Jansanvad Digital Media Solapur

Jansanvad Digital Media Solapur जनतेच्या हक्काचं निर्भीड व्यासपीठ...

प्रभाग २६ ब मधील विविध नगरमध्ये विकास कामासाठी निधीबाबत निवेदन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना देण्यात आलेसोलापूर,...
18/01/2024

प्रभाग २६ ब मधील विविध नगरमध्ये विकास कामासाठी निधीबाबत निवेदन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना देण्यात आले

सोलापूर, ता.१८ : येथील जुळे सोलापूर भागातील विशेष करून प्रभाग २६ मधील अनेक नगरामध्ये नागरिकांच्या समस्या यामध्ये ड्रेनेज,पाण्याच्या पाईपलाईन,अंतर्गत रस्ते,दिवाबत्ती अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. महापालिकेत प्रशासक असल्यामुळे त्यांना निवेदन देऊन काहीच उपयोग होत नसल्यामुळे. जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांना भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी समक्ष भेटून प्रभाग २६ मधील समस्या सांगितल्या त्यामुळे खालील नगरांचा कायापालट होणार. तसेच मंजूर डीपी रस्ते केंद्र शासनाच्या धूळ मुक्त योजने अंतर्गत घेतल्याने प्रभाग २६ मधील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले रस्त्याचे प्रश्न मार्गी लागतील त्यामुळे नागरिकांचे जटिल प्रश्न सोडवता येईल व भविष्यात भाजपा पक्षाला पोषक वातावरण निर्माण होईल अशी विनंती पालकमंत्र्यांना करण्यात आली त्यावेळी त्यांनी सदर कामे प्राधान्याने घेण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले.
त्यामुळे प्रभाग २६ मधील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले कामे लवकरात लवकर करावे अशी विनंती भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी निवेदन दिले आहे व त्यासाठी पाठपुरावाही चालू केला आहे. त्यामुळे प्रभाग २६ मधील नागरिकांच्या अनेक समस्या सुटणार एवढे मात्र नक्की असे सौ चव्हाण यांनी सांगितले.

प्रभाग 26 मधील खालील नगरांचा कायापालट होणार.

कोरे वस्ती, शाहूनगर, राऊत वस्ती, वास्तू विहार नगर,ए.जी. पाटील नगर, परमेश्वर नगर, कल्याण नगर भाग एक, दोन, तीन, समर्थ नगर, मीना नगर, बंडाप्पा नगर, सुभाष शहा नगर, रत्नमंजिरी नगर, गुरुदेव दत्त नगर १ ते ६, रोहिणी नगर भाग एक, द्वारका नगर, शिक्षक सोसायटी ओम गर्जना चौक, ज्योती नगर, गंगाधर नगर, गणेश बिल्डर सोसायटी, अभिषेक नगर,रामनारायण चंडक विहार, राघवेंद्र नगर,अमर नगर सोरेगाव, बहुरूपी नगर सोरेगाव, गजानन नगर एस आर पी कॅम्प जवळ, रेणुका नगर, रजनीश रेसिडेन्सी, समर्थ सोसायटी एस आर पी कॅम्प जवळ, प्रियांका नगर,प्रल्हाद नगर,आयोध्या नगर,अश्विनी कॉलनी सोसायटी. या नगरामध्ये ड्रेनेज,पाण्याची पाईपलाईन,अंतर्गत रस्ते. प्राध्यान्याने सन 23-24 शासनाच्या महत्वकांक्षी नगरोस्थान योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देणे बाबतनिवेदन दिले आहे.तसेच प्रभाग 26 मधील मंजूर लेआउट डीपी प्रमाणे मंजूर रस्ते मधील रेणुका नगर येथील भीमाशंकर अपार्टमेंट ते उधव नगर भाग १ प्लॉट नंबर 18 गदगी घरापर्यंत रस्ता करणे.

प्रभाग २६ ब मधील आर्यन वर्ल्ड स्कूल ते रेणुका नगर जवळील भीमाशंकर अपार्टमेंट येथे डांबरी रस्ता करणे.

प्रभाग 26 ब मधील रेणुका नगर भीमाशंकर अपार्टमेंट,कृष्णा बाग, साक्षी नगर,उद्धव नगर,रेणुका नगर,बंडे नगर,दत्ततारा पार्क, प्रल्हाद नगर,प्रियंका नगर,रजनीश रेसिडेन्सी पार्क, आदित्य रेसिडेन्सी, विश्व नगर,शिवभारत पार्क, चंडक मळा ते विजापूर रोड हायवे टच डीपी रस्ता मंजूर असून सदर रोड डांबरीकरण बाबत.

प्रभाग २६ ब मधील आर्यन वर्ल्ड स्कूल ते रेणुका नगर प्लॉट नंबर 712 ते कटगिरी सर प्लॉट नंबर 671 सर्वे नंबर 99/1/ ब येथे डीपी रस्ता मंजूर असून डांबरी करणे बाबत.

प्रभाग 26 ब मधील रेणुका नगर प्लॉट नंबर 520 ते रेणुका नगर प्लॉट नंबर 16 पर्यंत डीपी रस्ता मंजूर असून त्या ठिकाणी डांबरी रस्ते करणे बाबत.

तसेच शासनाच्या २०२३ -२०२४ अण्णाभाऊ साठे योजनेअंतर्गत प्रभाग 26 ब मधील सोरेगाव जवळील स्वस्तिक नगर व किसान नगर येथे अंतर्गत रस्ते, ड्रेनेज,पाण्याची पाईपलाईन, दिवाबत्ती करणे बाबत.

प्रभाग 26 ब मधील विश्व नगर चंडक मळा येथे अंतर्गत ड्रेनेज,पाण्याची पाईपलाईन, रस्ते,दिवाबत्ती करणे.

प्रभाग 26 ब मधील पाटलीपुत्र नगर येथे अंतर्गत ड्रेनेज,पाण्याची पाईपलाईन, रस्ते, दिवाबती करणे.

वरील सर्व कामासाठी सदैव जनतेच्या सेवेत असणाऱ्या भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी शासन दरबारी पाठपुरावा चालू केला असून लवकरच प्रभाग २६ चा अति जलद कायापालट होणार.

महाराष्ट्र राज्य शालेय तलवारबाजी संघाचे प्रशिक्षक म्हणून पवन भोसले यांची निवडसोलापूर, ता.१०   जगधपूर, छत्तीसगड  येथे होण...
09/01/2024

महाराष्ट्र राज्य शालेय तलवारबाजी संघाचे प्रशिक्षक म्हणून पवन भोसले यांची निवड

सोलापूर, ता.१० जगधपूर, छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य शालेय तलवारबाजी मुलांच्या संघाचे प्रशिक्षक पदी पवन भोसले यांची निवड झाली आहे.
राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धा दिनांक १४ ते १८ जानेवारी दरम्यान जगधपूर, छत्तीसगड येथे होणार असून महाराष्ट्र संघाचे सराव शिबिर ८ ते १३ जानेवारीला छ. संभाजीनगर येथे असून मुलांच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून सोलापूरचे पवन भोसले यांची निवड उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली आहे. पवन भोसले सध्या बी.एफ दमाणी प्रशाला व श्री सिद्धेश्वर इंग्लिश मिडीयम हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून आपले काम बजावत आहेत.
याबद्दल महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष प्रकाश काटुळे, राज्य संघटनेचे सचिव उदय डोंगरे व जिल्हा सचिव दीपक शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

समृद्धी स्पोर्ट्स क्लब च्या सात खेळाडूंची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवडसोलापूर, ता.१० : जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच...
09/01/2024

समृद्धी स्पोर्ट्स क्लब च्या सात खेळाडूंची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

सोलापूर, ता.१० : जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय सबज्युनिअर मैदानी स्पर्धा व नॅशनल इंटर ड्रिस्ट्रीक स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धा शासकीय मैदान नेहरू नगर येथे झाल्या असून समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या सात खेळाडूंची सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे अशी माहिती समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे सचिव संजय सावंत यांनी माहिती दिली.

या स्पर्धेत समृद्धी स्पोर्ट्स क्लब च्या खेळाडूनी खालील खेळबाब निहाय यश संपादन केले आहे.

१२ वर्षे वयोगट मुले
३०० मीटर धावणे
ओंकार देवकर ( जि.प.नरोटेवाडी):-प्रथम क्रमांक

मुली
मालन राठोड ( जि.प.घोडा तांडा):-प्रथम क्रमांक

लांब उडी
नंदिनी शिवानंद हणमगोंडा ( जि.प.नागणसूर):- प्रथम क्रमांक

१४ वर्षे वयोगट मुले- मुली
६०० मीटर धावणे
अक्षता संमुखप्पा गंगोंडा( नागणसूर)-प्रथम क्रमांक,अक्षता प्रचंडेप्पा प्रचंडे( नागणसूर)तृतीय क्रमांक
मुले लांब उडी
सदाशिव बिराजदार( नागणसूर)
प्रथम क्रमांक
कुमारी अक्षता प्रचंडेप्पा प्रचंडे
प्रथम क्रमांक

६० मीटर धावणे मुली
अक्षता प्रचंडेप्पा प्रचंडे( नागणसूर) द्वितीय क्रमांक
ह्या स्पर्धेतुन फेब्रुवारीत सांगली येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर मैदानी स्पर्धासाठी सोलापूर जिल्ह्याच्या संघात तसेच नॅशनल इंटर ड्रिस्ट्रीक सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स सिटी गुजरात युनिव्हर्सिटी अहमदाबाद, गुजरात येथे होणाऱ्या स्पर्धासाठी जिल्हा , संघात निवड करण्यात आली.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे समृद्धी स्पोर्ट्स क्लब चे अध्यक्ष - प्रा. राजू प्याटी,उपाध्यक्ष- रामचंद्र दत्तू,राजन सावंत,कार्यकारी अध्यक्ष - शोएब बेगमपुरे,कार्याध्यक्ष - सुरेश भोसले,सचिव संजय सावंत,खजिनदार - चंद्रकांत सुरवसे,अॅथलेटिक्स उपाध्यक्ष - अविनाश गोडसे, सहसचिव - व्यंकप्पा शेंडगे यांनी अभिनंदन केले आहे.वरील खेळाडूंना यश मिळवण्यासाठी समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे पुंडलिक कलखांबकर, गणेश कुडले व राजकुमार कोळी यांनी मार्गदर्शन केले.

सोलापुरात महायुतीने बांधली वज्रमूठ ! ठरले, या दिवशी करणार शक्तीप्रदर्शन आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरा...
09/01/2024

सोलापुरात महायुतीने बांधली वज्रमूठ ! ठरले, या दिवशी करणार शक्तीप्रदर्शन

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील महायुतीच्या नेत्यांनी आपली वज्रमूठ बांधली असून या महायुतीचे समन्वयक तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल साईप्रसाद या ठिकाणी पहिलीच बैठक घेण्यात आली.

या बैठकीस खासदार डॉ जयसिदधेश्वर महास्वामी, आमदार यशवंत माने, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, भाजपचे प्रदेश कार्यकारीणीचे शहाजी पवार, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे महेश साठे, कल्याणराव काळे, धैर्यशील मोहीते -पाटील, विक्रम देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे, दिलिप कोल्हे ,माजी गटनेते किसन जाधव, मनोज शेजवाळ, राजेंद्र हजारे, जमिर शेख, अजित कुलकर्णी, महेश निकंबे, आनंद मुस्तारे, प्रमोद भोसले, वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, RPI गटाचे सुशिल सरवदे, अतुल नागटिळक, शिवम सोनकांबळे, रुषी घोलप,
यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, भाजपा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची शिवसेना शिवसेना, रयत क्रांती सदाभाऊ खोत गट, RPI आठवले गट, प्रहार, शिवसंग्राम या सर्वच प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने येत्या १४ जानेवारीला दुपारी ३ वाजता सोलापूरात जामगुंडी मंगल कार्यालय या ठिकाणी महायुतीचा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. महायुतीचे शक्तीप्रदर्शन या मेळाव्यात पहावयास मिळणार आहे.

मागील हेवेदावे, मतभेद बाजूला सारुन आपण सर्वांनी एकसंघाने मिळून काम करु व विरोधकांना आपली ताकद या माध्यमातून दाखवून देऊ अशा प्रतिक्रिया या बैठकीत व्यक्त करण्यात आल्या.

09/01/2024

प्रभाग क्र ६ येथील देशमुख पाटील वस्ती येथे रस्त्याची दूरवस्था, नागरिकांतून तीव्र संताप

बांधकाम साहित्य घेऊन जाण्यासाठी टिपरची वाहतूक;
सर्वत्र धुळीचे साम्राज्य

धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात ; महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

भारती विद्यापीठातर्फे सायकल रॅलीचे आयोजनसोलापूर, ता.८ : भारती विद्यापीठाचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व....
08/01/2024

भारती विद्यापीठातर्फे सायकल रॅलीचे आयोजन

सोलापूर, ता.८ : भारती विद्यापीठाचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व.डॉ. पतंगराव कदम यांची जयंती व भारती विद्यापीठाचे कार्यवाह महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून ८ ते १३ यादरम्यान समाज प्रबोधन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह दरम्यान विविध शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक सोमवार (ता.८) रोजी सकाळी साडेसात वाजता भारती विद्यापीठ विजापूर रोड पासून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार लाभले. सायकल रॅलीच्या सुरुवातीला अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्स सोलापूरचे संचालक डॉ. एस बी सावंत यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले उपप्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी यांनी सायकल रॅली आयोजित करण्यामागचा हेतू विशद केला. प्रमुख पाहुणे नरेंद्र पवार यांनी आपल्या भाषणामध्ये सायकल चालवणे मागचे महत्व विशद केले व विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलीचा वापर करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिन सूर्यवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. राहुल मांजरे यांनी केले. या रॅली मध्ये ५०० हून अधिक विद्यार्थी व नागरिक यांनी सहभाग नोंदवला. या रॅलीच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थी व नागरिकांनी पर्यावरणाचा समतोल राखण्याचे व प्रदूषण कमी करण्याचे आव्हान केले. यावेळी भारती विद्यापीठ माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री मांडके, ग सा पवार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गोळे, भारती विद्यापीठ बाल विकास मंदिर च्या मुख्याध्यापिका मोहोळे भारतीय सहकारी बँकेचे शाखाप्रमुख हत्याळीकर साहेब तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅलीचा मार्ग
भारती विद्यापीठ ते आय. टी. आय. कॉलेज ते पत्रकार भवन ते सात रस्ता ते प्रथम हॉटेल ते महावीर चौक ते आसरा ते डि. मार्ट ते दावत चौक परत भारती विद्यापीठ

उत्तर सोलापूर तालुका भाजपला मोठे खिंडार..! सोलापूर, ता.७ : गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्...
07/01/2024

उत्तर सोलापूर तालुका भाजपला मोठे खिंडार..!

सोलापूर, ता.७ : गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असणारे तळे हिप्परगा गावचे सुपुत्र विनोद पवार यांनी भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष बळीराम काका साठे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणावर व कार्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये रविवार (ता.७) रोजी वडाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला आहे.

आजपर्यंत त्यांनी केलेल्या राजकीय सामाजिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्षपदी विनोद पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.तसेच राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षपदी अश्विनी काटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे व त्यांचा नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शक मनोज साठे, राष्ट्रीय छावा संघटनेचे उत्तर तालुकाध्यक्ष रतीकांत पाटील, राष्ट्रीय छावा संघटनेचे दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष गणेश मोरे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शाखाध्यक्ष रेवन उंबरे, युवक शाखाअध्यक्ष सुनील काजळे, युवा नेते सुनील भोसले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा प्रवक्ता अभिजीत पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष इस्माईल मुल्ला, किशोर गायकवाड, काशिनाथ दुधाळ, महादेव लोंढे, रवी हुंडेकरी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय अॅथलिटक खेळाडू साक्षी सरगर हिला समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आर्थिक मदतसोलापूर,ता.७ :  सांगोला येथील ग...
07/01/2024

आंतरराष्ट्रीय अॅथलिटक खेळाडू साक्षी सरगर हिला समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आर्थिक मदत

सोलापूर,ता.७ : सांगोला येथील गौडवाडीची
आंतरराष्ट्रीय खेळाडू साक्षी सरगरला समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष राजू प्याटी व सचिव संजय सावंत यांनी स्पाईक घेण्यासाठी चार हजार रुपयाची आर्थिक मदत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे यांच्या हस्ते देण्यात आले असल्याची माहिती समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे प्रसिद्धी प्रमुख गणेश कुडले यांनी दिली.

साक्षी सरगर हिचा जन्म २४ मे २००५ रोजी गौडवाडी येथे झाला असून तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडवाडी येथे झाले आहे व माध्यमिक शिक्षण दयानंद कॉलेज सोलापूर येथे शिक्षण घेत असून तिने स्टीपल चेस या मैदानी खेळ प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर कुवेत या ठिकाणी १८ वर्षे वयोगटांमध्ये दोन हजार मीटर अंतर आजारी असताना देखील सात मिनिट ३८ सेकंद टाइमिंग देत तिने चौथा क्रमांक पटकावला होता. तसेच तसेच तिने भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ७ मिनिट २२ सेकंद वेळ देऊन प्रथम क्रमांक आलेली आहे. राज्यस्तरावर सुद्धा तिने प्रथम क्रमांक मिळवत यश मिळवलेले आहे.
या स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून चेतन धनवडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.तिच्या आई-वडिल संगप्पा सरगर व सुरेखा सरगर हे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील आहेत. तिला भविष्यातील आर्थिक सहकार्यासाठी समृद्धी स्पोर्ट्स क्लब जिल्हा परिषदेच्या योजनेअंतर्गत निश्चितच सहकार्य मिळवून देणार आहे असे श्री कुडल यांनी यावेळी सांगितले.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे सोलापूरात स्वागतसोलापूर, ता.७ : महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ...
07/01/2024

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे सोलापूरात स्वागत

सोलापूर, ता.७ : महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या सांगोला येथे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमा प्रसंगी सोलापूर दौऱ्यावर आले होते.यानिमित्ताने सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तुळजापूर नाका या ठिकाणी आदिती तटकरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी बालविकास योजनेअंतर्गत सोलापूर शहरातील २२ अंगणवाड्या स्मार्ट बनवण्यासाठी निधी मिळावा म्हणून निवेदन देण्यात आले . त्यावेळेस तटकरे यांनी लवकरात लवकर कार्यवाही करून संबंधित अंगणवाड्यांना निधी प्राप्त करून दिला जाईल असे आश्वासन दिले.

याप्रसंगी राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख,ज्येष्ठ पदाधिकारी हेमंत चौधरी ,आनंद मुस्तारे, अमीर शेख, तनवीर गुलजार,महिला आघाङीच्या शशिकलाताई कस्पटे, लताताई ढेरे ,चित्रा कदम, राजू बेलनावरू , वैदयकीय विभाग प्रमुख बसवराज कोळी ,अनिल बनसोडे ,नागेश निंबाळकर ,सोशल मिङीया विभाग शहाराध्यक्ष वैभव गंगणे,कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, रियाज शेख ,अलमराज आबादिराजे ,किरण शिंदे नवींद पिरजादे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सोलापूर शहर शारीरिक शिक्षण व क्रीडा महासंघातर्फे पत्रकार ,क्रीडा स़घटक, खेळाडू, सामाजिक संस्थांचा गौरव  सोलापूर, ता.७ : ...
07/01/2024

सोलापूर शहर शारीरिक शिक्षण व क्रीडा महासंघातर्फे पत्रकार ,क्रीडा स़घटक, खेळाडू, सामाजिक संस्थांचा गौरव

सोलापूर, ता.७ : सोलापूर शहर शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने मराठी क्रीडा पत्रकार दिन व नूतन वर्ष दिनाचे औचित्य साधुन क्रीडा पत्रकार, सामाजिक, क्रीडा संघटक, आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय, खेळाडू, या मान्यवरांचा गुणगौरव सन्मान सोहळा शनिवार (ता.६) रोजी छत्रपती शिवाजी प्रशाला येथील सभागृहात पार पाडला . सुरवातीला उपस्थितीत सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

या गुणगौरव सन्मान सोहळ्यास प्रमुख अध्यक्ष म्हणून मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहर सपाटे, प्रमुख अतिथी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, रईसा शेख ( सहाय्यक पोलीस निरीक्षक) प्राचार्य शिंदे , शारीरिक शिक्षण संचालक प्रा .संतोष गवळी जिल्हा अध्यक्ष प्रा.सचिन गायकवाड जिल्हा सचिव गोकुळ यादव, शहर अध्यक्ष प्रा .संतोष खेंडे यांच्या उपस्थित तीस मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
अध्यक्षीय भाषणात मनोहर सपाटे साहेब म्हणाले की जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवले पाहिजे प्रत्येकाने एक स्वप्न पाहिले पाहिजे स्वप्न पाहिल्याने माणूस जीवनात यशस्वी होतो आपले जीवन नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा स्वप्न दिशा देतात स्वप्न जीवन जगायला शिकवतात गरीबी श्रीमंती आनंद देत नाहीत त्यामुळे आनंदी जीवन जगा अपयश आले तर खचून जाऊ नका जिद्द चिकाटी आपल्या उराशी बाळगा जीवनाला आनंदी ठेवण्याचं काम खेळामध्ये होते खेळाडूंनी ध्येय ठेवावे खेळाडूंनी खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे खेळामुळे आपले शरीर स्वास्थ राहते असे म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास छ़ंचुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.संतोष खेंडे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजाराम शितोळे, अजित पाटील, गंगाराम घोडके, मारुती घोडके, प्रशांत कदम,वसीम शेख, परमेश्वर व्हसुरे सर यांनी परिश्रम घेतले.

क्रीडा पत्रकार पुरस्कार

समीर इनामदार ( दै.लोकमत वरिष्ठ उपसंपादक) अजित संगवे ( उपसंपादक तरुण भारत ) विरेश अंगडी ( क्रीडा पत्रकार दै.दिव्य मराठी ) राजकुमार माने ( क्रीडा पत्रकार दै.संचार ) गणेश कांबळे (क्रीडा उपसंपादक दै.सकाळ ) जाकीरहुसेन पिरजादे ( क्रीडा पत्रकार दै.पुढारी ) रवि ढोबळे ( जनसंवाद डिजिटल मीडिया क्रीडा पत्रकार ), गौस तांबोळी ( दै. कृषी सहकार संपादक), रोहित थळवे ( इन न्यूज प्रतिनिधी )

सामाजिक कृतज्ञता पुरस्कार

आनंद तालिकोटी ( आस्था रोटी बँक) आतिश शिरसट ( संभव फाऊंडेशन ) अनिकेत चनशेट्टी ( रॉबिनहूड संस्था ) श्रीकांत डांगे ( संभाजी आरमार संस्थापक ) अमोल गवसणे ( अध्यक्ष लायन्स क्लब सोलापूर )
ज्येष्ठ क्रीडा संघटक पुरस्कार
मरगू जाधव राजू माने, सुदेश मालप,
विशेष सत्कार. अजिंक्य माने ( क्राईम ब्रँच सोलापूर )

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू

पवन भोसले ( तलवारबाजी कोच )
साधना भोसले ( बेसबॉल खेळाडू), भुनेश्वरी जाधव ( कराटे खेळाडू ) श्रेयस मालप ( हँडबॉल खेळाडू) प्रतीक शिंदे ( खो,खो खेळाडू ) फराज शेख ( खो खो खेळाडू (, श्रुती चव्हाण ( राष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू ), कौस्तुभ तळीखेडे ( तलवारबाजी खेळाडू ) साईराज हणमे ( आर्चरी खेळाडू ), तुषार अवताडे ( योगासन खेळाडू ) रनवीर मनसेवाले ( बास्केटबॉल खेळाडू ) मजीद खान ( बास्केटबॉल कोच ) तनूजा पवार ( शालेय राज्य तायक्योंदो सिल्वर पदक)

रिक्षातून वाहतूक होणारी अठरा हजारांची फ्रुट बियर जप्तसोलापूर, ता.२० : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी सोलापूर शहरात...
20/11/2023

रिक्षातून वाहतूक होणारी अठरा हजारांची फ्रुट बियर जप्त

सोलापूर, ता.२० : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी सोलापूर शहरातील अशोक चौक परिसरात एका मालवाहतूक रिक्षातून १८ हजार रुपये किमतीची फ्रुट बिअर वाहतूक होताना जप्त केली असून दोन आरोपींना अटक केली आहे.

सविस्तर वॄत्त असे की, सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राहुल बांगर यांचे पथकाने सोलापूर शहरातील अशोक चौक येथील वालचंद कॉलेज समोरील रोडवर सापळा लावून अल्ताफ हपिसाब सगरी, वय 32 वर्षे व गौस अलीशेर बागवान, वय 31 वर्षे, दोघेही राहणार सरवदे नगर, मुळेगाव रोड सोलापूर हे इसम मालवाहतूक रिक्षा क्र. MH 13 AN 4898 मधून युनिक ड्रिंक्स कंपनीचे फ्रुट बिअरच्या 650 मिली क्षमतेच्या सहाशे सीलबंद बाटल्या वाहतूक करताना आढळून आले. विभागाने घटनास्थळावरून अठरा हजार रुपये किमतीच्या फ्रुट बियरसह एकूण 63 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल बांगर, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, सहायक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, जवान चेतन व्हनगुंटी व शोएब बेगमपूरे यांच्या पथकाने पार पाडली.

Address

Solapur
413002

Telephone

+919657895965

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jansanvad Digital Media Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jansanvad Digital Media Solapur:

Share