूत यांच्या घरात घुसून छातीवर चाकूने वार केला.

गंभीर जखमी अवस्थेत रजपूत यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.

🚨 विवाहित महिलेचा पाठलाग; पतीला जीवे मारण्याची धमकीश्रीगोंदा शहरात विवाहित महिलेचा पाठलाग करून लज्जा उत्पन्न होईल असे वर...
06/01/2026

🚨 विवाहित महिलेचा पाठलाग; पतीला जीवे मारण्याची धमकी

श्रीगोंदा शहरात विवाहित महिलेचा पाठलाग करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या तरुणावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ४ जानेवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शहरातील गजबजलेल्या हॉटेल परिसरात घडली.
पीडित महिला हॉटेलमध्ये जेवण करत असताना लाल रंगाच्या स्कुटीवरून आलेल्या तरुणाने तिच्याकडे लज्जास्पद नजरेने पाहत संशयास्पद वर्तन केले. महिला घरी निघाल्यानंतर आरोपीने तिचा पाठलाग सुरू केला.
घाबरलेल्या महिलेने पतीला फोन करून माहिती दिल्यानंतर पती व त्यांचे मित्र घटनास्थळी पोहोचले. आरोपीला जाब विचारताच त्याने शिवीगाळ करत अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिस ठाण्यात आणल्यानंतरही आरोपीने पीडित महिला व तिच्या पतीला “तुम्हाला बघून घेतो” अशी धमकी दिली.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून पंकज रामदास नरसाळे
(मूळ रा. गोरेगाव, ता. पारनेर, सध्या रा. श्रीगोंदा)
याच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे शहरातील वर्दळीच्या भागात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

02/01/2026

“राजकारणात कोणाचाही शेवट नसतो, कोणाचाही कायम नसतो” – आमदार विक्रमसिंह पाचपुते

रब्बी हंगामातील पिकांसाठी कुकडी प्रकल्पाचे आवर्तन सुरू करण्यात आले असून, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर...
27/12/2025

रब्बी हंगामातील पिकांसाठी कुकडी प्रकल्पाचे आवर्तन सुरू करण्यात आले असून, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार २६ डिसेंबरपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
नगरपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कालवा सल्लागार समितीची बैठक होऊ शकली नव्हती, मात्र शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन तातडीने हा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयामुळे पुणे (आंबेगाव, शिरूर, जुन्नर), सोलापूर (करमाळा) आणि अहिल्यानगर (कर्जत, श्रीगोंदा, पारनेर) तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रब्बी पिकांना वेळेत व पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी ४० दिवसांचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पात सध्या २६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून, टेलपर्यंत पाणी पोहोचावे व अपव्यय टळावा यासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.


“आमचा पराभव नसून हा आमचा विजयच आहे” – मनोहर पोटे
25/12/2025

“आमचा पराभव नसून हा आमचा विजयच आहे” – मनोहर पोटे

25/12/2025

लातूर निवडणूक प्रचारात महिला मतदारांनी BJP नेत्यांना ‘कशाला आलात’ म्हणत नाराजी व्यक्त केली

25/12/2025

🔴 काष्टीत महामार्गालगतची अतिक्रमणे हटवली; अहिल्यानगर–दौंड मार्ग मोकळा, रस्त्याने घेतला मोकळा श्वास

25/12/2025

तमाशाचा कार्यक्रम अन् थेट मारामारी! 😳
बीड जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार…
प्रेक्षकांच्या गर्दीतच तमाशाचा कार्यक्रम सुरू असतानाच अचानक वाद उफाळला आणि क्षणातच फ्रीस्टाइल फाइटला सुरुवात झाली. कार्यक्रम पाहण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांसमोरच धक्कादायक दृश्ये पाहायला मिळाली.

विद्यार्थ्यांवर शारीरिक-मानसिक छळ ‘नो टॉलरन्स’! उठाबशा, अपमान, वर्गाबाहेर उभे करणे थांबवा; नियमभंग करणाऱ्या शिक्षकांवर न...
24/12/2025

विद्यार्थ्यांवर शारीरिक-मानसिक छळ ‘नो टॉलरन्स’! उठाबशा, अपमान, वर्गाबाहेर उभे करणे थांबवा; नियमभंग करणाऱ्या शिक्षकांवर निलंबन, बडतर्फी आणि कायदेशीर कारवाई अनिवार्य!

24/12/2025

🔴 BREAKING NEWS | श्रीगोंदा हादरले
#श्रीगोंदा : आदिवासी भिल्ल समाजाच्या ऊसतोड मजुरांवर अमानुष हल्ला
मनमाड तालुक्यातील नांदगाव येथून ऊसतोडीसाठी आलेल्या आदिवासी भिल्ल समाजाच्या मजुरांवर जातीय द्वेषातून बेदम मारहाण करण्यात आली.
शेजारील शेतात दुसऱ्याच ट्रॅक्टरमुळे १०–१५ मिरचीच्या झाडांचे नुकसान झाले असताना, त्या नुकसानीचा आरोप ऊसतोड मजुरांवर लावून महिला, लहान मुले व मुलींनाही दांड्याने मारहाण करण्यात आली. अनेक जण जखमी आहेत.
दुपारपासून पीडित श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी बसले असतानाही तक्रार नोंदवली जात नसल्याचा आरोप आहे. राजकीय दबावाखाली पोलीस दखल घेत नसल्याचा गंभीर आरोप पीडितांकडून करण्यात येत आहे.

Address

Shrigonda
413701

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shrigonda Majha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share