30/08/2026
धाव प्रगतीची... गतीशील ठाण्याची!
३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन जल्लोषात संपन्न..
ठाणे : ठाणे शहराचा मानबिंदू असलेली ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा २०२६ रविवारी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. शहरातील विविध भागांतून आलेल्या असंख्य धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेत ठाण्याच्या क्रीडाप्रेमाची प्रचिती दिली. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे धाव घेतली.
स्वर्गीय सतीश प्रधान यांच्या संकल्पनेतून ठाण्यात सुरू झालेल्या वर्षा मॅरेथॉनचे यंदाचे ३२ वे वर्ष आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळात या स्पर्धेने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आदिवासी भागातील धावपटूंनीही या स्पर्धेत सहभागी होत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू होताच ठाणेकरांना वर्षा मॅरेथॉनची उत्सुकता लागते. यंदाच्या स्पर्धेलाही ठाणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. बदलत्या ठाण्याचे प्रतिबिंब या मॅरेथॉनमधून पाहायला मिळत असून, शहरासोबतच क्रीडा क्षेत्राचाही विकास होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी यांनी खेळाडूंना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत केलेल्या सूचनांची दखल घेत भविष्यात त्यानुसार आवश्यक बदल केले जातील, असे सांगण्यात आले. ठाणे शहरातून केवळ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नव्हे, तर ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू घडावेत, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, राजकीय सहकारी, लोकप्रतिनिधी आणि कलाकारांच्या साथीने मान्यवरांनीही मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. यावेळी सौ. लता शिंदे, माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी, आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम, विरोधी पक्षनेते अश्रफ शानु पठाण यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
नगरसेवक राजेश मोरे, संजय वाघुले, विकास रेपाळे, नम्रता जाधव भोसले, मीनल संख्ये, नारायण पवार, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, सुधीर कोकाटे, मुकेश मोकाशी तसेच अभिनेता मंगेश देसाई, दूरचित्रवाणी मालिकांमधील कलाकार आणि मोठ्या संख्येने ठाणेकर स्पर्धकांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला.
Thane Municipal Corporation Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sanjay Kelkar Shivsena - शिवसेना CMOMaharashtra ShivSena Thane Collectorate