Jankranti News Solapur

Directions Website

Jankranti News Solapur jankrantinewssolapur

20/05/2026

“एक घर-एक झाड” अभियानातून ५ हजार रोपांचे मोफत वाटप; हरित सोलापूरसाठी डॉ. कोठे यांचा पुढाकार

सोलापूर ग्रीन मिशनच्या वतीने “एक घर – एक झाड” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून, शहरातील नागरिकांना वृक्षलागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी तब्बल ५ हजार रोपांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. सोलापूर ग्रीन मिशनचे संस्थापक डॉ. सुर्यप्रकाश कोठे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वाढते तापमान, प्रदूषण आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हरित व पर्यावरणपूरक सोलापूर घडविण्याचा या अभियानामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवार, २१ मे रोजी सकाळी १० वाजता गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेज परिसरातील वॉकिंग ट्रॅक, पाणी टाकी चौक, अक्कलकोट रोड येथे होणार आहे. कार्यक्रमाला आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, सभागृहनेते नरेंद्र कोळे तसेच महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

“प्रत्येक घरात किमान एक झाड” हा संकल्प प्रत्यक्षात आणून स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त सोलापूर निर्माण करण्याचा निर्धार या अभियानातून करण्यात आला आहे. या पर्यावरणपूरक चळवळीत नागरिक, युवक, स्वयंसेवक आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. सुर्यप्रकाश कोठे यांनी केले. पत्रकार परिषदेस व्यंकटेश चिलका, वासुदेव इप्पलपल्ली, राजमहेंद्र कमटम आणि प्रा. डॉ. प्रशांत चाबुकस्वार उपस्थित होते.

20/05/2026

जागतिक संग्रहालय दिनानिमित्त उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांची ऐतिहासिक संग्रहालयाला भेट

जागतिक संग्रहालय दिनानिमित्त सोलापूरच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी दयानंद शिक्षण संस्थेच्या ऐतिहासिक संग्रहालयाला भेट देत वारसा संवर्धनाचा संदेश दिला. “दयानंद सेन्टर फोर प्रेसेर्व्हशन ऑफ हेरिटेज ” येथे जतन करण्यात आलेल्या प्राचीन अश्मयुगीन वस्तू, शिल्पकला आणि ऐतिहासिक अवशेषांची त्यांनी अभ्यासपूर्ण पाहणी केली.

यावेळी संस्थेचे प्रशासक विजयकुमार उबाळे यांनी संग्रहालयातील दुर्मिळ वस्तू आणि संस्थेच्या कार्याची माहिती दिली. सोलापूरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन होणे गरजेचे असून विद्यार्थ्यांना इतिहासाची ओळख व्हावी यासाठी संग्रहालय अधिक विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे उपमहापौरांनी नमूद केले.
सोलापूर महानगरपालिका आणि दयानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांतून शहरात एक आदर्श आणि समृद्ध संग्रहालय उभे राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी प्रा. विश्वनाथ जोजन, प्रा. महेश साखरे, प्राचार्य शिवाजी शिंदे, प्रा. मनीषा पाटील, प्रा. स्मिता जगताप तसेच पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर यांच्यासह प्राध्यापक व मान्यवर उपस्थित होते.

20/05/2026

पंतप्रधान मोदी सध्या नॉर्वेच्या दौऱ्यावर आहेत. नॉर्वेतील पत्रकांरांचा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न परंतु पंतप्रधान मोदी हे दुर्लक्ष करुन निघून गेले. या घटनेचा व्हिडीओ पत्रकार महिलेने समाज माध्यमावर पोस्ट करत व्यक्त केली नाराजी. नॉर्वेतील पत्रकांराच्या प्रश्नला
पंतप्रधान मोदीनी का नाही दिलं उत्तर
विषय नक्की आहे तरी काय ?
तुम्हाला या प्रकाराबद्दल काय वाटतं
कंमेंट मध्ये नक्की सांगा ?

माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजपा प्रवेशानंतर सोलापुरात राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून दक्षिण सोलापूरचे आमदार सु...
18/12/2025

माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजपा प्रवेशानंतर सोलापुरात राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी दिलीप माने यांचे जाहीरपणे कौतुक केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना सुभाष देशमुख म्हणाले,
“दिलीप माने हे लोकांना पटवण्यात अतिशय हुशार आहेत.यापूर्वी त्यांनी विजयकुमार देशमुख यांना पटवले आणि आता सचिन कल्याणशेट्टी यांना पटवले. त्यामुळे त्यांचे कौतुक वाटते,” असे सूचक विधान त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावांवर टीका केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रवक्त्या सुषमा अंधारे पुन...
18/12/2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावांवर टीका केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रवक्त्या सुषमा अंधारे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी जोरदार आणि आक्रमक शब्दांत टीका केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 2025 च्या महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित प...
18/12/2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 2025 च्या महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्ष कार्यालयात प्रचंड गर्दी उसळली.सकाळपासूनच इच्छुक उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सोलापुरात अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.राष्ट्रवाद...
18/12/2025

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सोलापुरात अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रभाग क्रमांक ७ चे इच्छुक उमेदवार देवकते यांनी धनगरी वेश परिधान करून अर्ज भरण्यास येत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त बसव ब्रिगेड सोलापूर शहर जिल्हातर्फे देण्यात येणाऱ्या बसवरत्न पुरस्क...
18/12/2025

जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त बसव ब्रिगेड सोलापूर शहर जिल्हातर्फे देण्यात येणाऱ्या बसवरत्न पुरस्कार २०२५ ची घोषणा शहर जिल्हाध्यक्ष अमित रोडगे यांनी पत्रकार परिषदेत केली.हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जुळे सोलापुरातील जामगोंडी लॉन्स येथे आयोजित करण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला माजी आमदार तथा बाजार समितीचे माजी सभापत...
18/12/2025

गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला माजी आमदार तथा बाजार समितीचे माजी सभापती दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला अखेर गुरुवारी पूर्णविराम मिळाला. मुंबई येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात दिलीप माने यांनी पाच नगरसेवकांसह भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.


Congress MLA Diliprao Mane joins BJP Maharashtra

भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयात सकाळपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली.यामध्ये मुस्लिम ...
17/12/2025

भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयात सकाळपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली.यामध्ये मुस्लिम समाजातील अनेक इच्छुक उमेदवारांनी आवर्जून उपस्थिती लावत मुलाखती दिल्या.या वेळी पक्ष कार्यालयात उत्साही आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते.

Address

5A, Ramling Society, Vijaypur Road, Near By Indira Nagar
Solapur
413004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jankranti News Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share