Democratic India News

Democratic India News News and Views For People of India "Democratic India News" is लोकतांत्रिक भारत की आवाज News and views Page for people of India.

आज (३ सप्टेंबर २०२५) झालेल्या GST परिषदेतर्फे घोषित केलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आजची जीएसटी संबंधित मुख्य घोषणा१. ज...
03/09/2025

आज (३ सप्टेंबर २०२५) झालेल्या GST परिषदेतर्फे घोषित केलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा
आजची जीएसटी संबंधित मुख्य घोषणा

१. जीएसटी स्लॅबमध्ये मोठा बदल
GST परिषदेत निर्णय घेण्यात आला की, आताच्या चार स्लॅब्स — 5%, 12%, 18%, आणि 28% — आता फक्त दोन स्लॅबमध्ये रूपांतरित होतील: 5% आणि 18%. यासोबत, ’पण, तंबाखू, गुटखा, उच्च श्रेणीच्या गाड्या इत्यादी’ वस्तूंवर नवीन 40% स्लॅब सुद्धा लागू केला जाणार आहे

प्रभावी तारीख म्हणून २२ सप्टेंबर २०२५ निश्चित करण्यात आला आहे, त्या दिवशी नवीन स्लॅब्स लागू होतील.

२. दरांमध्ये होणारी घट आणि बदल
दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंवर — जसे कि टूथपेस्ट, शॅम्पू, साबण, इ., जीएसटी 18% वरून 5% करण्यात येईल

इलेक्ट्रॉनिक्स (टीव्ही, एसी), लहान गाड्या — जीएसटी 28% वरून 18% पर्यंत कमी होईल

जीवन व आरोग्य विमा पॉलिसीज — या अब्जेक्टवर GST माफ करण्यात येणार, म्हणजेच 0% GST

ब्रेड (रोटी, पराठा, पनीर), पॅक केलेले पदार्थ — यावर जीएसटी 5% किंवा शून्य (0%) करण्यात येणार

३. सुविधा आणि व्यवहार सुधारणा
एमएसएमई आणि स्टार्टअप्ससाठी GST नोंदणी कालावधी — 30 दिवसांऐवजी आता फक्त 3 दिवसांत पूर्ण होईल.

निर्यातकांसाठी ऑटोमॅटिक GST रिफंड सुविधा सुरु केली जाणार आहे

📰 हिंदू स्थलांतरितांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णयभारतामध्ये स्थलांतर करून आलेल्या हिंदू धर्मीय नागरिकांसाठी केंद्र सरक...
03/09/2025

📰 हिंदू स्थलांतरितांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

भारतामध्ये स्थलांतर करून आलेल्या हिंदू धर्मीय नागरिकांसाठी केंद्र सरकारने महत्वाचा दिलासा दिला आहे.
ज्या हिंदू स्थलांतरितांनी ३१ डिसेंबर २०२४ पूर्वी भारतात प्रवेश केला आहे, त्यांना आता भारतात राहण्यासाठी पासपोर्टची गरज भासणार नाही.

⭕🚦 वाहतूक नियंत्रण अधिसूचना 🚧दि. २९ ऑगस्ट २०२५ ते ३ सप्टेंबर २०२५ दरम्यानआनंदनगर सिग्नल (ठाणे-घोडबंदर रोड) येथे मेट्रो ल...
29/08/2025

⭕🚦 वाहतूक नियंत्रण अधिसूचना 🚧

दि. २९ ऑगस्ट २०२५ ते ३ सप्टेंबर २०२५ दरम्यान
आनंदनगर सिग्नल (ठाणे-घोडबंदर रोड) येथे मेट्रो लाईन ४ च्या रेल्वे ट्रॅकवर ६ कोच बसविण्याचे काम करण्यात येणार आहे.

🛑 नागरिकांना विनंती आहे की, या काळात पर्यायी मार्गांचा वापर करावा व वाहतूक कोंडी टाळावी.

केंद्र सरकारकडून ऑनलाईन गेमिंगविरोधात मोठं पाऊल!लोकसभेत 20 ऑगस्ट रोजी ऑनलाईन गेमिंगचं नियमन करणारं महत्त्वाचं विधेयक मंज...
21/08/2025

केंद्र सरकारकडून ऑनलाईन गेमिंगविरोधात मोठं पाऊल!

लोकसभेत 20 ऑगस्ट रोजी ऑनलाईन गेमिंगचं नियमन करणारं महत्त्वाचं विधेयक मंजूर ✅

🔹 उद्देश – ऑनलाईन गेमचं व्यसन, मनी लाँडरिंग व आर्थिक फसवणुकीला आळा घालणे.
🔹 कायदा झाल्यानंतर –
➡️ ऑनलाईन मनी गेमिंग सेवा देणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा ₹1 कोटी दंड
➡️ जाहिरात करणाऱ्यांना 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा ₹50 लाख दंड

ताज्या रेल्वे बातम्या | LATEST TRAIN UPDATE 🚨सायं. ५:३० वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, CSMT-ठाणे व CSMT-माहुल (माहुल...
19/08/2025

ताज्या रेल्वे बातम्या | LATEST TRAIN UPDATE 🚨

सायं. ५:३० वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, CSMT-ठाणे व CSMT-माहुल (माहुल/मांकुर्द) या मार्गावरील सेवा पूर्णपणे बंद आहेत.

🌊 मिठी नदीचे पाणी ३.६ मीटरवर पोहोचले असून ते धोक्याच्या पातळीपेक्षा तब्बल १० मीटर जास्त आहे. त्यामुळे कुर्ला, सायन, मांकुर्द व गोवंडी या महत्त्वाच्या स्थानकांवर रेल्वेमार्गावर १६ ते १७ इंच पाणी साचले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा परिस्थितीत गाड्या धावविणे शक्य नाही. मात्र, संध्याकाळी ५:४५ वाजता एक गाडी कुर्ला ते कल्याण दरम्यान चालविण्यात आली.

🚨⚠️  मुंबई व उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 🌧️🚆रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने अनेक मेल/एक्सप्रेस गाड्या उशिरा ध...
19/08/2025

🚨⚠️

मुंबई व उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 🌧️🚆
रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने अनेक मेल/एक्सप्रेस गाड्या उशिरा धावणार, रद्द अथवा वळविण्यात आलेल्या आहेत.

👉 प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी ताज्या अपडेट्स तपासाव्यात.

ठाणे, सेंट्रल लाईन व नवी मुंबई साठी रेड अलर्टपुढील काही तासात पाऊसाचा वेग अजून वाढण्या ची सक्यता ⏰ सकाळी ७:५६ वाजता :ठाण...
19/08/2025

ठाणे, सेंट्रल लाईन व नवी मुंबई साठी रेड अलर्ट
पुढील काही तासात पाऊसाचा वेग अजून वाढण्या ची सक्यता
⏰ सकाळी ७:५६ वाजता :
ठाणे, सेंट्रल लाईन व नवी मुंबईच्या काही भागात मुसळधार पावसाचा 🚨 रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

सध्या अनेक पावसाचे जोरदार पट्टे एकत्र आल्याने ताशी जवळपास ७५ मिमी वेगाने मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे पुढील काही तासांत सेंट्रल लाईनवर पाणी साचणे व प्रवासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे ⚠️⚠️.

नागरिकांना आवाहन –
👉 गरजे शिवाय बाहेर पडू नका
👉 शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम (WFH) चा पर्याय वापरा, विशेषतः ठाणे व सेंट्रल लाईनवरील नागरिकांनी.

मुंबईत पावसाचा जोर कायम असून
सावध रहा, सुरक्षित रहा. 🌧️

18/08/2025

🚨 अपडेट न्यूज | मुंबई पाऊस 🌧️

मुंबईतील मुसळधार पावसामुळे मोठी अडचण निर्माण झाली.
किंग्ज सर्कल व गांधी मार्केट परिसरात शाळेच्या बसमध्ये अडकलेले लहान विद्यार्थी यांना पोलिसांनी मदत केली.

👮‍♂️ मुंबई पोलिसांच्या जवानांनी तत्काळ बचावकार्य राबवून सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढल.
मुंबईत सर्व शाळा आणि महाविधालयांना सुट्टी जाहिर.

Vc: utkarsh Singh

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when Democratic India News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Democratic India News:

Share