MH 04 Media

MH 04 Media News, Media & Entertainment
(1)

25/07/2025

केज येथे आवदा कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात उपोषण करणाऱ्या एका शेतकरी महिलेचा उपोषणा दरम्यान मृत्यू..

25/07/2025

मासुंदा तलावाच्या कोट्यवधींच्या सुशोभीकरणाची दयनीय अवस्था..काँग्रेसचा हल्लाबोल..!

कोट्यवधी रुपयांचा खर्च, स्मार्ट सिटीच्या नावाखाली झगमगता प्रकल्प... पण प्रत्यक्षात? मासुंदा तलावाच्या काठावर उघडपणे दिसतेय निष्काळजीपणा, फसव्या दर्जाचे काम आणि ठाणे महानगर पालिका प्रशासनाच एक अवाक्षर काढत नाही. येथील लावलेल्या रेलिंग, काचेचा पदपथ, एल इ डी लाईट व्यवस्थांची दुरावस्था झाली असल्याचा आरोप ठाणे काँग्रेस पक्षाने केला आहे.

ठाणे शहराचा मानबिंदू म्हणून असलेल्या
शहराच्या मध्यवर्ती भागातील मासुंदा तलावावर काही वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत भव्य सुशोभीकरण करण्यात आलं. स्टील रेलिंग, एलईडी लाइटिंग, काचेचे पदपथ, बैठक व्यवस्था अशा 'हाय-फाय' सोयीचा गाजावाजा झाला. पण आता, या सर्व सुविधांची झालीय धुळधाण.

तुटलेली रेलिंग, फुटलेल्या काचा, उखडलेले पदपथ, मोडलेली बाकं ही सगळी दृश्यं आज नागरिकांच्या सुरक्षिततेवर गदा आणत आहेत. नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान डोळ्यांत झणझणीत खुपणारी वस्तुस्थिती उघडकीस आली.

काँग्रेसने स्वतःहून फुटलेल्या काचांजवळ सुरक्षा पट्ट्या लावत प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला. पिंगळेंनी तत्काळ नगर अभियंत्यांशी संपर्क साधत या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.

स्मार्ट सिटीच्या नावाखाली झालेल्या सर्वच कामांची चौकशी व्हावी, अशी मागणीही काँग्रेसने यावेळी लावून धरली आहे. या पाहणी वेळी शिष्टमंडळात सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, शहर उपाध्यक्ष बाबू यादव ,ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील,ब्लॉक कार्याध्यक्ष नूर्शिद शेख,युवक काँग्रेस चे लोकेश घोलप,अमोल गांगुर्डे, विलास महाडेश्वर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

भ्रष्टाचाराचा आरोप करत ‘स्मार्ट सिटी’ की ‘स्कॅम सिटी’? त्यावेळी भाजप नेत्यांनी दिल्लीपर्यंत धाव घेत सुशोभीकरणातील भ्रष्टाचाराचे बिंग फोडले होते. पण चौकशी कुठे गेली? निकाल काय लागला? हे नागरिकांना अजूनही माहित नाही. इतक्या लवकर जर ही दुरवस्था झाली असेल, तर हा थेट दर्जाहीन कामांचा, भ्रष्टाचाराचा पुरावा नाही का ?

– राहुल पिंगळे (काँग्रेस प्रवक्ता)

Rahul Gandhi

25/07/2025

शिवसेना विभागप्रमुख "अमित जयस्वाल" यांच्या नेतृत्वाखाली श्रीरंग शिवसेना शाखेत मोफत रेशन कार्ड कॅम्प..!

24/07/2025

"कोयता गँग" च्या हल्ल्यात ०३ जण जखमी..
गोकुळनगरच्या घटनेने महिला भगिनींनी व्यक्त केली हळहळ

24/07/2025

ठाणे - घोडबंदर वरील गायमुख घाटात पडलेल्या खड्यां विरोधात मनसेचे नेते अविनाश जाधव आक्रमक...

Raj Thackeray
Avinash Jadhav MNS

24/07/2025

कासारवडवलीतील बिकानेरचे वास्तव उघड: नाव मोठं, लक्षण खोटं! भाजपाच्या अर्चना पाटील यांनी केला पर्दाफाश...

ठाणे - चकचकीत नावाच्या आड लपलेली घाण आणि बेफिकिरीचा पर्दाफाश कासारवडवलीतील प्रसिद्ध ‘बिकानेर’ येथे झाला आहे. स्थानिक मुलं आणि त्यांच्या पालकांच्या तक्रारीनंतर प्रत्यक्ष पाहणी केली असता धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या.

पाहणीदरम्यान तयार सामोसे आणि मिठाईवर भुंगे, माशा आणि कीटक फिरताना आढळले. काही मिठाई धूळ खात पडलेली होती, तेलातही कीटक सापडले. स्वयंपाकघरात कपडे धुण्याची पावडर ठेवलेली दिसली, cleanliness चा मागमूसही नव्हता. अचानक पाहणीसाठी लोक पोहचताच काही पदार्थ लपवण्याचा, फेकण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो उघड झाला.

ग्राहकांच्या तब्येती बिघडल्याच्या अनेक तक्रारी आधीच नोंद झाल्या होत्या, आणि पाहणीदरम्यान दिसलेले चित्र त्याला कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. बिकानेरच्या प्रतिनिधींनी दिलेली उत्तरे समाधानकारक नव्हती.

या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून लवकरच कठोर कारवाई होईल, अशी प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा व्यवहारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावाचा तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांनी केली आत्महत्या..राज्य सरकारने क...
24/07/2025

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावाचा तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांनी केली आत्महत्या..राज्य सरकारने कोट्यावधींचे बिल थकवल्याने कंत्राटदार हर्षल पाटील यांचे टोकाचे पाऊल..

24/07/2025

खोपटचा बस स्टॉप..रातोरात गेला होता चोरीला..!
मनसेचे "संजय भुजबळ" यांच्या पाठपुराव्याने पुन्हा
एकदा बस स्टॉप बसवण्याचे काम सुरू.

Raj Thackeray
Amit Thackeray
Avinash Jadhav MNS

अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा करू नये महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश...ठाणे :- कोणत्याही ...
23/07/2025

अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा करू नये महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश...

ठाणे :- कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज पुरवठा करण्यात येऊ नये, असे मा. उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. त्या अनुषंगाने, ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत महावितरण आणि टोरॅंट या दोन्ही वीज कंपन्यांनी या आदेशाचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करण्यात येऊ नये तसेच, वीज पुरवठा करताना संबंधित बांधकाम अधिकृत असल्याची खातरजमा वीज कंपन्यांनी करावी, या संदर्भात, मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बुधवारी दुपारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात महापालिका अधिकारी, महावितरण कंपनी आणि टोरॅंट वीज कंपनी यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.
ज्या बांधकामासाठी वीज पुरवठा मागितला असेल त्या बांधकामांच्या अधिकृतपणाबाबत कागदपत्रांची खातरजमा केल्याशिवाय वीज पुरवठा न करणे हे वीज कंपन्यांचे कायदेशीर कर्तव्य आहे. केवळ प्रतिज्ञापत्र किंवा अर्ज यांच्या बळावर वीज पुरवठा करता येणार नाही. ही अतिशय महत्त्वाची आणि गंभीर बाब असून महापालिका आयुक्तांनी त्यासंदर्भात महावितरण आणि इतर वीज कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करावा. केवळ अधिकृत बांधकामालाच वीज पुरवठा केला जाईल यादृष्टीने पावले उचलावीत, असे मा. उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.
मा. उच्च न्यायालयाच्या या आदेशाची सविस्तर माहिती आयुक्त राव यांनी बैठकीत दिली. यासंदर्भात, आजपासून दोन्ही कंपन्यांनी बांधकामाच्या अधिकृतपणाची खात्री केल्याशिवाय वीज पुरवठा देऊ नये, असे स्पष्ट निर्देशही दिले. ग्राहकांना त्रास होऊ नये आणि अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा होऊ नये यादृष्टीने या परिस्थितीतून कंपन्यांनी वरिष्ठ पातळीवर मार्ग काढावा. त्यासाठी महापालिकेच्या शहर विकास विभागाचेही सहकार्य घ्यावे, अशी सूचनाही आयुक्त राव यांनी या बैठकीत केली.
विजेसाठी अर्ज केल्यानंतर किती काळात वीज पुरवठा दिला पाहिजे यासाठी जशी मार्गदर्शक तत्वे आहेत. त्याचप्रमाणे, अनधिकृत बांधकामांना वीज जोडणी देता येणार नाही, हेही मा. उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे त्यासाठी तातडीने कार्यपद्धती निश्चित करावी, असेही आयुक्त राव म्हणाले.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे, उपायुक्त (मालमत्ता कर) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (अतिक्रमण विभाग) शंकर पाटोळे, उपनगर अभियंता (विद्युत) शुभांगी केसवानी, विधी अधिकारी मकरंद काळे, महावितरणचे मुख्य अभियंता संजय पाटील, अधिक्षक अभियंता युवराज मेश्राम, टोरॅंट कंपनीचे महाव्यवस्थापक (वितरण) प्रवीणचंद्र पांचाळ, सहमहाव्यवस्थापक विनय बहल, जनसंपर्क अधिकारी शशिकांत कोठेकर उपस्थित होते...

वरळी बीडीडीतील दोन इमारतींना मिळाली ओसी..बीडीडीवासीयांचं स्वप्न साकार..! युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते,आमदार आदित्य ठाकरे...
23/07/2025

वरळी बीडीडीतील दोन इमारतींना मिळाली ओसी..
बीडीडीवासीयांचं स्वप्न साकार..! युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते,आमदार आदित्य ठाकरेंनी करून दाखवलं…

Uddhav Thackeray
Aditya Thakrey
Rajan Vichare

23/07/2025

कल्याण येथील मराठी तरुणीला मारहाण प्रकरणी.. मनसे नेते अविनाश जाधव यांनी भेट दिली..

Raj Thackeray
Amit Thackeray
Avinash Jadhav MNS

Address

Thane West

Telephone

+918655552958

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MH 04 Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MH 04 Media:

Share