दैनिक चालु वार्ता Dainik Chalu Wartha

  • Home
  • India
  • Swargate
  • दैनिक चालु वार्ता Dainik Chalu Wartha

दैनिक चालु वार्ता Dainik Chalu Wartha , ह्या चॅनल च्या माध्येमातून आम्ही लोकांपर्यंत सत्य पोहेवाचण्याचा प्रयत्न नकीच करणार आहोत .

📰🗞️ " दैनिक " चालु वार्ता "
एक पाऊल सत्याच्या शोधात ! साथ तुमची ! काम आमचं !

🟢 जाहिराती साठी
☎️ 9373504748
📧 [email protected]

🟢 📰 न्यूजपेपर वाचण्यासाठी
epaper.chaluwartha.com
www.chaluwartha.com

काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी दिल्लीतील इंदिरा गांधी भवनात पत्रकार परिषद घेत ह...
06/11/2025

काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी दिल्लीतील इंदिरा गांधी भवनात पत्रकार परिषद घेत हरियाणामध्ये तब्बल २५ लाख मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला.
राहुल गांधींच्या आरोपावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. मात्र, या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी नवा बॉम्ब टाकत ब्राझीलमधील एका मॉडेलने हरियाणात १० वेळा मतदान केल्याचा आरोप केला. या संदर्भातील काही पुराव्यांचं सादरीकरण देखील राहुल गांधींनी केलं.

ब्राझीलच्या मॉडेलने हरियाणात १० वेळा मतदान केल्याचा आरोप राहुल गांधींनी केल्यानंतर संबंधित मॉडेल नेमकी कोण आहे? याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जाऊ लागले. त्यानंतर आता ज्या ब्राझिलियन मॉडेलचं नाव राहुल गांधींनी घेतलं तिची प्रतिक्रिया समोर आली आहे. लॅरिसाने व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली. तसेच तिच्या फोटोबाबत तिने आश्चर्य व्यक्त केलं असून हा फोटो तिच्या सुरुवातीच्या मॉडेलिंगच्या काळातील जुना फोटो असल्याचं तिने म्हटलं. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

ब्राझीलच्या मॉडेलने व्हिडीओत काय म्हटलं?

'मित्रांनो, मी तुम्हाला एक विनोद सांगणार आहे. हा वेडेपणा आहे, भारतात मतदान करण्यासाठी माझा एक जुना फोटो वापरला जात आहे. कल्पना करा, जेव्हा हा फोटो काढला गेला तेव्हा मी लहान होते आणि आता तोच फोटो भारतीय मतदार म्हणून वापरला जात आहे, लोक माझ्या फोटोबद्दल वाद घालत आहेत, हे अविश्वसनीय आहे', असं तिने म्हटलं आहे.
'भारतातील राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही. माझा फोटो एका स्टॉक इमेज प्लॅटफॉर्मवरून खरेदी केला गेला आणि माझ्या परवानगीशिवाय वापरला गेला. मी कधीही भारतात गेलेली नाही. मी एक डिजिटल इन्फ्लूएन्सर्स आहे, पण मला भारतीय लोक आवडतात', असंही तिने म्हटलं आहे.

राहुल गांधींनी तिचा फोटो पत्रकार परिषदेत दाखवल्यानंतर तिचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर तिच्या इंस्टाग्रामवर, विशेषतः भारतीयांकडून कमेंट्सचा पूर आला होता. बरेच जण तिच्या ओळखीबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. यावर ती म्हणाली की, 'भारतीय फॉलोअर्सचं माझ्या इंस्टाग्रामवर स्वागत आहे! असं दिसतं की मी आता बरेच भारतीय फॉलोअर्स मिळवले आहेत. लोक माझ्या फोटोंवर अशा कमेंट्स करत होते जणू मी निवडून आले आहे. पण स्पष्ट सांगायचं तर ती मी नव्हते, फक्त तो माझा फोटो आहे', असं तिने म्हटलं.

'मी सर्व भारतीयांच्या प्रेमाबद्दल खरोखर आभारी आहे. मला तुमची भाषा येत नाही, पण मी खरोखर तुमची आभारी आहे', असंही तिने म्हटलं आहे. दरम्यान, व्हिडीओमध्ये तिने असा खुलासा केला की भारतीय पत्रकार तिच्या फोटोच्या संदर्भातील प्रतिक्रिया घेण्यासाठी तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. यावर तिने म्हटलं की, 'काही भारतीय पत्रकार मला शोधत असून मुलाखती घेऊ इच्छित आहेत. पण मी उत्तर दिलं आहे की मी 'ब्राझिलियन मॉडेल' होते. मात्र, आता मॉडेलिंग करत नाही.'
राहुल गांधींनी नेमकं काय म्हटलं होतं?

निवडणूक आयोगाला स्वच्छ निवडणूक नको आहे. हा ठोस पुरावा आहे. राहुल यांनी एका ब्राझिलियन मुलीचा फोटो दाखवला आणि विचारले, "निवडणुकीत तिची भूमिका काय आहे?" ते म्हणाले की, माझा एक प्रश्न आहे: हरियाणाच्या मतदार यादीत ब्राझिलियन मुलीची भूमिका काय आहे? हरियाणातील पाच श्रेणींमध्ये २५ लाख मते चोरीला गेली. एका विधानसभा मतदारसंघात एका महिलेने २२ वेळा मतदान केले. या महिलेने सरस्वती, स्विटी, संगिता अशा विविध नावांनी मतदान केलं आहे. ही महिला ब्राझीलची मॉडेल असून तिचं नाव मॅथ्युस फेरारो आहे असंही राहुल गांधी म्हणाले. तसंच त्यांनी तुम्ही या फोटोसह दिलेला कोड स्कॅन करुनही माहिती घेऊ शकता असंही सांगितलं. त्यानंतरच या महिलेबाबतची माहिती समोर आली आहे.

भाजपा नेते व महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते श्री संदीप खर्डेकर यांना त्यांच्यावर लिहलेल्या लेख चीं प्रतिमा भेट देताना..
06/11/2025

भाजपा नेते व महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते श्री संदीप खर्डेकर यांना त्यांच्यावर लिहलेल्या लेख चीं प्रतिमा भेट देताना..

तेलंगणातील संगारेड्डी याठिकाणी मुंग्याच्या भीतीने २५ वर्षीय विवाहित महिलेने टोकाचे पाऊल उचललं आहे. मनीषा असं मृत महिलेचे...
06/11/2025

तेलंगणातील संगारेड्डी याठिकाणी मुंग्याच्या भीतीने २५ वर्षीय विवाहित महिलेने टोकाचे पाऊल उचललं आहे. मनीषा असं मृत महिलेचे नाव आहे.
पती आणि लहान मुलीला मागे सोडून मनीषाने आत्महत्या केली त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. तेलंगणाच्या अमीनपूर नगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या सर्व होम्स येथे ही घटना घडली. जिथे मनीषा पती श्रीकांत आणि मुलगी अन्वीसोबत राहत होती.

मनीषा मायरमेकोफोबियाने ग्रस्त होती जो एक गंभीर मानसिक आजार आहे. ज्यात तिला मुंग्यांची प्रचंड दहशत वाटत होती. ही फक्त एक साधी भीती नव्हती तर एक असा आजार होता ज्याने तिचे जीवन जिवंत नर्क बनवलं होतं. तिच्या कुटुंबाने या मानसिक समस्येवर उपचार आणि समुपदेशनाचा उपचार सुरू केला होता. परंतु भीतीचं सावट तिच्यावर इतके खोलवर रुजले होते, त्यावर मात करणे तिला अशक्य वाटू लागले.

बेडरूमचा दरवाजा तोडला, अन् आतमध्ये....

मंगळवारी संध्याकाळी जेव्हा तिचा पती श्रीकांत कामावरून परतला तेव्हा घरात असलेल्या शांततेमुळे तो चिंतेत पडला. बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता. वारंवार हाक मारून आणि ठोठावूनही मनीषाने प्रतिसाद न दिल्याने अखेर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा तोडताच आतील दृश्य पाहून सगळेच हैराण झाले. मनीषा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली.

तेलंगणा पोलिसांना मनीषाची सुसाईड नोट सापडली

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेलंगणा पोलिसांना मनीषाची सुसाईड नोट तिच्या खोलीत सापडली, ज्यामध्ये तिच्या वेदनेचे कारण दिले होते. तिने तिच्या पतीला उद्देशून लिहिले, श्री, मला माफ कर..मी या मुंग्यांसोबत राहू शकत नाही असं तिने म्हटलं होते. तर मुलगी अन्वीसाठी शेवटचा संदेश होता, मुलीची काळजी घ्या असं तिने सांगितले. मनीषाच्या सुसाईड नोटने संपूर्ण कुटुंबाला हादरवून टाकले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

भारतीय संघाने भारतात खेळवण्यात आलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चं जेतेपद पटकावलं. महिला संघाने पहिल्यांदाच विश्वचषक...
06/11/2025

भारतीय संघाने भारतात खेळवण्यात आलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चं जेतेपद पटकावलं. महिला संघाने पहिल्यांदाच विश्वचषकाचं जेतेपद आपल्या नावे केलं आणि यानंतर वर्ल्ड चॅम्पियन संघ पंतप्रधान मोदींची खास भेट घेण्यासाठी पोहोचला.
यादरम्यान मोदींच्या निवासस्थानी संपूर्ण संघाची खास व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण संघाशी पंतप्रधानांनी खास भेट घेतली आणि संवादही साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भेटीदरम्यान टीम इंडियाची आंतराराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी, त्यानंतर वर्ल्डकप मोहिम तसेच संघातील खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत संवाद साधला. यादरम्यान त्यांनी हरमनप्रीत कौरला तिने टिपलेल्या शेवटच्या झेलबद्दल विचारलं आणि तो झेल टिपल्यानंतर हरमनने चेंडू स्वत:च्या खिशात ठेवला होता.

दक्षिण आफ्रिका संघाने ४ षटकांत ९ विकेट्स गमावल्या होत्या आणि आता भारताला वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी फक्त एका विकेटची गरज होती. यानंतर हरमनने ४६वं षटक टाकण्याची जबाबदारी दीप्ती शर्माकडे दिली. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ४ षटकांत ५२ धावांची गरज होती.
दीप्तीने पहिल्या दोन्ही चेंडूंवर एकही धाव दिली नाही. त्यामुळे स्ट्राईकवर असलेल्या नादिन दे क्लार्कला पुढच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची गरज होती. त्यामुळे दीप्तीच्या फुल टॉस बॉलवर तिने मोठा फटका मारला आणि एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने गेला. तिथे उभ्या असलेल्या हरमनने मागे धावत जाऊन हवेत उडी मारताना कमालीचा झेल टिपला आणि दक्षिण आफ्रिका संघ सर्वबाद होत भारतीय संघ पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन ठरला. हरमनने विजयाचा आनंद साजरा करताना शेवटपर्यंत तो चेंडू सोडला नाही आणि काही वेळाने तो चेंडू तिने तिच्या खिशात ठेवला.
हरमनप्रीतने अखेरचा झेल टिपलेला चेंडू खिशात ठेवण्यासाठी तिला कोणी सांगितलं होतं?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरमनप्रीत कौरला याबाबत प्रश्न विचारला. पंतप्रधान म्हणाले, "जिंकल्यानंतर तो चेंडू खिशात ठेवला, त्यामागे काय विचार होता? असं करायला तुला कोणी सांगितलं होतं का, की नेमकं काय झालं?"
हरमनप्रीत कौर यावर उत्तर देताना म्हणाली, "अजूनही तो चेंडू माझ्याकडे आहे. खरंतर ही देवाची इच्छा होती. असं तर काही नक्की नव्हतं की शेवटचा कॅच माझ्याकडेच येईल. तो चेंडू माझ्या दिशेने आला आणि बस्स… इतक्या वर्षांची प्रतिक्षा, मेहनत होती. त्यामुळे असं झालं की तो चेंडू माझ्याकडे आला आहे, तर हा चेंडू आता माझ्याकडेच राहणार आहे. आताही तो चेंडू माझ्या बॅगमध्ये आहे."

बसमध्ये महिलेच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. नराधम व्यक्तीने या महिलेच्या गुप्तांगाला स...
06/11/2025

बसमध्ये महिलेच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. नराधम व्यक्तीने या महिलेच्या गुप्तांगाला स्पर्श केला आणि त्यानंतर महिलेच्या छातीलाही टच करण्याचा प्रयत्न केला.
वासनांध व्यक्तीने महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झालाय. संतापलेल्या महिलेनं या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. या महिलेनं नराधमाच्या सपासप कानशिलात लगावल्या. या भंयकर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बसमध्ये बाजूच्या सीटवर बसलेल्या महिलेसोबत अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला चांगलीच अद्दल घडलीय. महिलेनं त्याने केलेल्या घाणेरड्या कृत्याचा व्हिडीओ काढून व्हायरल केला आहे. व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, बसमध्ये बाजूच्या सीटवर बसलेल्या प्रवासी महिलेसोबत या तरुणाने अश्लील कृत्य केलं. त्याने महिलेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला आणि त्यानंतर छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान महिलेलं तरुणाच्या हालचालींबाबत कळतं आणि ती त्या वासनांध व्यक्तीच्या कानाखाली जाळ काढते.
व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी संतापले

बसच्या आतमध्ये बसलेला हा व्यक्ती महिलेच्या शेजारी बसलेला असतो आणि तो महिलेसोबत अत्यंत आक्षेपार्ह (आपत्तिजनक) कृत्य करत असतो. या महिलेनं तरुणाने केलेले अश्लील चाळे कॅमेरात कैद केले आणि त्याला चांगलाच धडा शिकवला. हा व्हिडीओ नावाच्या यूजरने एक्सवर शेअर केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, बेटी बचाव, बेटी पढाओ अशी घोषणा देणारे लोक आता कुठे गेले? केंद्र सरकारची ही योजना योग्य होती की चुकीची? आपल्या देशातील बहिणी कुठेही सुरक्षीत नाहीयत.
आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

केरळच्या कट्टाकडा जिथे एक महिला बसमध्ये प्रवास करत होती. तेव्हा शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने तिच्यासोबत छेडछाड केली. त्यानंतर त्या महिलेनं हिंमत दाखवून त्या व्यक्तीचा व्हिडीओ बनवला आणि लगेच त्याला थप्पड मारली. या घटनेचं गांभीर्य लक्षात आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी. ही पोस्ट शेअर करत पोलिसांनाही टॅग करण्यात आलं आहे. व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती उघडहत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात...
06/11/2025

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती उघड

हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली

बीडमधील एका बड्या नेत्याचा या कटात हात असल्याचा आरोप

जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी यासंदर्भात पोलिसांना दिले निवेदन

बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका आहे. मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आली आहे. बीडमधील एका बड्या नेत्याचा या कटात हात असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेण्यात आली असून पोलिस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला जात असून बीडमधील एका बड्या नेत्याचा यामध्ये हात आहे. मनोज जरांगे पाटलांच्या एका सहकाऱ्यासह अन्य एका व्यक्तीसोबत बीडमध्ये बैठका झाल्या होत्या. मनोज जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी यासंदर्भात जालना पोलिस अधीक्षकांना निवेदन दिल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन व्यक्तींना जालना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात स्वतः मनोज जरांगे पाटील हे देखील जालना पोलिस अधीक्षकांना रात्री उशिरा भेटल्याची माहिती आहे.
मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. गंगाधर काळकुटे स्वतः बीड पोलिस अधीक्षकांना भेटून निवेदन देणार आहेत. याप्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीडमधून दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची नावे समोर आली आहेत. अमोल खुणे आणि दादा गरुड असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नावे आहेत. अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी आहे. काही कोटींची ऑफर देऊन हा कट रचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून ताब्यात घेतलेल्या दोघांची कसून चौकशी सुरू आहे. ऑफर देणारा बडा नेता परळीचा असल्याचे सांगितले जात आहे.

तुमचं मत काय ??
06/11/2025

तुमचं मत काय ??

१८०० कोटींची जमीन३०० कोटींत खरेदी,स्टॅम्प ड्युटी अवघे ५०० रुपये...!!🤔🤔एकमेका सहाय्य करू आपणच होऊ श्रीमंत....!!
06/11/2025

१८०० कोटींची जमीन
३०० कोटींत खरेदी,
स्टॅम्प ड्युटी अवघे
५०० रुपये...!!
🤔🤔
एकमेका सहाय्य करू
आपणच
होऊ श्रीमंत....!!

असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया                     ...
06/11/2025

असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

'70 हजार कोटी पचवले म्हणून हे पचतील असे समजू नये', राजू शेट्टी यांचा अजित पवारांवर घणाघात
06/11/2025

'70 हजार कोटी पचवले म्हणून हे पचतील असे समजू नये', राजू शेट्टी यांचा अजित पवारांवर घणाघात

तुमचं मत काय??
06/11/2025

तुमचं मत काय??

तुम्हाला काय वाटतं 🤔
06/11/2025

तुम्हाला काय वाटतं 🤔

Address

Pune
Swargate
411042

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm

Telephone

+919373504748

Website

http://www.epaper.chaluwartha.com/

Alerts

Be the first to know and let us send you an email when दैनिक चालु वार्ता Dainik Chalu Wartha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to दैनिक चालु वार्ता Dainik Chalu Wartha:

Share