07/05/2025
*कल्याण् मधे वाजणार सायरन् ...
“ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल आज ठाणे जिल्ह्यातील "कल्याण" मध्ये*
•कल्याण येथील मॅक्सी मैदान, रामबाग लेन, नूतन हायस्कूल समोर, कर्णिक रोड येथे आज बुधवार,दि.7 मे 2025 रोजी दुपारी 4 वाजता.
•केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन.
•या मॉक ड्रिलच्या दरम्यान शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर दुपारी 4 वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल.
•नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
•मॉक ड्रिल ही केवळ पूर्वतयारीचा भाग असून कोणतीही खरी आपत्ती उद्भवलेली नाही, हे लक्षात घ्यावे.
*होणारा घटनाक्रम...*
•कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातील एकूण 4 सायरन एकाच वेळी वाजणार.
•Air Strike/ बॉम्ब हल्ल्याची सूचना मिळणार
•सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठीच्या सूचना दिल्या जाणार.
•धावाधाव, गडबड न करता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविले जाईल.
•संबंधित परिसरात शोध मोहीम घेवून जखमी, अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करणे, त्यांना प्रथमोपचार करणे, ही कार्यवाही करण्यात येईल.
श्री.अशोक शिनगारे (भा.प्र.से)
जिल्हाधिकारी तथा नियंत्रक, नागरी संरक्षण दल, ठाणे
डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण
पोलीस सह आयुक्त,पोलीस आयुक्तालय, ठाणे
डॉ. डी. स्वामी
पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण
डॉ.संदीप माने
निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे
श्री.विजय जाधव
उपनियंत्रक, नागरी संरक्षण दल, ठाणे
डॉ.अनिता जवंजाळ
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठाणे