18/10/2022
#माझे_कार्य_तुमच्या_चरणी..!🙏🏻 सरपंच पदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ कसा गेला ते कळलेच नाही. मी गेलेल्या पाच वर्षात माझ्या परीने मला जमेल तेवढे मला स्वतःला गावासाठी झोकून दिले आणि यात मला माझ्या शिवणी गावाचा अभिमान वाटतो मला या पाच वर्षात विरोधक असतो या गोष्टीची जाणीव मला आपल्या गावाने होऊ दिली नाही, त्यात कोरोनो सारख्या महामारीने आम्हाला तब्बल 3 वर्ष बांधून ठेवल्यासारखं होत ,गावतील नागरिकांनचे सहकार्य ,मोठ्यांचा आशीर्वाद आणि मित्रांची साथ यामुळे माझी पाच वर्षे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली ,या पाच वर्षाच्या कालावधीत मी माझ्या परीने जे जे छोटी मोठी विकासकामे केली त्यात मला सहकार्य करणारे कार्याचा डोलारा पुढे नेण्यासाठी झटणारे असंख्य हात कधी आशीर्वाद म्हणून डोक्यावर राहिले तर कधी दत्त बनून माझ्या पाठीशी राहिले मी एकट्याने केले हा अहंकार मला कधी शिवला नाही आणि भविष्यात शिवणार ही नाही कारण जे काही केले ते गावासाठी आणि तुमच्या सर्वांच्या साथीने ,माझं गाव या विचाराने केलं , मला लाभलेली ग्रामपंचायत सदस्य मंडळ असेल किंवा गावा मधील मंडळी असतील या साऱ्यांनीच आमच्या कल्पनांना उचलून घ्यायचं काम केलं आणि एकमेकांना साह्य करू या उक्तीप्रमाणे आम्ही गावासाठी झटत राहिलो ,17 ऑक्टोबर 2017 या दिवशी गावातील नागरिकांनी पहिला लोकनियुक्त सरपंच पदाचा बहुमान मला दिला त्याबद्दल मी तुमचा कायमचा ऋणी आहे गावातील नागरिक, महिला व युवकांनी माझ्यावर मोठा विश्वास दाखवून जबाबदारी टाकली होती, स्वतः ला मनापासून गावाच्या कामासाठी झोकून देऊन मी माझ्या परीने योगदान दिले, आज निवडून येऊन पाच वर्षे पूर्ण होतात पाच वर्षाच्या कामांमध्ये सर्व गावकरी बंधू ,जिवलग मित्र,शालेय शिक्षण समिती,शिक्षकस्टाप ,अंगणवाडी कर्मचारी,पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष,रेशनदुकानदार आणि माझे सहकारी ग्रामसेवक साहेब , ग्रामपंचायत शिपाई,माझे गावाबाहेरील मित्र सर्वांनी सहकार्य केल्या त्याबद्दल शतशः आभार ,,,🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
* #सलाम माझ्या गावाला* #
(पाच वर्षात माझं काही चुकलं असेल किंवा चुकून कुणाचं मन दुखावलं असेल माझ्याकडून तर आपण मला मोठ्या मनाने माफ करावे )
* #सरपंच प्रशांत राखे (शिवणी) #*