Dp News

Dp News Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dp News, Media/News Company, Solapur.

24/04/2026

कुर्डूवाडीच्या मनोहर मामाला अटक...

20/04/2026

पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापुरातून लाईव्ह...

विमानसेवा व आयटी पार्कमुळे सोलापूर विकासाच्या नव्या उंबरठ्यावरबिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश मुद...
18/04/2026

विमानसेवा व आयटी पार्कमुळे सोलापूर विकासाच्या नव्या उंबरठ्यावर
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश मुद्दा यांचे प्रतिपादन

सोलापूर, दि. — सोलापुरात सुरू झालेली विमानसेवा आणि प्रस्तावित आयटी पार्क यामुळे शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून आयटीसह विविध उद्योगांच्या वाढीसाठी नवे दालन खुले होईल, असा विश्वास बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश मुद्दा यांनी व्यक्त केला.
बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी ते बोलत होते संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते मुद्दा यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उमा मुद्दा, बिल्डर्स असोसिएशनचे माजी राज्याध्यक्ष दत्ता मुळे, संघाचे खजिनदार किरण बनसोडे आदी उपस्थित होते
मुद्दा पुढे म्हणाले की, सोलापूरबद्दल जे ऐकले होते त्यापेक्षा शहराचे वातावरण अधिक सकारात्मक आणि विकासाभिमुख असल्याचे प्रत्यक्ष पाहून समाधान वाटले. विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूरचा देश-विदेशाशी संपर्क वाढेल, परिणामी गुंतवणूक आणि उद्योगांची वाढ होईल. संपर्काचे जाळे मजबूत झाल्यास आयटी उद्योगांसह इतर क्षेत्रांमध्येही मोठा विस्तार अपेक्षित आहे.
ते म्हणाले की, इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असून नव्या पिढीला नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे शहरात आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडण्यास मदत होईल. सोलापूर भविष्यात झपाट्याने प्रगती करणारे शहर म्हणून ओळख निर्माण करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
सोलापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी महापालिका आयुक्त तसेच विविध बिल्डर्स यांच्या प्रकल्पांना भेट दिली. शहरातील विकासकामे आणि प्रकल्प पाहून समाधान झाल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकारांच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले की, समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यात माध्यमांचे योगदान महत्त्वाचे आहे. पत्रकारांच्या माध्यमातून समाजात सुधारणा घडतात आणि जनजागृती होते. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगमेश जेऊरे यांनी केले, तर उपाध्यक्ष आफताब शेख यांनी आभार मानले. या प्रसंगी शहरातील विविध वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांचे पत्रकार, कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

13/04/2026
उद्योगपती श्री. अनंत मुकेश अंबानीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... शुभेच्छुक-शिखर पहारिया फाउंडेशन, सोलापूरएक वा...
09/04/2026

उद्योगपती श्री. अनंत मुकेश अंबानीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

शुभेच्छुक-शिखर पहारिया फाउंडेशन, सोलापूर

एक वाढदिवस, हजारो हास्य.. सोलापुरात होतोय माणुसकीचा महोत्सव....

राज्यसभेवर शिवसेनेकडून सोलापूरच्या कन्या प्रा. ज्योती वाघमारे यांची निवड...
05/03/2026

राज्यसभेवर शिवसेनेकडून सोलापूरच्या कन्या प्रा. ज्योती वाघमारे यांची निवड...

स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मास्टरस्ट्रोक; निष्ठावंतांना संधी, भविष्यासाठी भक्कम व्यूहरचनासोलापूर...
23/02/2026

स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मास्टरस्ट्रोक; निष्ठावंतांना संधी, भविष्यासाठी भक्कम व्यूहरचना

सोलापूर – जयकुमार गोरे यांनी महापालिका स्वीकृत नगरसेवक निवडीत टाकलेली चाल राजकीय वर्तुळात ‘मास्टरस्ट्रोक’ म्हणून चर्चेत आहे. एकीकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देताना दुसरीकडे आगामी निवडणुकांचे गणित डोळ्यासमोर ठेवून सामाजिक आणि राजकीय समतोल साधल्याचे या निवडीवरून स्पष्ट दिसत आहे.

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत पालकमंत्री गोरे यांनी सर्व सूत्रे स्वतः हाती घेतली होती. त्यांच्या नियोजनबद्ध रणनीती आणि शहर भाजपाच्या परिश्रमामुळे १०२ पैकी तब्बल ८७ जागांवर ऐतिहासिक विजय मिळाला. प्रमुख विरोधी काँग्रेससह इतर पक्षांची दारुण पराभव झाला. या पार्श्वभूमीवर झालेल्या स्वीकृत नगरसेवक निवडीतही त्यांनी पॉवरबाज खेळी केल्याचे बोलले जात आहे.

या निवडीत शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, ज्ञानेश्वर म्याकल, रुद्रेश बोरामणी, श्रीनिवास दायमा, वृषाली चालुक्य, अक्षय अंजीखाने, ॲड. ऋतुराज (ऋषिकेश) मेट्रे तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांची वर्णी लागली आहे. विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व देत लिंगायत, पद्मशाली, मोची, मराठा आणि व्यापारी मारवाडी समाजाचा समावेश करण्यात आल्याने आगामी निवडणुकांसाठी व्यूहरचना आत्तापासूनच सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.

रोहिणी तडवळकर या दोन पिढ्यांपासून भाजपशी निगडित आहेत. त्यांचे वडील जनसंघाचे कार्यकर्ते होते, तर पती राम तळवळकर यांनी आणीबाणीत कारावास भोगला. त्या यापूर्वी महापालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या आणि सध्या शहराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
रुद्रेश बोरामणी यांनी १९९६ पासून भाजपमध्ये विविध पदांवर काम केले आहे. शिक्षण मंडळ सदस्य ते शहर संघटन सरचिटणीसपर्यंत त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या.
ज्ञानेश्वर म्याकल आणि श्रीनिवास दायमा हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले असून संघटन आणि नियोजन कौशल्यासाठी ओळखले जातात.
अक्षय अंजीखाने यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकीय कारकीर्द सुरू करून भाजयुमोमध्ये विविध पदांवर काम केले आहे.
वृषाली चालुक्य या जिल्हा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राहिल्या असून प्रचारात सक्रिय भूमिका बजावली.
ऋषिकेश मेट्रे हे मोची समाजातील उच्चशिक्षित वकील व सामाजिक कार्यकर्ते आहेत.
मनीष केत हे गेली पंचवीस वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून सकारात्मक पत्रकारितेसाठी ओळखले जातात.

शहरातील तिन्ही आमदारांच्या जवळच्या कार्यकर्त्यांपेक्षा पक्षाला दीर्घकालीन उपयोगी ठरणाऱ्या आणि संघटन बळकट करणाऱ्या चेहऱ्यांना संधी देत पालकमंत्री गोरे यांनी भविष्यातील निवडणुकांसाठी भक्कम पायाभरणी केल्याचे भाजप कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.

09/12/2025

I got over 8,000 reactions on my posts last week! Thanks everyone for your support! 🎉

08/12/2025

आ. दिलीप सोपल
गटाचा दारुण पराभव

28/11/2025

राजन मालक आलं अंगावर
तर घ्यायच अंगावर - सदाभाऊ खोत

27/11/2025

Address

Solapur

Telephone

+919823502011

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dp News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dp News:

Share