Thane Vaibhav

Thane Vaibhav www.thanevaibhav.in
Thanevaibhav is a daily Marathi newspaper of Thane district. Thanevaibhav is oldest marathi newspaper of Thane district.

It is the most widely circulated newspaper of Thane and has become mouthpiece of 1.20 crores population of Thane district. It gives all the latest news,happenings of Thane. Currently Mr Milind Ballal is the editor and Mr Nikhil Ballal is the managing editor.

10/09/2026

आजच्या १० सर्वात महत्त्वाच्या बातम्या |
"चला पाहूया... आजच्या TOP 10 NEWS | १० सप्टेंबर २०२६

आजच्या १० सर्वात महत्त्वाच्या बातम्या |"चला पाहूया... आजच्या TOP 10 NEWS |         १० सप्टेंबर २०२६क्लिक करून पहा 👇     ...
10/09/2026

आजच्या १० सर्वात महत्त्वाच्या बातम्या |
"चला पाहूया... आजच्या TOP 10 NEWS |
१० सप्टेंबर २०२६
क्लिक करून पहा 👇

आजच्या १० सर्वात महत्त्वाच्या बातम्या |"चला पाहूया... आजच्या TOP 1...

10/09/2026

रिंग मेट्रो च्या मुळ प्रस्तावाला लोकमान्य नगरचा पाठिंबा तर नविन मार्गिकेला विरोध पहा लाईव्ह…

10/09/2026

“गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया”नारळाच्या करवंट्यां पासून बनवली गणपती बाप्पा ची सुबक मुर्ती पहाच…

10/09/2026

टिटवाळा रेल्वे स्थानकाचे लवकरच नवे आणि सुंदर रूप पाहायला मिळणार ! # प्लॅटफॉर्मकाम

#टिटवाळारेल्वेस्थानक

10/09/2026
10/09/2026

लंडनमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेल्सन मंडेला यांच्या विचारांचा उल्लेख करत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. "शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही जग बदलू शकता," असे सांगत त्यांनी शिक्षणाच्या परिवर्तनकारी शक्तीवर भर दिला.

Shinde

10/09/2026

गर्दीच्या लोकलमध्ये मोठा अनर्थ टळला !

डोंबिवलीहून सुटलेल्या गर्दीच्या लोकलमधून महिला अचानक रुळांवर पडली. सुदैवाने या घटनेत महिलेला किरकोळ दुखापत झाली.

दिवा-मुंब्रा दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे गर्दीच्या लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

डोंबिवलीहून सकाळी ७.५६ वाजता रवाना झालेल्या लोकलमध्ये
गर्दीमुळे एक महिला प्रवासी रेल्वे रुळांवर पडल्याची धक्कादायक घटना दिवा-मुंब्रा दरम्यान घडली. सिग्नलमुळे लोकल थांबलेली असताना ही घटना घडली. महिला ट्रॅकवर पडल्याचे लक्षात येताच डब्यातील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र, सुदैवाने या घटनेत महिलेला किरकोळ दुखापत झाली असून मोठा अनर्थ टळला.


10/09/2026

*कैसे हराया फेम नगरसेविका सहर शेख चा ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालया समोर पाणीबाणी वरुन राडा पहाच नेमकं काय घडलं*

10/09/2026

डॉ. रेवती श्रीनिवासन यांचे कार्य ठाण्यासाठी अभिमानास्पद

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रात डॉ. रेवती श्रीनिवासन यांचे कार्य ठाण्यासाठी अभिमानास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सिंघानिया ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका आणि लेखिका डॉ. रेवती श्रीनिवासन लिखित 'क्रिएटिंग क्लासरूम्स व्हेअर एवरी चाईल्ड बिलॉंग्ज' या पुस्तकाचा सोहळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथील 'सत्कार रेसिडेन्सी' येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रेमंड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, खासदार नरेश म्हस्के, पूर्वेश सरनाईक, डॉ. अंकित ठक्कर, डॉ. अशेष भुमकर, डॉ. कमल घनशमनानी, डॉ. लता घनशामनानी, डॉ. विवेक बिर्ला, डॉ. मंजुश्री बिर्ला, डॉ. संजय ओक, माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू निलेश कुलकर्णी, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख, माजी खासदार आनंद परांजपे, डॉ. संदीप केळशीकर, डॉ. अंकुश देशमुख, जश्न भुमकर, प्रिया भुमकर, मंजुश्री पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, अनिल थत्ते, विक्रांत चव्हाण, एमआयडीसीचे सीईओ विपिन शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपप्रादेशिक अधिकारी हेमांगिनी पाटील, माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन, नगरसेविका परिषा सरनाईक, माजी नगरसेविका नंदिनी विचारे तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, "विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येकाला समान संधी मिळण्यासाठी वर्गातील वातावरण सर्वसमावेशक असणे गरजेचे आहे. हे पुस्तक शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरेल," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

गेल्या तीन दशकांपासून शिक्षण क्षेत्रात अविरत योगदान देणाऱ्या डॉ. रेवती श्रीनिवासन यांनी सर्वसामान्य मुलांसोबतच विशेष गरजा असणाऱ्या ग्रामीण व वंचित घटकांतील मुलांसाठी थेरपी सेंटर्स आणि विशेष उपक्रम राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणले. लंडनच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'मध्ये झालेला त्यांचा सन्मान आणि त्यांनी निर्माण केलेला शैक्षणिक वारसा संपूर्ण ठाणेकरांसाठी अभिमानास्पद आहे, असेही श्री.शिंदे म्हणाले. कार्यक्रमात 'ठाणेवैभव'चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी लेखिका डॉ. रेवती श्रीनिवासन यांची मुलाखत घेतली.

Address

Tembhi Naka, Veer Savarkar Marg
Thane West
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thane Vaibhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Thane Vaibhav:

Shortcuts

Share

Category