Livesolapur News

Livesolapur News livesolapur news

26/08/2026

AIMIM पक्षाचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांची पत्रकार परिषद LIVE...

‘मीडिया मास्टर’ नव्या पत्रकारांना दिशा देईल : महापौर कोंड्याल...पत्रकारांनी वस्तुनिष्ठपणे समाजातील प्रश्न मांडावेत...पत्...
26/08/2026

‘मीडिया मास्टर’ नव्या पत्रकारांना दिशा देईल : महापौर कोंड्याल...

पत्रकारांनी वस्तुनिष्ठपणे समाजातील प्रश्न मांडावेत...

पत्रकार किरण बनसोडे लिखित ‘मीडिया मास्टर’ पुस्तकाचे प्रकाशन...

सोलापूर : पत्रकारिता ही लोकशाहीचा आरसा असून पत्रकारांनी निर्भीडपणे, प्रामाणिकपणे आणि वस्तुनिष्ठपणे समाजातील प्रश्न मांडले पाहिजेत. प्रशासनातील त्रुटी असोत अथवा नागरिकांच्या समस्या, त्या कोणताही मुलाहिजा न ठेवता लोकांसमोर आणण्याचे काम पत्रकारांनी करणे गरजेचे आहे. प्रामाणिकपणे काम केले, तर जीवनात यश नक्की मिळते. ‘मीडिया मास्टर’ नव्या पत्रकारांना दिशा देईल,असे प्रतिपादन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले.
पत्रकार किरण बनसोडे लिखित जागृती पब्लिकेशन प्रकाशित ‘मीडिया मास्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन महापौर कोंड्याल यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव प्रा. डॉ. शिवाजीराव शिंदे, मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने, ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड, बहुजन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर, दैनिक तरुण भारतचे समूह मुख्य संपादक दिलीप पेठे, मुख्य संपादक प्रशांत माने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश कोरे , श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, पत्रकार विजय गायकवाड, प्रकाशक सोमनाथ गायकवाड, लीना बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मध्यम साक्षरता चळवळीत योगदान देणारे
प्रा. डॉ. अंबादास भास्के आणि विजय लोंढे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कोंड्याल पुढे म्हणाले, किरण बनसोडे यांनी पत्रकारितेतील २४ वर्षांचा अनुभव ‘मीडिया मास्टर’च्या माध्यमातून नव्या पिढीसमोर मांडला आहे. यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया माध्यमातून अनेकजण पत्रकारितेत येत आहेत. मात्र समाजात नेमके काय घडत आहे, याची वस्तुनिष्ठ माहिती लोकांसमोर मांडणारे आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे पत्रकार घडणे आवश्यक आहे. या दृष्टीने हे पुस्तक महत्त्वाचे आहे. नव्या पिढीतील पत्रकारांसाठी आदर्श निर्माण करणारे हे पुस्तक असल्याचेही महापौर कोंड्याल यांनी सांगितले.
सहकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आज हा 'सोन्याचा दिवस' पाहायला मिळाल्याचे भावूक मनोगत लेखक किरण बनसोडे यांनी व्यक्त केले.प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पत्रकार विजय गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी तडवळकर यांनी केले. यावेळी भालचंद्र साखरे, श्रावण भंडारे, डॉ. हिराकांत जाधव, समाधान जाधव यांच्यासह पत्रकारिता, शिक्षण, प्रशासन, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निष्ठावंत पत्रकारितेचा वारसा : दत्ता गायकवाड

सोलापूरच्या वृत्तपत्र परंपरेला 'सोलापूर समाचार'पासून मोठा आणि निष्ठावंत इतिहास लाभला आहे. रंगाअण्णा वैद्य आणि व्ही. आर. कुलकर्णी यांच्यासारख्या दिग्गजांनी या भूमीत पत्रकारिता आणि साहित्य समृद्ध केले. किरण बनसोडे यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करत, विचारांशी प्रामाणिक राहून आणि सामाजिक बांधिलकी जपत ही परंपरा पुढे नेली आहे. हे पुस्तक सोलापूरच्या वैचारिक वारशात भर घालणारे ठरेल, असा विश्वास विचारवंत दत्ता गायकवाड यांनी व्यक्त केला.

'मीडिया मास्टर' २१ विद्यापीठांसाठी
अभ्यासू ग्रंथ : डॉ. शिवाजीराव शिंदे

विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजीराव शिंदे यांनी 'मीडिया मास्टर' पुस्तकाच्या रचनेचे कौतुक केले. १४६ पानांच्या या ग्रंथात ४६ महत्त्वाच्या मुद्द्यांचा आणि १०० टिप्सचा सूक्ष्म अभ्यास सोप्या भाषेत मांडला आहे. हे पुस्तक केवळ पत्रकारांसाठीच नव्हे, तर लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसाठीही मार्गदर्शक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील २१ विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पत्रकार व प्रशासन एकमेकांना पूरक : मल्हारी माने

पत्रकार आणि प्रशासन हे एकमेकांचे विरोधी नसून समाजहितासाठी काम करणारे पूरक घटक आहेत, असे मत मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माळी यांनी व्यक्त केले. पत्रकारांनी व्यवस्थेतील चांगल्या गोष्टींचे उदात्तीकरण करण्यासोबतच त्रुटींवर बोट ठेवून प्रशासनाला वेळीच सुधारण्याची संधी दिली पाहिजे. किरण बनसोडे यांच्या 'मीडिया मास्टर' ग्रंथाला त्यांनी प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

सामाजिक बांधिलकीचे कौतुक : भालशंकर

नागरी समस्या सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बनसोडे यांनी सातत्याने लेखणी चालवली आहे. हे पुस्तक नव्या पिढीला बातमीदारीचे आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे धडे देणारे एक उत्तम माध्यम ठरेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

बातमीतील विश्वासार्हता
टिकवण्याचे आव्हान : प्रशांत माने

आजच्या डिजिटल युगात पत्रकारितेसमोरील विश्वासार्हतेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या माहितीची योग्य खातरजमा केल्याशिवाय पत्रकारांनी बातमी पुढे नेऊ नये, असे मत तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने यांनी व्यक्त केले. किरण बनसोडे लिखित 'मीडिया मास्टर' हे पुस्तक सर्वांनी वाचल्यास समाजातील प्रत्येक घटक प्रत्यक्ष पत्रकार झाला नाही, तरी पत्रकाराच्या भूमिकेत प्रभावी काम करू शकतो. बनसोडे यांच्या बातम्यांवर संपादक म्हणून संस्कार करावे लागत नाहीत, हेच त्यांच्या पत्रकारितेचे मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले.

25/08/2026

महापौरांच्या हस्ते सुवर्ण गणपती भागवत चाळ लेझीम सुरवाचे उदघाटन Livesolapur News Mumbai Tak BBC News Marathi ABP Majha

24/08/2026

थोरला मंगळवेढा लेझीम मान्यवरांनी देखील धरला ठेका

राज्यसभेच्या पहिल्याच अधिवेशनात ३४ प्रश्न मांडले... खा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी केले रिपोर्ट कार्ड सादर...सोलापूरची लेक...
24/08/2026

राज्यसभेच्या पहिल्याच अधिवेशनात ३४ प्रश्न मांडले...

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी केले रिपोर्ट कार्ड सादर...

सोलापूरची लेक म्हणून संसदेत सोलापूरच्या विषयांवर भाष्य...

नाईट लँडिंग, रेल्वे सुविधा, शेतकरी, महिला, कामगार, आरोग्य प्रश्नांकडे लक्ष वेधले...

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'ताई ने मुझे सोलापूर की बहुत ही अच्छी चादर भेट दी है और वो मुझे बहुत पसंद आई'...

सोलापूर : राज्यसभेच्या पहिल्याच अधिवेशनात १०० टक्के उपस्थिती नोंदवत सहा विधेयकांवर भाष्य आणि ३४ प्रश्न मांडून सोलापूरची लेक म्हणून आपली कामगिरी सिद्ध केली.नाईट लँडिंग, रेल्वे सुविधा, शेतकरी, महिला, कामगार, आरोग्य यासह विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले, अशी माहिती शिवसेनेच्या खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी दिली.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार व वार्तालाप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विचारमंचावर नगरसेवक अमोल शिंदे, प्रियदर्शन साठे, जिल्हा प्रमुख अमर पाटील, सेवा फाउंडेशनचे प्रकाश राठोड, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यसभेत प्रवेश केल्यानंतर कोणत्याही पीएची मदत न घेता स्वतः प्रश्न तयार करून संसदेत मांडले. पहिल्याच अधिवेशनात सहा विधेयकांवर बोलण्याची संधी मिळाली. यामध्ये वंदे मातरम्, जन्म-मृत्यू नोंदणी दुरुस्ती, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या, बँकर्स बुक्स एव्हिडन्स, केरळ अल्टरशन ऑफ नेम आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या विधेयकांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगासह सोलापुरी चादर, विमानतळाचे नाईट लँडिंग, रेल्वे सुविधा, शेतकरी, महिला, कामगार, आरोग्य, ऊर्जा आणि घरकुल आदी प्रश्न संसदेत मांडल्याचे त्यांनी नमूद केले. २२ दिवसांच्या अधिवेशनात सुमारे १५० प्रश्न विचारले मात्र बॅलेट प्रक्रियेतून ३४ प्रश्न निवडले गेले. यामध्ये सहा तारांकित प्रश्नांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सोलापुरी चादर भेट दिल्याचा प्रसंगही त्यांनी सांगितला. सोलापुरी चादरीचे पंतप्रधानांनी केलेले कौतुक हा सोलापूरची लेक म्हणून अभिमानाचा क्षण असल्याचे त्या म्हणाल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठबळाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.महिला व बाल विकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर निवड झाल्यानंतर वन स्टॉप सेंटर आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा आढावा घेतला. महिलांना तातडीने वैद्यकीय व पोलिस मदत मिळावी तसेच मातृवंदना योजनेतील आर्थिक मदत वाढवावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रस्ताविक व आभार प्रदर्शन सरचिटणीस सागर सुरवसे यांनी केले. सूत्रसंचालन खजिनदार किरण बनसोडे यांनी केले.

सोलापूरची लेक म्हणून तो
माझ्यासाठी गौरवाचा क्षण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दोन वेळा भेटता आलं. पहिल्यांदा सगळ्या खासदारांच्या सोबत ब्रेकफास्टसाठी भेटले. त्याच दिवशी आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते, त्यांच्यासमवेत आम्ही जेव्हा दुसऱ्यांदा गेलो तेव्हा आवर्जून मोदी यांनी एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की 'ताई ने मुझे सोलापूर की बहुत ही अच्छी चादर भेट दी है और वो मुझे बहुत पसंद आई'. म्हणजे देशाच्या नेत्यांनी सोलापूरचं कौतुक करणं, सोलापूरच्या चादरीचं कौतुक करणं, हे सोलापूरची लेक म्हणून माझ्यासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण होता.

एनडीएच्या काळात इन्साफ मिळेल

रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ्स अँड डेथ्स अमेंडमेंट बिल' यामध्ये डिजिटलायझेशन होत असताना शोषित, वंचित, मागासवर्गीय, भटक्या-विमुक्त यांच्या हक्काला बाधा पोहोचू नये हे तिथे आग्रहाने बोलले.​'द सुप्रीम कोर्ट नंबर ऑफ जजेस अमेंडमेंट बिल' हे तिसरं बिल होतं ज्याच्यावरती माझं मत व्यक्त केलं आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टातल्या जजेसची संख्या वाढल्यामुळे आता मोदी यांच्या एनडीएच्या शासन काळात तारीख पे तारीख मिळणार नाही तर इन्साफ मिळेल ही अपेक्षा मी त्या भाषणामध्ये व्यक्त केली असल्याचे खासदार वाघमारे यांनी सांगितले.

वार्तालापातील ठळक मुद्दे -

- राज्यसभेत १०० टक्के उपस्थिती दर्शवली
- पहिल्याच अधिवेशनात ३४ प्रश्न आणि सहा विधेयकांवर भाष्य.
- सोलापुरी चादर, टेक्स्टाईल उद्योग, विमानतळाचे नाईट लँडिंग आणि रेल्वे सुविधांचे प्रश्न संसदेत मांडले.
- शेतकरी, महिला, कामगार, आरोग्य, ऊर्जा आणि गरीबांच्या घरकुलासंदर्भात प्रश्न उपस्थित केले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोलापुरी चादर भेट, चादरीचे कौतुक हा अभिमानाचा क्षण
-‘सोलापूरची लेक’ म्हणून संसदेत मांडलेल्या कामाचा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी सादर केले रिपोर्ट कार्ड.

विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याहस्ते क्राइम पत्रकार संघाच्या लोगोचे उत्साहात अनावरण...सोलापूर : क्राइम प...
24/08/2026

विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याहस्ते क्राइम पत्रकार संघाच्या लोगोचे उत्साहात अनावरण...

सोलापूर : क्राइम पत्रकार संघ, सोलापूर या पत्रकार संघटनेच्या अधिकृत लोगोचे अनावरण विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमाला पत्रकार, कॅमेरामन आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार बाबर, रवी मस्के आणि हरिभाऊ कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पत्रकार महेश हनमे, संदीप वाडेकर, अनिल हुल्ले, प्रमोद तुपसमुद्रे, तौसिफ शेख, अमर हुमनाबादे, इब्राहिम मुजावर, चंदन बोल्लू यांच्यासह विविध पत्रकार व कॅमेरामन उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान क्राइम पत्रकार संघाच्या उद्दिष्टांवर, भावी वाटचालीवर तसेच पत्रकारांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पत्रकार आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सकारात्मक आणि विधायक उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

लोगो अनावरण सोहळ्याला उपस्थित पत्रकार आणि कॅमेरामन यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांचे आभार मानले. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

महात्मा बसवेश्‍वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास नार्वेकरांची मंजुरी - विश्‍वनाथ चाकोते...वीरशैव महासभेच्या मुंबईतील का...
22/08/2026

महात्मा बसवेश्‍वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास नार्वेकरांची मंजुरी - विश्‍वनाथ चाकोते...

वीरशैव महासभेच्या मुंबईतील कार्यक्रमात घोषणा...

सोलापूर - अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे महाराष्ट्र शाखेच्या वतीने मुंबईत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी वीरशैव महासभेच्या वतीने मांडण्यात आलेल्या विविध मागण्यावर विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड.राहुल नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून विधानसभेत महात्मा बसवेश्‍वर महाराज यांचे तैलचित्र लावण्यास मंजुरी दिली अशी माहिती वीरशैव लिंगायत महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जगदगुरू श्री श्री श्री 1008 डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी काशीपीठ यांच्या दिव्य सानिध्यामध्ये मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नाटक राज्याचे कॅबिननेट मंत्री ईश्‍वर खंडरे यांचा सत्कार तसेच देशभरातील वीरशैव लिंगायत समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या मान्यवरांचा यावेळी माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते यांनी प्रास्ताविक केले.

अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला त्यानंतर त्यांनी वीरशैव लिंगायत समाजाला सकल वीरशैव समाज असे यापुढे संबोधले जावे, महाराष्ट्राच्या विधानसभेत महात्मा बसवेश्‍वरांचे तैलचित्र लावण्यात यावे आणि नवी मुंबई परिसरात वीरशैव समाजाला शासनाने 1 एकर जागा द्यावी त्या जागेवर देशभरातून मुंबईत येणार्‍या वीरशैव समाजाच्या मुलांसाठी तसेच मुंबईमध्ये येणार्‍या समाजबांधवासाठी राहण्याची सोय व्हावी, महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात वीरशैव समाजाला प्रतिनिधीत्व मिळावे, वीरैशव लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा आणि अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात आली.

देशाचे तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सन 2013 मध्ये वीरशैव लिंगायत समाजाला अल्पसंख्याकचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले होते परंतु केंद्रात सरकार बदलले आणि ती मागणी प्रलंबीत राहिली असे आपल्या प्रास्ताविकात विश्‍वनाथ चाकोते यांनी सांगितले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संमती देवून लवकरच विधानसभेत महात्मा बसवेश्‍वर यांचे तैलचित्र लावणार असल्याचे सांगितले. त्यानंतर कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी राज्यात मंत्रीमंडळात वीरशैव समाजाला प्रतिनिधीत्व देण्याबाबत सकारात्मकता दाखवून दिल्लीला या लवकरच चर्चा घडवून आणून निर्णय घेवू असे सांगितले. त्यानंतर केएलईचे कुलगुरू डॉ.प्रभाकर कोरे यांना वीरशैवरत्न, बसव समितीचे अरविंद जत्ती यांना बसवरत्न, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना वीरशैव भुषण, बीदरचे माजी आमदार अशोक केनी यांना पंचाचार्य रत्न, पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष हभप गहणीनाथ औसेकर महाराज यांना विठ्ठल सेवा पुरस्कार, कलबुर्गीचे शरणबसवेश्‍वर विद्यावर्धक संघाच्या चेअर पर्सन डॉ.दाक्षायणी अव्वाजी यांना अक्कमहादेवी रत्न, उपमुख्यमंत्री एकनाि शिंदे यांचे स्वीयसहाय्यक मंगेश चिवटे यांना वीरशैव आरोग्य दूत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्याचबरोबर वीरशैव समाजातील वीरशैव कक्कय्या समाजाचे अध्यक्ष सुधीर खरटमल, यांच्यासह कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र राज्यातील मंत्री, आमदार, खासदार माजी आमदार खासदार विविध पदाधिकारी यांचा वीरशैवश्री या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला संपूर्ण देशभरातून वीरशैव बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे अध्यक्ष कर्नाटक राज्याचे मंत्री ईश्‍वर खंडरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विश्‍वनाथ चाकोते, महिला अध्यक्षा उमा नाईक, मुंबई अध्यक्ष महेश मुद्दा, कर्नाटक प्रदेश अध्यक्ष शंकर बीद्री, तेलंगणा अध्यक्ष नेती महेश्‍वर, तामीळनाडूचे अध्यक्ष एस नागराथीनम, आंध्रप्रदेशचे अध्यक्ष दांडीना शिवानंद, केरळचे अध्यक्ष बीन के शंकर, महिला अध्यक्ष वीणा कश्यपनवर, उद्योग विभागाचे अध्यक्ष उमेश शिगोन, युवा अध्यक्ष व्यंकट रेड्डी पाटील, महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष विश्‍वशंकर चाकोते, रोहिणी कल्याणी, गुणवंत पाटील, गुरूपादप्पा पदशेट्टी, प्रकाश गवळी, प्रविण संगोलगी, सुरेश पाटील, सुभाषप्पा बोंदरे, चंद्रकांत नागणसुरे, अनिल चौगुले, शिवराज शेटकर आदींनी परिश्रम घेतले.

20/08/2026

थोरला मंगळवेढा तालमीचा लेझीम सराव सुरू
Livesolapur News ABP Majha BBC News Marathi Mumbai Tak TV9 Marathi @

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यश...शब्दपूर्ती केल्याचे समाधान : ...
19/08/2026

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यश...

शब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना...

सोलापूर : प्रतिनिधी

गेल्या ३४ वर्षांपासून मोची समाजाकडून होत असलेल्या शैक्षणिक कामासाठी भूखंड मिळण्याच्या मागणीला अखेर यश आले आहे. आमदार देवेंद्र कोठे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीत ही मागणी मंजूर करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विशेषतः लष्कर आणि परिसरात प्रामुख्याने असलेल्या मोची समाजाच्या गोरगरीब कामगारांच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी याकरिता श्री जांबमुनी मोची समाजसेवा मंडळाला येथील जागा शाळेकरीता द्यावी अशी मागणी समाजाच्यावतीने आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांची ही मागणी विचारात घेऊन आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. आमदार देवेंद्र फडणीस यांच्या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळे यांनी श्री जांबमुनी मोची समाजसेवा मंडळाला ही जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी हा भूखंड मिळवण्यासाठी मोची समाजातील अनेकांनी तत्कालीन आमदार, खासदार, मुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती. परंतु हा प्रश्न सुटला नव्हता. आमदार देवेंद्र कोठे यांनी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मांडल्यानंतर मात्र या विषयाला गती आली.

सोलापूर उत्तर सदर बझार येथील माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेली ३ हजार ९१० चौ.मी. जागा श्री जांबमुनी मोची समाज सेवा मंडळाला शैक्षणिक कारणासाठी २३४६ चौरस मीटर क्षेत्र प्रचलित बाजारमूल्याच्या वीस टक्के रक्कम घेऊन कब्जेहक्काने देण्याचा निर्णय घेण्यात आला. क्रीडांगणासाठी १५४६ चौरस मीटर क्षेत्र वर्षाला एक रुपया नाममात्र दराने तीस वर्षासाठी भाडेपट्ट्याने देण्यास मान्यता देण्यात आली.मात्र हा भूखंड़ देताना राज्य शासनाने काही अटी आणि शर्तीही घातल्या आहेत. या जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठीच करता येणार आहे. जमिनीचा ताबा मिळाल्यापासून तीन वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी वापर सुरू करणे बंधनकारक आहे.

महसूल विभागाचे क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सोलापूरला पुन्हा प्रत्यंतर

महसूल विभागाचे क्रांतिकारी निर्णय
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेत आहेत. याचे या निर्णयाच्या निमित्ताने सोलापूरकरांना पुन्हा एकदा प्रत्यंतर आले. बी टू च्या ऐतिहासिक निर्णयानंतर १९९२ पासून रखडलेला मोची समाजाचा शैक्षणिक विषयातील प्रश्न महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गी लावला आहे. कष्टकरी, मागासवर्गीय प्रवर्गातील मोची समाजाच्या शैक्षणिक कामासाठी जमीन उपलब्ध करून दिल्यामुळे येणाऱ्या काळात अनेक चांगले विद्यार्थी घडणार आहेत.

मोची समाजाने व्यक्त केला आनंद

आजवर मोची समाजाचा केवळ राजकीय फायद्यासाठी उपयोग करून घेण्यात आला. मात्र गोरगरीब मोची समाजाला न्याय मिळाला नाही. मोची समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी याकरिता महाराष्ट्राचे विकासाभिमुख मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार देवेंद्र कोठे यांनी मात्र हा विषय मार्गी लावून मोठी समाजाच्या पाल्यांच्या शिक्षणाची सोय केली आहे, असे म्हणत या निर्णयाबद्दल मोची समाजातील समाजधुरिणांनी एकत्र येत आनंद उत्सव साजरा केला.

मोची समाजाला दिलेल्या शब्दपूर्तीचे समाधान

मोची समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा शब्द मी विधानसभा निवडणुकीप्रसंगी दिला होता. यातीलच एक टप्पा म्हणजे हा निर्णय आहे. सोलापूर शहरात मोची समाजासह गोरगरीब कामगार वर्गाची संख्या मोठी आहे. त्यांच्या पाल्यांच्या उत्तम शिक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांचे शिक्षण उत्तम होण्यासाठी आवश्यक सर्व मदत शासनाच्यावतीने मिळवून देण्यात येईल.
-- देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

18/08/2026

भरत शेठ आगे बढो हम तुम्हारे साथ है...सोलापुरात जल्लोष Livesolapur News ABP Majha BBC News Marathi Mumbai Tak Saam TV News TV9 Marathi Zee Marathi fans

Address

Solapur
413001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Livesolapur News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Livesolapur News:

Shortcuts

Share