सोलापुरी जोक्स

सोलापुरी जोक्स Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सोलापुरी जोक्स, Digital creator, Solapur.

स्वप्नांचं तुटलेलं पान... का तुटलेलं असेल?

शब्द माझेच होते, पण तू समजून घेतलं नव्हतंस
प्रेम होतं खरं, पण उत्तर कुणाकडेच नव्हतं
शेवटी ते पान नशिबानेच फाडून टाकलं…

19/07/2025
MH13 हा Solapur जिल्ह्याचा वाहन क्रमांक कोड आहे – पण त्यापेक्षा जास्त, तो एक भावनिक आणि स्थानिक अस्मिता आहे.हे T-shirt S...
19/07/2025

MH13 हा Solapur जिल्ह्याचा वाहन क्रमांक कोड आहे – पण त्यापेक्षा जास्त, तो एक भावनिक आणि स्थानिक अस्मिता आहे.

हे T-shirt Solapurkar असण्याचा अभिमानाने मिरवण्याचा एक हटके अंदाज आहे.

Buy now | online

Mh13 Solapur | Half Sleeve T-Shirt on Stopover -

https://stopover.store/product/Mh_Solapur__148116/

10/07/2025

आज गुरुपौर्णिमा...
सकाळी उठल्यावर मन शांत होतं…
आज स्वामींची पूजा केली…
आरती करताना असं वाटलं की ते माझ्या समोरच उभे आहेत.

माझ्या मनात असलेल्या हजारो प्रश्नांना एकच उत्तर मिळालं – "श्रद्धा ठे ठेव, मी आहे."
त्या क्षणाला नकळत डोळ्यात पाणी आलं...
हे शब्द कुठून आले, कसे आले, माहीत नाही, पण मनात घर करून गेले.

स्वामी समर्थ माऊलींची कृपा अशीच कायम राहो…
आज खरंच वाटतं, गुरु असतो, म्हणून आपण आहोत.

#गुरुमाऊली #स्वामिसमर्थ

बायकोने नविन activa घेतली आणि गेले वर्षभर गाडी तशीच पडून राहिली म्हणून मी activa sell ची add टाकली, 'want to sell for Rs...
08/12/2024

बायकोने नविन activa घेतली आणि गेले वर्षभर गाडी तशीच पडून राहिली म्हणून मी activa sell ची add टाकली, 'want to sell for Rs. 30,000/-..'

कुणी 15 हजारांत मागितली, तर कुणी 26, तर एकाने 28 हजारात मागितली. पण मी जास्त पैसे येतील, या अपेक्षेने कुणालाच 'हो' म्हटले नव्हते...

थोड्या वेळाने एक काॅल आला आणि तो म्हणाला...

"साहेब, 30 हजार जमवण्याचा खूप प्रयत्न केला, पण 24 हजारच जमलेत. थोडं थांबाल का, माझा मोबाईल पण विकतो आणि किती पैसे येतात, ते बघतो.

पण activa मलाच द्या...
माझा मुलगा इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला आहे. शेवटचे एक वर्ष तरी त्याने गाडीवरून जावे, असे मला वाटते. नवी गाडी याच्या दुपटीहून जास्त किमतीला आहे, ती नाही घेऊ शकत..."

मी फक्त 'ok बघू', असे म्हणालो आणि फोन ठेवला...

नंतर थोडा वेळ विचार केला आणि call back करून म्हणालो, "जरा थांबा, मोबाइल विकू नका. उद्या सकाळी या घरी आणि गाडी घेवून जा, फक्त 24 हजारामध्ये......"

माझ्यासमोर 28 हजाराची आॕफर असताना पण मी त्या अपरिचित व्यक्तीला 24 हजारामधे activa देणार होतो....
आज त्या कुटुंबात किती आनंदी वातावरण असेल..? उद्या त्यांच्या घरी activa येणार ......
आणि यामध्ये माझा काहीच loss होत नव्हता... कारण मला परमेश्वराने खूप काही दिले आहे. आणि मी खूप समाधानी आहे माझ्या लाईफवर ..

दुसरे दिवशी 50, 100, 500 च्या नोटांची जुळवाजुळव करून ती व्यक्ती संध्याकाळी 5 वाजता माझ्याकडे आली.
सकाळपासून त्याचे पाच वेळा फोन... 'साहेब मी पैसे घेवून येतोय, पण गाडी कुणाला देवू नका..'
माझ्या हातात पैसे दिल्यावर, त्या वेगवेगळ्या नोटा बघून जाणीव झाली, की ते पैसे वेगवेगळ्या ठिकाणावरून गोळा करून आणलेत....

ऑफरपेक्षा चार हजार कमी पत्करून पण आम्हाला काहीच वाईट वाटले नाही, उलट त्याच पैशातील 500 रूपयांची नोट काढून त्या व्यक्तीला देत माझी पत्नी म्हणाली, 'घरी जाताना मिठाई घेवून जा....'
डोळ्यात पाणी आणत त्यांनी आमचा निरोप घेत तो माणूस activa घेऊन गेला...

आपण सहज reply करतो, 'It's my activa'....
पण आज activa scooter विकताना कळलं...
Activa म्हणजे काय असतं ते..?

जीवनात काही व्यवहार करतांना फायदाच बघायचा नसतो 😊
आपल्या मुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो.

तात्पर्य :
ओंजळ आनंदाने भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना त्यातले देता आले पाहिजे.🙏

कोणी लिहिले माहिती नाही पण फारच छान आणि प्रेरणादायक आहे म्हणून आपणास शेअर केले

😣  #मराठीभाषा  #मराठीलेखणी    #तिचीआठवण👸  #तिचीगोष्टचा  #तिची_आठवण  #तिची_डायरी  ुझ्या_प्रेमाची  #प्रेमी
15/09/2024

😣 #मराठीभाषा #मराठीलेखणी #तिचीआठवण👸 #तिचीगोष्टचा #तिची_आठवण #तिची_डायरी ुझ्या_प्रेमाची #प्रेमी

05/09/2024

शिक्षक दिन्याच्या हार्दिक शुभेच्छा..!! #शिक्षक_दिवस #शिक्षक #सोबत #मराठीलेखणी #मराठीभाषा

आठवण  #सोबत  #ती  #प्रेम  #तिची_डायरी  #तिची_आठवण  #तिचीगोष्टचा    #मराठीभाषा
02/09/2024

आठवण #सोबत #ती #प्रेम #तिची_डायरी #तिची_आठवण #तिचीगोष्टचा #मराठीभाषा

प्रेम❣️  #सोबत  #ती  #प्रेमकविता  ुझ्या_प्रेमाची😔🥀💔    #मराठीलेखणी
01/09/2024

प्रेम❣️ #सोबत #ती #प्रेमकविता ुझ्या_प्रेमाची😔🥀💔 #मराठीलेखणी

सबक😊  ्या_वेडीची_😔💔  #आठवन  #मराठीलेखणी    #प्रेम  #प्रेमकविता  #सोबत
01/09/2024

सबक😊

्या_वेडीची_😔💔 #आठवन #मराठीलेखणी #प्रेम #प्रेमकविता #सोबत

संध्याकाळ  #आठवन  #तिची_डायरी  ुझ्या_प्रेमाची  #आठवन      #मराठीलेखणी  #मराठीभाषा
31/08/2024

संध्याकाळ

#आठवन #तिची_डायरी ुझ्या_प्रेमाची #आठवन #मराठीलेखणी #मराठीभाषा

27/08/2024

खूप मोठी गायनाकॉलॉजिस्ट व्हायचं ...असं स्वप्न बाळगून तशी वाटचाल करणाऱ्या डॉ. प्रतीक्षा गवारे यांच्यावर पतीच्या संशयी स्वभावामुळे व त्यातून होणाऱ्या छळामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली.
छत्रपती संभाजी नगरमध्ये ही घटना घडली.
प्रीतम शंकर गवारे असं आरोपीचं नाव असून तो फरार झाला आहे.
'डियर अहो', असं पतीला सात पानी पत्र लिहून त्यांनी आत्महत्या केली. त्यांचं हे पत्र वाचून अनेकांचे डोळे पाणावत आहेत.
डॉ. प्रतीक्षा यांचं पत्र पुढीलप्रमाणे ...

डिअर अहो,

खूप प्रेम केलं हो तुमच्यावर, जिवापाड प्रेम केलं. स्वतःला विसरुन गेले तुमच्यासाठी. माझ्यासारख्या हसत्या, खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करुन टाकलं तुम्ही. एका स्वावंलबी, Ambitious मुलीला Dependent बनवलं तुम्ही. खूप स्वप्नं घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी की हे मला खूप जीव लावतील. काळजी करतील, करिअरमध्ये सपोर्ट करतील. आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा हवा होता, त्यासाठीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं तर ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली नसती. तुम्ही सांगितलं म्हणून मी सगळं सोडलं मी. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, आई वडिलांशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांच्याशीही जास्त बोलत नव्हते. पण तरीही तुमचं पोट भरलं नाही. मोबाइल बदल म्हणाले, बदलला. नंबर बदल म्हणून वाद घातले, त्यासाठीही तयार झाले. तरीही तुमचे डाऊट संपले नाहीत. सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेत आलात. पण देवाशपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहिले. माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही.

माझ्या कर्तव्याला दिखावा करते असं म्हटलंत त्याचं वाईट वाटलं .

सासू-सासऱ्यांची काळजी घेतली, कधी उलटसुलट बोलली नाही. त्यांनी पण मला जीव लावला. पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते, असे म्हटले. मला त्याचं फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही. मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं. तुमच्यावर मी लग्नाअगोदर पैसा खर्च केला. तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले. तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आईवडिलांच्या साथीने कमावला. मला खूप मोठी गायनोकोलॉजिस्ट व्हायचं होतं. पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. शेवटी एवढंच म्हणेल, माझ्या आईवडिलांना मी नसले तरी कुणाल आहे. पण तुम्ही एकटे आहात. सासू सासऱ्यांना नीट सांभाळा. त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका. आय लव्हू यू सो मच. बाय. यू आर अ फ्री बर्ड नाऊ.

मला विसरुन आनंदाने जगा असंही प्रतीक्षा यांनी म्हटलं आहे.

तुम्ही गोड आहात दिसायला, गोड राहा आणि कधी थोडंसं जरी प्रेम केलं असेल माझ्यावर तर मला एक टाइट हग करुनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा.

तुमचीच

प्रतीक्षा

अशी चिठ्ठी लिहून प्रतीक्षा गवारे यांनी आत्महत्या केली आणि आयुष्य संपवलं आहे. पतीचा रोजचा त्रास सहन होत नसल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे...😢🙏

😑
21/08/2024

😑

Address

Solapur

Telephone

+917775868113

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सोलापुरी जोक्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to सोलापुरी जोक्स:

Share