07/03/2026
एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत तळेगाव दाभाडे नगरीच्या बिनविरोध नगरसेविका होण्याचा मान मिळवलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे नगरसेविका सौ. शोभाताई सुनील परदेशी.
समाजकारणाची जाणीव, लोकांशी असलेली आत्मीयता, सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत असलेली संवेदनशीलता आणि विकासाच्या कामांबद्दलची सकारात्मक दृष्टी यामुळे त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो. साधेपणा, लोकाभिमुख काम करण्याची वृत्ती आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी काहीतरी करण्याची धडपड हीच त्यांची खरी ओळख आहे.
महिला दिनानिमित्त, रोखठोक मावळ पुन्हा एकदा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या विशेष मुलाखतींच्या मालिकेला सुरुवात करत आहे.
या मालिकेतील पहिली प्रेरणादायी मुलाखत
🎙 नगरसेविका सौ. शोभाताई सुनील परदेशी
📅 दिनांक : 7 मार्च
त्यांचा प्रवास, अनुभव आणि समाजकार्याबद्दल जाणून घेण्यासाठी ही मुलाखत Facebook Live वर नक्की पाहा आणि शेअर करा.