29/05/2026
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात अन्नातून विषबाधेची धक्कादायक घटना समोर आली आहे. किन्हवलीजवळील शिळ गावात राखाडी कार्यक्रमातील जेवण खाल्ल्यानंतर तब्बल २२ जणांना उलट्या, जुलाब आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. सर्वांना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.