17/05/2025
Bhumiraj Digital Insurance Sarvises Sangle Motilal Motilal Hausabai Madhav Sangle Motilal Madhav Sangle
*मोतीलाल सांगळे*
*भुमीराज डिजिटल इन्शुरन्स सर्विसेस चापडगाव*
*मो नं 8275585108*
*अधिक माहितीसाठी ग्रुप जॉईन करा👇🏻👇🏻*
https://chat.whatsapp.com/GtTP3taNzOWBLCq0OJAYMI
🙏 मेडीक्लेमची (आरोग्य विमा) आवश्यकता का आहे* 🙏
१ . आपल्या घरात पैसे उपलब्ध असतीलच असे नाही* .
२ . आजारी कोण आणि केंव्हा पडू शकत हे माहित राहत नाही *.
३. हौस्पिटलच्या बिलात सवलत मिळेलच हे माहित नाही* .
४. डॉक्टराना पैसे मिळाल्या शिवाय ते उपचार सुरु करू शकत नाही * .
५. पेशेंट च्या वेदना आपण बघू शकत नाही * .
💍🚘 ६. मेडिक्लेम नसल्यास घरातली महागडी वस्तू विकण्याचा विचार करू शकतो* .
७ . आपल्या व्यवसायाचे पैसे हौस्पिटलला लागले तर पुरेसे भांडवल नसल्यामुळे व्यवसाय बंद पडु शकतो * .
🚑८ . आजारी पडण व अक्सिडेट होणे हे आपल्याला विचारून येत नाही*.
९. पाहिल्यासारखे कमी पैशात आजार बरे होवू शकत नाही * .
१०. आपल्याला मेडीक्लेम घेऊ नको सांगणारा व्यक्ती मदतीला येऊ शकतो परंतु आर्थिक मदत करू शकत नाही *
*तेंव्हा लक्षात येते की मेडिक्लेम पॉलिसी राहिली असती तर कुठे पैसे बघण्याची वेळ आली नसती*
👌🏻 *मेडिक्लेम कोण घेऊ शकत* 👇🏻
१. ज्याला आपली व आपल्या परिवाराची काळजी आहे*.
२. जो आपल्या घरात सुख शांती बघू शकतो* .
😀 *मेडिक्लेम केंव्हा घेऊ शकतो* 😀
*जेंव्हा आपल्याला मेडिक्लेम ची आवश्यकता नाही तेंव्हा तो घेतला पाहिजे* .
*कारण जेंव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित मेडिक्लेम भेटणार नाही . आणि जरी भेटला तरी आपल्याला फायदा त्याचा लगेच होणार नाही* .
*आरोग्य विमा म्हणजेच मेडिक्लेम पॉलिसी हि प्रत्येका जवळ असणे काळजी गरज आहे*
'हेल्थ इन्शुरन्स'
सध्या कोरोना विषाणू आणि त्याच्याशी निगडित 'मेडिकल इमर्जन्सी'मुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक इमर्जन्सीने आपण सर्वच आयुष्यातील आव्हानात्मक काळाला सामोरे जात आहोत.
या काळात 'मेडिकल इमर्जन्सी' निर्माण झाल्यास चांगली आरोग्य विमा पॉलिसी असणे अतिशय महत्वाचे आहे.
आपल्याला किती 'इन्शुरन्स कव्हर' हवे आहे ?
'कव्हर' सर्व प्रथम तुमच्या कुटुंबातील किती सदस्यांना कव्हर हवे आणि इतर निकष म्हणजे, तुम्ही राहात असलेले शहर, तुमची जीवनशैली आणि कोणत्या वर्गातील हॉस्पिटल हवे. हॉस्पिटलनुसार उपचाराचा खर्च बदलत जातो,
याची तुम्हाला माहिती हवी. जेवढे मोठे आणि चांगले हॉस्पिटल तेवढा उपचाराचा खर्च अधिक असतो. त्यामुळे तुमच्या कुटुंबाला योग्य इन्शुरन्स कव्हर घेताना वरील निकषांच्या आधार घ्या.
व्यक्तिगत कव्हर अथवा फॅमिली फ्लोटर प्लॅन?
तुम्हाला कोणता प्लॅन खरेदी करावयाचा आहे याचा निर्णय घ्यावा लागेल.
व्यक्तिगत 'हेल्थ कव्हर प्लॅन' आणि कुटुंबाला कव्हर करणारा 'फॅमिली फ्लोटर प्लॅन' असे दोन प्रकारचे प्लॅन असतात.
कुटुंबाला कव्हर मिळत असल्याने हा प्लॅन अधिक किमतीचा वाटतो. मात्र, कुटुंबातील प्रति व्यक्ती हिशेब केल्यास हा प्लॅन व्यक्तिगत प्लॅनपेक्षा कमी किमतीचा ठरतो.
ही ठरवून घेतलेली जोखीम आहे. कारण, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एकाच वर्षात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ येत नाही. यामुळे फ्लोटर बहुतांश प्रकरणात योग्य ठरू शकतो.
हॉस्पिटलच्या रूमच्या भाडे मर्यादेचा नियम 'हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी'मध्ये असतो.
याचाच अर्थ तुम्हाला एका मर्यादे पर्यंत वैद्यकीय खर्चाचा दावा करता येतो.
हॉस्पिटलमध्ये तुम्ही जादा भाड्याची रूम घेतल्यास त्याचा अधिकचा खर्च तुम्हाला करावा लागतो.
समजा तुमची पॉलीसी 3 लाख रुपये बीमा रकमे ची आहे ,पॉलिसीमध्ये रूमची भाडे मर्यादा दिवसाला 3 हजार रुपये असेल आणि तुम्ही 4 हजार रुपये भाडे असलेली रूम निवडल्यास तुम्हाला वरील 1 हजार रुपये स्वतः भरावे लागतील.
ॲडमीट करते वेळेस पॉलीसी च्या नियमा नुसार रुम घेतल्यास स्वतः ला काही भरण्याची गरज भासत नाही
सध्या असलेले जुने आजार
असे आजार 'मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी'मध्ये काही काळाच्या प्रतीक्षेनंतर समाविष्ट होतात आणि त्याचे नियम पॉलीसी नुसार वेग वेगळे असतात.
दावे नाकारणे
आधी असलेल्या आजाराची खरी माहिती दिली गेली नाही म्हणून दावे नाकारले जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
एखाद्या व्यक्तीला आधीच मधुमेह अथवा रक्तदाब असल्यास आणि त्याने तो पॉलिसी घेताना उघड केल्यास दावा नाकारला जात नाही.
'लाईफ इन्शुरन्स'मध्ये प्रिमियम हा पूर्ण कालावधी साठी निश्चित असतो. त्यात बदल होत नाही.
उलट हेल्थ इन्शुरन्स प्रिमियम तुमच्या वयाच्या दर पाच वर्षांनी वाढत जातो.
एखादी पॉलिसी घायची म्हंटलं की आपल्याला अनेक गोष्टी तपासून घ्यायला हव्यात.
अशात अनेक वेबसाईट्स या खोट्या किंवा चुकीची माहिती देणाऱ्या असतात.
यासाठी तुम्हाला काळजी पुर्वक सर्व नियम व अटी समझून घेतल्यावरच पॉलीसी घायला हवी ?
वरील संग्राह्य माहिती संकलन करून आपल्या पर्यंत पोहोच करणारा
*मोतीलाल सांगळे*
*भुमीराज डिजिटल इन्शुरन्स सर्विसेस चापडगाव* *8275585108*