जरा हटके

जरा हटके Anything is Different

02/11/2025

भाजपच्या दृष्टीने आता मित्रपक्षांची उपयुक्तता संपली

भाजपच्या दृष्टीने आता त्यांच्या मित्रपक्षांची उपयुक्तता संपली आहे. त्यामुळे त्या "कुबड्या" पुढे टिकवून ठेवायच्या की चुलीत घालायच्या, हे पाहणे बाकी आहे, असा जोरदार टोलाही रोहित पवारांनी लगावला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भाजपचे सत्ताधारी मित्रपक्ष अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची शिवसेना यांच्यावर टीका केली. बोगस मतदार यादीच्या प्रकरणामुळे या दोन्ही पक्षांना फटका बसण्याची भीती असल्याचंही रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं.

02/11/2025

चंद्रकांतदादा पाटलांच्या वक्तव्याने उडाला धुराळा

शिवसेना हा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष आहे, मनसे हा राज ठाकरे यांचा पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा, तर काँग्रेस हा इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा पक्ष आहे. परंतु भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे जो कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. 2014 नंतर भाजपमध्ये अनेक नवीन चेहरे आणि विविध पक्षांतून आलेले नेते सहभागी झाले, तरीसुद्धा पक्षाने आपली मूळ विचारधारा आणि तत्त्वे कधीही सोडलेली नाहीत.
- चंद्रकांतदादा पाटील

29/10/2025

आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा ‘पप्पू’ बनू नये

“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा ‘पप्पू’ असल्याचं प्रदर्शन करू नये. मी त्यांना ‘महाराष्ट्राचा पप्पू’ म्हणणार नाही, पण त्यांनी तसं वागू नये. राहुल गांधी जसं मोठं प्रदर्शन करून शेवटी ‘खोदा पहाड, निकला चुहा’ असं होतं, तसंच काहीसं काल आदित्य ठाकरेंनी केलं. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाने आधीच दिली आहेत. माझी त्यांच्याकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे, त्यांनी राहुल गांधी होण्याचा प्रयत्न करू नये,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

29/10/2025

आता भगतसिंगगीरी सुरू होईल

वर्धा मार्गावरील पांजरा वळण रस्त्यावर मागील दोन दिवसांपासून हजारो शेतकरी ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. काल रात्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसोबत रस्त्यावरच रात्र काढली, तर आज सकाळी पुन्हा आंदोलन सुरू ठेवले. "उघड्यावर रात्र घालवणं आमच्यासाठी नवीन नाही, पण हा अन्याय आम्ही आणखी किती काळ सहन करायचा? सरकारने आमच्या संयमाची परीक्षा घेण्याचं ठरवलंय का? मग तयार राहा, आता भगतसिंगगीरी सुरू होईल!" अशा तीव्र शब्दांत बच्चू कडू यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

29/10/2025

प्रहार संघटनेने केले चार महामार्ग जाम

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांनी नागपूर–वर्धा आणि जबलपूर–हैदराबाद या महामार्गांसह इतर चार महामार्गांवरही वाहतूक ठप्प केली आहे.

Address

Padhegaon
Shrirampur
413721

Alerts

Be the first to know and let us send you an email when जरा हटके posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to जरा हटके:

Share