विवेक विचार Vivek Vichar

विवेक विचार Vivek Vichar विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे मराठ?

15/12/2024

1) जॉर्ज सोरोस आणि कॉंग्रेसचे संबंध असल्याचे आरोप सध्या होताहेत, यावरुन चर्चेत आलेले “डीप स्टेट” ही संकल्पना नक्की काय आहे? 1) जॉर्ज सोरोस आणि कॉंग्रेसचे संबंध असल्याचे आरोप सध्या होताहेत, यावरुन चर्चेत आलेले “डीप स्टेट” ही संकल्पना नक्की काय आहे?
2) ते खरोखर अस्तित्वात आहे का? त्याचं अस्तित्व कसे कळतं?
3) डीप स्टेट चे हेतु किंवा उद्दीष्टं काय असतात?
4) डीप स्टेटची कार्यपद्धती कशी असते? ते कसं कार्य करतें? ते एखाद्या विशिष्ट उद्दिष्टावर कसे निर्णय घेतात … लोकांना आपल्या षडयंत्रात त्यांना नकळत कसं सहभागी करुन घेतात ?
5) उद्दिष्टे साध्य करण्यासाठीच्या त्यांच्या पद्धती, मार्ग काय असतात?
6) ते किती प्रभावी आणि घातक आहे?
7) आंतरराष्ट्रीय स्तरावरही जग वेगवेगळ्या गटात वाटलं गेलंय. अशात या वाईट हेतुंचा एकूणच जागतिक स्थैर्यावर कसा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो?
8) भारतात अश्या कोणत्या घटनांची उदाहरणं देता येतील?
9) प्रचंड व्याप्ती आणि कोण करतंय तेच कळत नाही अशा अदृष्य शक्तीचा सामना कसा करायचा?

जॉर्ज सोरोस आणि कॉंग्रेसचे संबंध असल्याचे आरोप सध्या होताहेत, यावरुन चर्चेत आलेले “डीप स्टेट” ही संकल्पना नक्की काय आहे?
The concept of the "deep state" refers to an alleged covert network of powerful bureaucrats, intelligence officials, military leaders, financial elites, and other influential actors who operate behind the scenes to influence or control government policies and decisions, often independently of or in opposition to elected leaders. The idea suggests that these actors work to maintain a specific agenda, protect entrenched interests, and resist changes that may threaten their power or goals.

 #विवेक_विचार  #दीपावली_विशेषांक_2024पृष्ठे 100मूल्य 100/- (पोस्ट खर्च +३०/-)संपर्क - 8806889889_________विवेक विचार हे ...
31/10/2024

#विवेक_विचार
#दीपावली_विशेषांक_2024

पृष्ठे 100
मूल्य 100/- (पोस्ट खर्च +३०/-)

संपर्क - 8806889889
_________

विवेक विचार हे विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे
सांस्कृतिक मराठी मासिक आहे.
वार्षिक वर्गणी दीपावली अंकासह 300/-
__________

दीपावली अंकातील प्रमुख विषय
१. वंदे मातरम महामंत्राची १५० वी जयंती
२. रामायणाच्या प्रकाशात धर्म संकल्पना
३. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंती ....

31/10/2024
31/10/2024
28/10/2024

Here's a poem to commemorate Infantry Day:

Today we honor the brave and true,
The infantrymen, who forged anew,
Their courage, strength, and hearts of gold,
In battles fierce, their stories unfold.

With rifles sturdy, spirits bright,
They marched into the dawn's first light,
Through trenches deep, through hills so steep,
Their footsteps echoed, victory to keep.

The battlefields of the yore,
The foot soldiers on the fore ,
From icy heights in the Kashmir vale ,
To Rajastan's sandy dale ,
Their valor shone, like beacon lights,
In jungles and mountains, dark and cold,
Their sacrifices, forever to be told.

With every step, with every fall,
They rose again, to give their all,
For nation, honor, and comrades dear,
Their bonds of brotherhood, forever clear.

We salute their sacrifice and might,
Their unwavering will, to fight for right,
Their legacy lives, forever in our hearts,
Infantrymen, India's noblest parts.

Anonymous

 #वाचन_प्रेरणा आणि  #प्रेरणादायी_वाचन22 सप्टेंबर 2006 या दिवशी माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे कन्याकुमारी य...
15/10/2024

#वाचन_प्रेरणा आणि #प्रेरणादायी_वाचन

22 सप्टेंबर 2006 या दिवशी माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे कन्याकुमारी येथील विवेकानंद शीला स्मारकावर पोहोचले होते. तेथील अतिथी पुस्तिकेत त्यांनी केलेली नोंद विशेष महत्त्वाची आहे.

तेथे त्यांनी भारतातल्या युवा पिढीला एक मोलाचा संदेश दिला. ते म्हणतात, "लोकांमध्ये विवेकानंदांच्या संदेशाचा प्रचार आणि प्रसार करणे खूप महत्त्वाचे आहे. मानव सेवा आणि मनुष्य निर्माण या संबंधात स्वामीजींची किमान १० बोधवाक्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि चमकणाऱ्या बोर्डाद्वारे जागोजागी प्रचारित केली पाहिजेत. आणि लोकांना आवाहन केले पाहिजे की त्यांनी यातील किमान एका संदेशाचे जीवनभर पालन करावे."

डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे वाचनाकडे जीवनाची प्रेरणा म्हणून पाहत होते. वाचनाने चरित्र निर्माण झाले पाहिजे. माणूस घडणीला मदत झाली पाहिजे. त्यामुळे वाचन प्रेरणा महत्त्वाची तसे प्रेरणादायी वाचन अधिक महत्त्वाचं. अन्यथा वाचन केवळ कर्मकांड बनून राहील.

स्वामी विवेकानंद म्हणतात,
"कोणतीही कृती श्रेष्ठच, पण आधी विचार जन्म घेतात, मग कृती ! त्यामुळे आपला मेंदू उच्च विचारांनी भारून टाका. उत्तुंग आदर्श रात्रंदिवस आपल्या डोळ्यांसमोर तरळू द्या. आणि मग पाहा, महान कार्ये कशी प्रत्यक्षात येतात ते !"

माणसं चांगली वागावीत असं प्रत्येकाला वाटतं. आपल्या जवळची माणसं अधिक चांगली असावीत, व्हावीत, असं तर आवर्जून वाटतं. पण त्य...
01/10/2024

माणसं चांगली वागावीत
असं प्रत्येकाला वाटतं.
आपल्या जवळची माणसं
अधिक चांगली असावीत, व्हावीत,
असं तर आवर्जून वाटतं.
पण त्याचा मार्ग कोणता ?
उत्तर आहे पुस्तक.

चांगली पुस्तके ही
वाचकांवर #संस्कार करतात.
#वाचन ही अशी साधना आहे,
जी साधकाला तत्काळ वरदान देते.
एखाद्या चांगल्या पुस्तकाने
जीवन बदलून टाकल्याची उदाहरणे
कमी नाहीत.

एखादे चांगले #पुस्तक आहे का,
की जे मी माझ्या मुलांना, भावा - बहिणीला, मित्राला
भेट म्हणून वाचायला देऊ शकेन ?
अशा आशयाचा प्रश्न
अनेकजण नेहमी विचारत असतात.

आनंदाची गोष्ट म्हणजे
या प्रकारचं एक पुस्तक
9 ऑक्टोबर रोजी
सोलापुरात प्रकाशित होत आहे.

256 पानी पुस्तकात
सुमारे 31 सत्यकथा आहेत.
विवेकानंद केंद्राच्या जीवनव्रती
माननीय निवेदिता ताई यांनी
त्या लिहिल्या आहेत.
केंद्राचे काम करत असताना
मागील साडेचार दशकांत
त्यांना आलेल्या अनुभवांचे हे संकलन आहे.

सर्वसामान्य वाटणारी अनेक माणसं
आपल्या अवतीभवती समाजात शांतपणे
अर्थपूर्ण जीवन जगत असतात.
अशा व्यक्तींकडून आलेल्या
अनुभवांच्या माध्यमातून
ताईंनी जीवन समृद्ध करणारी
उदात्त जीवनमूल्ये उलगडून दाखवली आहेत.

हे पुस्तक आपल्या संग्रही हवेच.
सोलापुरात प्रकाशनापूर्वीच
या पुस्तकाच्या सुमारे 1800 प्रतींची
पूर्व नोंदणी झाली आहे.

बुधवार, दिनांक 9 ऑक्टोबर रोजी
श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृह येथे
सायंकाळी साडेसहा वाजता
पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आहे.
यावेळी माननीय निवेदिता ताई यांचे
प्रेरक व अनमोल मार्गदर्शन होणार आहे.
अध्यक्षस्थानी विख्यात लेखिका अरुणा ढेरे
यांची उपस्थिती असेल.
निमंत्रण पत्रिका सोबत जोडली आहे.
___________

पुस्तकाचे नाव - तेजोमय नक्षत्रं आणि हसरी पुष्पे
लेखिका - बी. निवेदिता
प्रकाशक - विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग
पृष्ठे - 256, मूल्य २५०/-
_____________

टीप - प्रकाशनाच्या दिवशी कार्यक्रम ठिकाणी
पुस्तक सवलतीत उपलब्ध असणार आहे. कार्यक्रमापूर्वी केंद्र कार्यालयात पुस्तकाची पूर्व नोंदणी करता येईल.
____________
संपर्क - 8806889889 (दुपारी 12 ते 5)

छोटी पण  #अनुकरणीय_गोष्टसोलापुरातील विवेकानंद केंद्रात किशोरवयीन मुलींच्या व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित उपक्रम चालतात. भ...
25/08/2024

छोटी पण
#अनुकरणीय_गोष्ट

सोलापुरातील विवेकानंद केंद्रात किशोरवयीन मुलींच्या व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित उपक्रम चालतात. भगिनिंचा एक समूह या उपक्रमात सक्रिय आहे. यात कुणी डॉक्टर आहेत तर कुणी निवृत्त शिक्षिका, निवृत्त अधिकारी.. कुणी गृहिणी आहेत तर कुणी लघु उद्योजिका. तरुणीही आहेत. त्यांच्यात विचारांचे आदानप्रदान होत असते.

या उपक्रमाशी सुरुवातीपासूनच माझा संबंध राहिला आहे. त्यामुळे मीही त्यांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये आहे. त्या ग्रुपमध्ये आज फळ्यावर सुविचार लिहील्याची छायाचित्रे पोस्ट झाली.

त्यावर
// डॉक्टर ताई म्हणाल्या -
अपर्णा तुझे व पद्मा चे अक्षर खूप सुंदर आहेत. दोन्ही ताईंचे व माझे लिहीलेले सुविचार मी एका डायरीत लिहिले आहे.
सकाळी उठल्यावर सगळे वाचते व मग कामाला सुरुवात होते.
मला खूप छान वाटते.
अपर्णा व पद्मा खूप विचार करून चांगले विचार शोधून काढतात.

पद्मा - मी हॉलमध्ये बोर्ड लावले आहे. घरी येणारे जाणारे सगळे जोरात वाचतात आणि विचारतात कोण लिहिले ? ///
_______
घरात बोर्ड / फळा लावून रोज त्यावर सुंदर सुंदर विचारांचे मोती लिहिणे, ही संकल्पना अनुकरणीय आहे. घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने महापुरुषांच्या वाङ्मयातून विचार वेचून फळ्यावर लिहिण्याचा उपक्रम सोपा आणि छोटा वाटत असला तरी याचा परिणाम फार मोठा आहे.. अशा सुविचारांचे डायरीमध्ये संकलन करून त्याचे दिवसाच्या सुरुवातीला वाचन करणे ही संकल्पनाही भन्नाट आहे.
_______
स्वामी विवेकानंद म्हणतात,
"आधी विचार जन्म घेतात; मग कृती !"

#अमृत_कुटुंब #किशोरी_विकास
#विवेकानंद_केंद्र

Address

Solapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when विवेक विचार Vivek Vichar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to विवेक विचार Vivek Vichar:

Share

Category