
16/07/2025
त्या काकू तावातावाने बोलत होत्या “आमच्या यांची सारखी फाटते.”
मी:- त्यासाठी टेलरकडे जा, मी काय करणार?
माझ्या विनोदाने काकू अजूनच कावल्या पण रागावर नियंत्रण ठेवून म्हणाल्या “अहो फाटते म्हणजे हे प्रत्येक गोष्टीला घाबरतात असे म्हणते आहे मी.”
मी शांतपणे म्हणालो “तूम्हा दोघांना पुष्पौषधीची गरज आहे.”
आता परत काकूंचा आवाज चढला पण पुन्हा त्यांनी तो नियंत्रणात आणला आणि विचारले “मला कशाला, माझ्या स्वभावात काय दोष आहे?”
काका भित्रे होते यात दुमत नव्हते पण काकू फारच डॅशिंग होत्या. डॅशिंग असणे वाईट नाही पण एका मर्यादेपलिकडे कूठलीही गोष्ट वाईटच होते.
काकूंनी जी परिस्थिती अनुभवली होती त्यामुळे त्यांना असे डॅशींग आणि फटकळ व्हावे लागले.
मेंगळट, बोटचेपी, फट्टू काका आईसमोर, साहेबांसमोर ससा व्हायचे आणि त्यांचा गैरफायदा घेतला जायचा. त्यांना वाचवण्यासाठी काक़ूंना खमकेपणाने बोलणे भाग होते, त्यामुळे लोकांनी काकूंची उगीच बदनामी केली.
काकू मनाने खुप चांगल्या होत्या, कोणी खरोखर अडचणीत असेल तर मदतीला धावून जायच्या. त्यामुळे त्या लोकप्रियदेखील होत्या पण तोंड बेकार असल्याने लोक थोडे लांबच रहायचे.
एकिकडे काकांचा भित्रा, भिडस्त स्वभाव तर दुसरीकडे काकूंचा फटकळ स्वभाव यातून त्यांचा संसार संतुलित झाला होता पण तरी त्यांच्या स्वभावावर औषध देणे गरजेचे होते. मी दोघांना त्यांच्या स्वभावानुसार औषधे दिली.
अनेक वर्षे एकत्र असलेल्या दोघांच्या संसारात पुष्पौषधीने गोडी फुलवली. एकमेकातील प्रेम वृध्दींगत होण्यास मदत होऊन त्यानंतर त्यांच्या तक्रारी कमी झाल्या आणि त्यांची मुले तसेच शेजारपाजारचे देखील मला आणि पुष्पौषधींना दुवा देऊ लागले. दवा को दुवा का साथ मिल गया और सफर जारी है, जास्तीत जास्त लोकांच्या जीवनात आनंदाची बाग फुलवण्यासाठी फुलांचे हे अर्क आतुरलेले आहेत.
पुष्पौषधी:- 1500/- कुरियर सेवा उपलब्ध
The Cost may increase anytime
संपर्क
आदित्य भागवत (मो) 9029581590