Video Express

Video Express Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Video Express, Media/News Company, Chhatrapati Shivaji Maharaj Road, Subhash Nagar, Shukrawar Peth, Pune, Swargate.

22/02/2026

बिग बॉस मराठी 6 मधील स्पर्धकावर कोसळला दुःखाचा डोंगर.. 🥹

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच अभिनेत्री दिपाली सय्यदवर कोसळणार दुःखाचा डोंगर; नवऱ्याने आणि मुलाने लपवली बातमी. दिपाली यांच्या सासुचे २ फेब्रुवारी रोजी निधन झाले. या वेळात दिपाली बिग बॉसच्या घरात आहे. बिग बॉसच्या घरात जाताना तिने सासूला ट्रॉफी घेऊन आले की भेटू सांगितले होते. दिपाली यांचा गेम चांगला सुरू आहे आणि जर तिच्या पर्यंत ही दुःखद बातमी पोहचली तर ती खचून जाईल आणि बाहेर यायला बघेल.. तिने बघितलेले स्वप्न अर्धवट राहील म्हणून दिपाली यांच्या सासूच्या निधनाची बातमी बिग बॉसच्या घरात दिपाली पर्यंत पोहचू दिली नाही असं दिपालीच्या नवऱ्याने आणि मुलाने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

07/02/2026

वर्षाच्या सुरुवातीलाच हॉस्पिटल गाठावं लागलं पण यात खंबीरपणे उभी राहिली माझी हिरो बायको..

आर जे सुमित याने हॉस्पिटलमधील स्टोरी पोस्ट करत सांगितले सुरुवातीलाच ३२व्या वर्षी असं काही घडेल याची कल्पनाच न्हवती. नशीब बळवंत म्हणून जीव वाचला.. सुमितच्या पोस्ट नंतर अनेक चाहत्यांनी लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केल्याचं कमेंटमधून सांगितलं. सुमितची तब्बेत हळूहळू सुधारत आहे. सुमितने नुकतीच एक पोस्ट शेअर करत आपल्यापाठी खंबीर उभी आलेल्या बायकोचे आभार मानले आहेत.
सुमित म्हणाला,"मरणाच्या दारात उभा असताना
हॉस्पिटलच्या त्या भिंतींमध्ये जेव्हा आशेची प्रत्येक काडी तुटत चालली होती, तेव्हा एक हात मात्र घट्ट धरून होता तो म्हणजे माझ्या बायकोचा.

डॉक्टरांचे शब्द जड होते, मशिन्सचे आवाज भीती वाढवत होते आणि प्रत्येक क्षण आयुष्य मरणाचा होता. पण त्या प्रत्येक क्षणात तू माझ्या श्वासांसोबत उभी होतीस.

स्वतः आतून कोसळत असतानाही तू मला खंबीरपणे सावरलंस, डोळ्यांत अश्रू लपवून माझ्यासाठी धैर्याची भिंत बनून उभी राहिलीस.

तिची साथ, तिची काळजी, रात्रंदिवस न थकता केलेली धावपळ.. याच सगळ्यामुळे मी आज पुन्हा उभा आहे.

आज मी पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करतोय…
नव्या आशा, नव्या स्वप्नांसह आणि प्रत्येक श्वासात एकच नाव आहे… तुझं...

मनापासून धन्यवाद ❤️
माझ्या आयुष्याची खरी Hero माझी बायको 🙏"

सुमितने बायको श्वेता भरगुडे बद्दलच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

25/12/2025

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचा नुकताच लग्न झालं. प्राजक्ताने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की जेव्हा मला मुलगा बघायला येणार तेव्हा मी एक अट ठेवली होती. तो नॉनव्हेज खाणारा नसावा. मी शाकाहारी आहे त्यामुळे मला शाकाहारी असणारा मुलगा पाहिजे होता. ही गोष्ट जेव्हा शंभूराजला कळली त्याच दिवशी तो पंढरपूरला जाऊन माळ घालून आला. आणि दिवसातून २ ३ वेळा नॉनव्हेज खाणारा माझ्यासाठी शाकाहारी झाला.

14/06/2025

बिग बॉस मराठी 6 मध्ये कोणाचं होस्टिंग तुम्हाला बघायला आवडेल?

महेश मांजरेकर / रितेश देशमुख ????
कमेन्ट करून सांगा

10/06/2025
10/06/2025

*काही पुरुष स्वतःला पुढारलेले म्हणवतात*
"बघ मी तुला जायला दिलं नोकरीला" - एक मिनिट हे म्हणणारा कोण आहेस तू?

आई कुठे काय करते मालिका फेम अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने नुकत्याच आरपार या पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत स्त्रीवादावर हे भाष्य केलं आहे. पितृसत्ताक समाज रचनेचे ते ही एक बळीच आहे..

*नवऱ्याने दिलेला सपोर्ट म्हणजे नेमकं काय?* याबद्दल मधुराणी म्हणते की, "लग्न म्हणजे पॉलिटिक्स आहे, पॉवर गेम आहे तो आणि जो पर्यंत पॉवर गेम छान चाललंय तो पर्यंत सगळ छान आहे. काही पुरुष स्वतःला पुढारलेले म्हणवतात. ते म्हणतात की बघ मी तुला सपोर्ट केला, मी तुला जायला दिलं नोकरीला, मी तुला परवानगी दिली.. एक मिनिट हे म्हणणारा कोण आहेस तू??? बरं हे सगळं एका पिढीने स्वीकारलंय...' माझा नवरा ना खूप सपोर्टिव्ह आहे , तो ना मला नाही म्हणत नाही!' पण एक मिनिट तो नाही म्हणणारा कोण आहे???? तुम्ही एकत्र येऊन निर्णय घ्यायचाय. तुझा सपोर्ट हा त्यांनी वर्षानुवर्षे , पिढ्यानपिढ्या गृहीत धरलय म्हणून तू करतेस हे तुझ्याही गावी नाही आणि त्याच्याही गावी नाहीए! त्यांना बिचाऱ्यांना वाटत असतं आपण फार भारी आहोत कारण त्यांना तेवढंच माहीत असतं!! त्यांना वाटत असतं की ते भारी आहेत.. पण आता परिस्थिती बदलतेय आणि ती बदलायला हवी!".

08/02/2024
13/05/2023

Mahesh Kothare - Sukh Mhanje Nakki Kay Asta

20/03/2023

माय लेकी ❤️

20/03/2023

दीपा कार्तिकच्या लग्नातील पडद्यामागील धमाल.. कसा शूट झाला सीन पाहा व्हिडिओ

20/03/2023

घरातली दुष्मानी विसरून आले एकत्र

Address

Chhatrapati Shivaji Maharaj Road, Subhash Nagar, Shukrawar Peth, Pune
Swargate
411002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Video Express posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share