Dainik Jan Khulasa

Dainik Jan Khulasa Dainik Jan Khulasa a Daily News paper published from Thane And Mumbai. Jan Khulasa is having large readership through Maharashtra.

This Marathi Newspaper covers all latest and exclusive news. Jan Khulasa has started in the year 2011.

खानिवडे: वसईत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ८११ हेक्टर जागेत कांदळवन क्षेत्र आढळून आले असून ते आता कांदळवन विभागाच्या अख...
03/12/2024

खानिवडे: वसईत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ८११ हेक्टर जागेत कांदळवन क्षेत्र आढळून आले असून ते आता कांदळवन विभागाच्या अखत्यारीत घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या भागाची खातरजमा करून ते ताब्यात घेतले जाणार आहे कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी स्वतंत्र कांदळवन विभाग तयार झाला आहे.वसई विरारमध्ये खाडी किनारे, पाणथळ जागा अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदळवने आहेत. या मध्ये काही कांदळवन क्षेत्र हे मह़सूल विभागाच्या अखत्यारीत येते. पर्यावरणीय दृष्टीने ही कांदळवने अत्यन्त महत्वाची भूमिका बजावत आहेत. तर कांदळवनांमध्ये विविधि प्रकारचे पशु पक्षी ही आश्रयाला येत असतात. मात्रमागील काही वर्षापासून वसई तालुक्यातील कांदळवन कत्तल करून अनधिकृतबांधकामे उभारणे. बेसुमार वाळू उपसा. मातीभराव अशा विविध प्रकारे कांदळवने नष्ट केली जात आहेत.त्यासुळे खाडी किनाऱ्याच्या भागातील कांदळवन क्षेत्र कमी होऊ लागले आहे, या कांदळवनांची कत्तल व संवर्धनासाठी स्वतंत्र असा कांदळवन विभाग आहे. त्यांच्या मार्फत विविध उपक्रम राबवून कांदळवनक्षेत्राचे संवर्धन केले जात आहे . जे कांदळवन क्षेत्र महसूल विभागाकडे येते ते कांदळवन विभागाकडे वर्ग केल्यास स्वतंत्र लक्ष ठेवून कत्तली विरोधात कारवाई व संवर्धनासाठी उपाययोजना करण्यास मदत होणार आहे.कांदळवन क्षेत्र वर्ग करण्यासाठी जिल्हा स्तरावर प्रस्ताव दिला आहे. याशिवाय कोण कोणत्या भागात किती कांदळवन क्षेत्र आहे याचा आढावा घेतला जात आहे .नुकताच केलेल्या पाहणी दरम्यान जवळपास ८११ हेक्टर क्षेत्रात कांदळवन असल्याचे आढळून आले आहे.

उरण : उरण तालुक्यातील डोंगरमाथ्यावर वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वनसंपदेला याचा मोठा फटका बसत आहे. वन विभागाकडून...
03/12/2024

उरण : उरण तालुक्यातील डोंगरमाथ्यावर वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वनसंपदेला याचा मोठा फटका बसत आहे. वन विभागाकडून जंगल वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, मात्र ते तुटपुंजे असल्याचे वन्यप्रेमींकडून बोलले जात आहे. वणव्यांमुळे तालुक्यातील जंगलांचे प्रचंड नुकसान होत आहे. या वणव्यांमुळे जंगलातील वृक्ष, तसेच पशू , पक्षी आगीत होरपळून नष्ट होत आहेत. नैसर्गिक किंवा मानवी हस्तक्षेपामुळे वणवे लागत असून यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मोठे झाड पडले की होणारे घर्षण, आकाशातून कोसळणारी वीज, अतिउष्णतेमुळे कोरडे गवत व पाने पेटणे, गवत कुजून मिथेनसारखा ज्वलनशील वायू तयार होत असल्यामुळे वणवे लागत असल्याचे बोलले जात आहे. तर काही वेळा मानवी हस्तक्षेपामुळेदेखील वणवे लागत असल्याने त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी वन्यप्रेमींकडून करण्यत येत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी तालुव्यातील काशे झोंगराकडील पिरकोन गावाच्या बाजूच्या भागात मोठ्या प्रमाणात वणवा लागला होता. सदरील घटनास्थळी वन्यप्रेमी पोहचेपर्यंत अनेक भाग जळून खाक झाल्याचे दोस्ती सदाबहार ग्रुपचे सदस्य संतोष जोशी यांनी सांगितले. गेल्या काही वर्षापासून वणब्याबाबत जनजागृतीची मोहीम वन विभागाने हातीघेतली आहे. वन विभागाच्या माध्यमातून कुठेही वणवा पेटला, तर त्वरित घटनास्थळी पोहचृून तो विझावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते, असे वन अधिकारी व्ही. जी. कोकरे यांनी सांगितले आहे.

मुंबई : ठाणे जिल्हा रुग्णालयात रविवारी  ९ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासू्न सायंकाळी सातवाजेपर्यत एकाच दिवसात तब्...
03/12/2024

मुंबई : ठाणे जिल्हा रुग्णालयात रविवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासू्न सायंकाळी सातवाजेपर्यत एकाच दिवसात तब्बल ७२ लहान मुलांवर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ठाणे जिल्ह्यातील शहापूर, वाडा, जव्हारपासून दुर्गम भागातील आदिवासी तसेच गोरगरीब मुलांवर या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
निमित्त होते विख्यात बालशल्यचिकित्सक
डॉ.संजय ओक यांच्या वाढदिवसाचे .खरतर गेले अनेक दिवस या शस्त्रक्रियांसाठी ठाणे जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार तसेच अन्य डॉक्टर तयारी करत होते. गेल्या दोन दिवसांपासून रुग्ण व त्यांचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले होते.
त्याच्या जेवणापासून ते शस्त्रक्रियेची सर्व जय्यत तयारी करण्यात आली होती. रविवारी सकाळपासून डॉ. संजय ओक तसेच पालिकेच्या शिव रुग्णालयातील त्यांचे सहकारी डॉक्टर आणि ठाणे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरा यांसह आवश्यक कर्मचारीवर्ग शस्त्रक्रिया करत होते. सायंकाळी सातवाजेपर्यंत या ७२ बालकांवरील शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी सांगितले.
यासाठी संपूण ठाणे जिल्ह्यामधून ठाणेजिल्हा रूणालयात बालकांना शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात येत असल्याचे डॉ. संकेत कुलकर्णी यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत मुरबाड , शहापूर जव्हार ,ठाणे तसेच नवी सुंबईतील या बालकांची निवड करण्यात आल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाले.केईएमचे अधिष्टाता व पलिकेच्या सर्व रुग्णालयांचे संचालक म्हणूनु १ वषंपूवीं निवृत्त झालेले डॉ. ओक हे वर्षाकाठी शासनाच्या विविध ग्रामीण रुग्णालयात तसेच इमेरीटस प्रोफेसर म्हणून
पालिकेच्या शीव रुग्णालयात जाऊन सुमारे एक हजार बालकांच्या शस्त्रक्रिया करतात. यासाठी ते फुटकी कवडी कोणाकडू घेत नाहीत, केईएमचे अधिष्ठाता व आपल्या महापलिका रुग्णालयाचे संचालक म्हणून निवृत्त झाल्यानंतर डि.वाय.पाटील संस्थेत कुलगुरू म्हणून डॉ. ओक यांनी काम पहिले. तसेच प्रिन्स अलिखान हॉस्पिटलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. करोनाच्या काळात राज्य शासनाने नियुक्त केलेल्या कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य अमूल्य म्हणावे लागेल. सध्या ठाण्यातील कौशल्या हॉस्पिटलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते काम करत असून केईएममधून निवृत्त झाल्यानंतर एकाही रविवारी सुट्टी न घेता डॉ. संजय ओक हे आदिवासी भागातील तसेच गोरगरीब लहान मुलांच्या शस्ञक्रिया करतात.

मुंबई :  विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळणार्‍या महायुतीला अद्याप सत्ता स्थापन करता आलेली नाही. भाजपच्या गटातून याबद्द...
03/12/2024

मुंबई : विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळणार्‍या महायुतीला अद्याप सत्ता स्थापन करता आलेली नाही. भाजपच्या गटातून याबद्दल पीटीआयला माहिती , गृह खात्यावर अडली बोली अशी मोठी बातमी आली आहे. भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने याबद्दलची माहिती दिल्याचे वृत्त पीटीआयने दिल आहे. भाजपच्या विधिमंडळाची बैठक ३ किंवा ४ डिसेंबरला होणार असल्याची माहिती या नेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला दिली आहे.
महायुती २.० सरकारचा शपथविधी ५ डिसेंबरला आझाद मैदानावर होणार आहे. या सोहोळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हजर राहतील. देवेंद्र फडणवीस तिसर्‍यांदा मुख्यमंत्री होतील. २०१४ ते २०१९ या कालावधीत ते राज्यातील दुसरेच नेते ठरले . २०१९ मध्ये शिवसेनेने भाजपाची साथ सोडल्यानंतर फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांसोबत राजभवनात सकाळी उरकलेले शपथविधी चांगलाच गाजला. मात्र हे सरकार केवळ साडे तीन दिवस टिकल. त्यानंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आठवडा उलटला आहे. तरीही महायुतीत सत्ता वाटपाचा पेच कायम आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सत्ता स्थापनेचा सर्वाधिकार भाजप नेतृत्वाला दिला आहे. त्यामुळे राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे . भाजपला फडणवीसांच्या नेतृत्वात दणदणीत विजय मिळाला असून पक्षाने सलग तिसऱ्यांदा १०० चा आकडा विधानसभेत ओलांडला.

लाल परीचा प्रवास महागणार मुंबई : एसटी महामडळाने प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे .त्यामुळे नागर...
02/12/2024

लाल परीचा प्रवास महागणार

मुंबई : एसटी महामडळाने प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे .त्यामुळे नागरिकांच्या
खिशाला कात्री लागण्याची चिन्हे आहेत. मागील तीन वर्षांत एसटीच्या तिकिटांची भाडेवाढ करण्यात आली नाही, असे
सांगत तब्बल १४.१३ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. भाडेवाढ करणे गरजेचे आहे, त्या शिवाय महामंडळ चालू शकत नाही, सध्याची परिस्थिती पाहता भाडेवाढ झाली नाही तर एसटीवर मोठं संकट उभं राहिल.
सध्या नवीन सरकार स्थापन झ्याल्यानंतर याव शिकामोर्तब होईल. मात्र सकारात्मक निर्णय नाही झाला तर जनांदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.

विश्रांतीनंतर एकनाथ शिंदे पुन्हा ठाण्यात ठाणे : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या भेटीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्...
02/12/2024

विश्रांतीनंतर एकनाथ शिंदे पुन्हा ठाण्यात
ठाणे : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या भेटीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची गर्दी झाली होती. शिंदे गावी निघून गेल्याने महायुतीच्या सत्तस्थापनेच्या बैठकांच्या फेऱ्या होत नव्हत्या .काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील त्याच्या मूळगावी निघून गेले होते. त्यामुळे महायुतीतील चर्चेच्या फेर्‍या हाऊ शकल्या नव्हत्या. रविवारी सायंकाळी ते हेलिकॉप्टरने पुन्हा ठाण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी शिंदे गटाचे जेष्ठ नेते दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच ठाण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदे हे ठाण्यात परतल्याने आता राज्याच्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे: तसेच महायुतीच्या बैठकांच्या फेऱ्या देखील सुरू होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे हे प्रकृती ठीक नसल्याच्या कारणामुळे मागील काही दिवसांपासू्न त्यांच्या सातारा येथील दरेगावी गेले होत. रविवारी सायंकाळी ते पुन्हा ठाण्यात परतले. त्यांच्या भेटीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती,
शिंदे गावी निघून गेल्याने महायुतीच्या सत्तास्थापनेच्या बैठकांच्या फेर्‍या होत नव्हत्या.

शैक्षणिक खर्च वाढला, इंग्रजी माध्यमाच्या शाळांची फी परवडेना!मुंबई : आपला पाल्य तीन वर्षांचा झाला की, त्याला शाळेमध्ये प्...
14/10/2024

शैक्षणिक खर्च वाढला, इंग्रजी माध्यमाच्या शाळांची फी परवडेना!

मुंबई : आपला पाल्य तीन वर्षांचा झाला की, त्याला शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांचीच घाई अधिक असते. त्यातही तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असेल तर त्याचे शुल्क पाहूनच अनेकांची झोप उडते. सध्या प्री-प्रायमरीपासून सुरू होणारा शैक्षणिक खर्च उच्च शिक्षणापर्यंत परवडेनासा झाला आहे. अगदी पहिलीपासून दहावीपर्यंत विद्यार्थ्यांचा शाळेचा खर्च हा अव्वाच्या सव्वा येतो.
पालिकेच्या शाळांमध्ये मोफत शिक्षण असले, तरी इंग्रजी शाळांतून शिक्षण घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. विनाअनुदानित, अनुदानित मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पालकांना कमी-अधिक प्रमाणात शैक्षणिक खर्च येत असला, तरी इंग्रजी शाळांत प्रत्येक वर्षी वाढणारे शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे नाही.
मोफत शिक्षणाकडे पालकांची पाठ
nग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांत, तर मुंबईत पालिका शाळांमध्ये मोफत शिक्षण दिले जात असले, तरी या शाळांमध्ये मूलभूत सुविधा नसल्याचे कारण देत पालक या शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश घेत नाहीत.
nएकीकडे भरमसाठ शुल्क देऊन इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेणारे पालक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोफत आणि दर्जेदार शिक्षण असूनही पाठ फिरवत आहेत.
nग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये मूलभूत सुविधा नसल्याचे कारण देत पालक पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेताना दिसतात.
इंग्रजी शाळांची वार्षिक फी किती?
इयत्ता पहिली
४० ते ५० हजार
इयत्ता दुसरी
४० ते ५५ हजार
इयत्ता तिसरी
५५ ते ६० हजार
इयत्ता चौथी ते दहावी
७० हजार ते १ लाख
तज्ज्ञ काय सांगतात?
जगभरात इंग्रजीचा बोलबाला वाढत आहे. शासनाच्या धोरणाचाही हा परिणाम आहे. शासन मराठी शाळांना परवानगी देत नाही.
मात्र, इंग्रजी माध्यमाच्या शाळांना लगेच परवानगी देते. त्यामुळे यात पालकांना दोष न देता त्यांनीच विवेकी बुद्धीने कालसंगत निर्णय घेणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
शहरात प्री-प्रायमरीचे शुल्क किती?
शहर व उपनगरात तर जागोजागी प्री-प्रायमरीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळांचे शुल्क ५० हजार रुपयांपासून एक लाखापर्यंत असते.

14/10/2024

"प्रवासी सुरक्षेसाठी सेफ्टी डोअरच्या लोकल चालवा!"

मुंबई : सर्व लोकल रेल्वे सेफ्टी डोअरच्या चालवाव्यात, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन भुयारी रेल्वेचा किंवा रेल्वे ब्रिज डबलिंगचा पर्याय अवलंबावा जेणेकरून जलद लोकल आणि मेल-एक्सप्रेस भुयारी मार्गातून, तर स्लो लोकल ब्रिजवरून चालवल्या जातील, अशी मागणी आमची पश्चिम रेल्वे मुंबई प्रवासी संघटनेने केली आहे. संघटनेने पश्चिम रेल्वेच्या डीआरएमकडे विविध मागण्या केल्या आहेत. त्यांत एसी लोकलचे तिकीट दर कमी करून सर्व लोकल सेफ्टी डोअरच्या चालवाव्यात, ही प्रमुख मागणी आहे. लोकलच्या गर्दीवर नियंत्रणासाठी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या मुंबई लोकलचे स्वतंत्र झोन बनवावेत. पश्चिम रेल्वेवरील गर्दी कमी करण्यासाठी सर्व लोकल १५ डब्यांच्या चालवाव्यात. एसी लोकलसंदर्भात पश्चिम रेल्वेच्या नेहमीच्या लोकल रद्द करून त्या ठिकाणी एसी लोकल सुरू करू नयेत. त्यासाठी नवीन वेळापत्रक बनवावे. सर्वसामान्यांना एसी लोकल परवडत नसल्याने फक्त ३० टक्के प्रवासीच त्यातून प्रवास करतात. परिणामी त्याचा मागील लोकलवर भार येऊन प्रवाशांना गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. विरार ते चर्चगेट एसी लोकलचा मासिक पास २२०० रुपये आहे. १२ ते १५ हजार रुपये कमावणाऱ्यांनी काय करावे? म्हणून साध्या लोकलच्या फेऱ्या वाढवा किंवा ते शक्य नसल्यास सेफ्टी डोअरच्या एसी किंवा नॉन-एसी लोकल सरसकट सेकंड क्लासच्या तिकीट दरात चालवाव्यात. एसीचे तीन कोच सामान्य लोकलला जोडावेत. जेणेकरून जनरल, फर्स्ट क्लास आणि एसी असे तिन्ही वर्गांचे प्रवासी एकाच लोकलने प्रवास करतील.

‘कर्करोग निदानासाठी आरोग्य केंद्रे सक्षम हवीत’मुंबई : कर्करोगाचे निदान वेळीच होण्यासाठी सरकार अनेक पातळ्यांवर प्रयत्नशील...
30/08/2024

‘कर्करोग निदानासाठी आरोग्य केंद्रे सक्षम हवीत’

मुंबई : कर्करोगाचे निदान वेळीच होण्यासाठी सरकार अनेक पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. कर्करोगाची प्राथमिक लक्षणे जाणवल्यानंतर रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचार घेत असल्याने आजाराचे वेळेत निदान होण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. रुग्ण मोठ्या रुग्णालयात जाईपर्यंत त्याचा आजार अखेरच्या टप्प्यात पोहोचलेला असतो. त्यामुळे वेळीच निदानासाठी देशातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करण्याची गरज असल्याचे मत कर्करोग तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कर्करोग पूर्णत: बरा होऊ शकतो. मात्र त्याचे वेळीच निदान होणे गरजेचे आहे. कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी त्याचे वेळीच निदान होणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी देशातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करण्याची आवश्यकता आहे. प्राथमिक स्तरावर कर्करोग झाल्याचे लक्षात आल्यावर हा आजार तीन ते चार आठवडे लवकर बरा होण्याची शक्यता असल्यासे टाटा रुग्णालयाचे माजी संचालक डॉ. अनिल डिक्रूझ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
कर्करोग देखभाल केंद्र
दुर्मीळ कर्करोगाचे जवळपास २०० प्रकार आहेत. कर्करोगाच्या एक लाख रुग्णांपैकी सहा रुग्णांना असा कर्करोग होतो. यात प्रामुख्याने सार्कोमा, त्वचेचा कर्करोग, गरोदरपणातील कर्करोग, अनुवांशिक कर्करोग, न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर्स अशा विविध प्रकारच्या कर्करोगांचा समावेश आहे. कर्करोगांचे निदान प्राथमिक स्तरावर झाल्यास रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करणे अधिक सोपे असते. यासाठी युरोप व आशियात या दुर्मीळ कर्करोगांवर उपचार करण्यासाठी अधिकाधिक कर्करोग देखभाल केंद्र सुरू करण्याची युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजीचा विचार सुरू असल्याचे ज्येष्ठ कर्करोग तज्ज्ञ डॉ. ज्योती वाजपेयी यांनी सांगितले.

धारावीतील ११ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्णमुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पात झोपडीवासीयांचे सर्वेक्षण करण्यास राजकीय ...
30/08/2024

धारावीतील ११ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पात झोपडीवासीयांचे सर्वेक्षण करण्यास राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला असला तरी धारावी पुनर्विकास प्रकल्प कंपनीमार्फत आतापर्यंत ११ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. धारावीत मागील सर्वेक्षणानुसार साधारणत: ६१ हजार तळमजल्यावरील झोपड्या असून त्यावरील दोन मजली झोपड्या गृहित धरल्या तर साधारणत: सव्वा लाख झोपड्यांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. तळमजल्यावरील झोपड्यांचे धारावीतच तर उर्वरित झोपड्यांचे धारावीबाहेर पुनर्वसन करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प कंपनीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक झोपडी व त्यातील रहिवाशांचे चार टप्प्यांत सर्वेक्षण केले जात आहे. पहिल्या टप्प्यात सर्वेक्षण करणारे पथक गल्लीत जाऊन ध्वनिचित्रीकरण करीत आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक झोपडीला विशेष क्रमांक दिला जात आहे. तळ व वरील मजल्यांवरील झोपड्यांनाही क्रमांक दिला जात आहे. तिसऱ्या टप्प्यात लायडर ड्रोन या पद्धतीचा वापर करून प्रत्येक झोपडीची थ्री-डी प्रतिमा काढली जात आहे. त्यानंतर चौथ्या टप्प्यात प्रत्यक्ष कागदपत्रे तपासली जात आहेत. ही कागदपत्रे अपलोड करून झोपडीधारकाची सही आणि ठसे घेतले जात आहेत. या सर्व प्रक्रियेवर धारावी पुनर्विकास प्रकल्प कंपनीचे तहसीलदार पर्यवेक्षण करीत आहेत. त्यामुळे धारावीतील सर्वच झोपड्यांचे सर्वेक्षण होणार आहे. त्यानंतर ही सर्व माहिती संकलित करून २००० पर्यंतच्या झोपड्यांना मोफत तर २०११ पर्यंतच्या झोपड्यांना सशुल्क घर धारावीतच दिले जाणार आहे. उर्वरित सर्व झोपड्यांना भाडेतत्त्वावरील घरे धारावीबाहेर दिली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. घर कुठे द्यायचे याचा सर्वस्वी निर्णय शासन घेणार असल्याचेही या सूत्रांनी सांगितले. सर्वेक्षणाला झोपडीवासीयांकडून पाठिंबा मिळत आहे. हे सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करण्याचा कंपनीचा मानस असल्याचेही सांगण्यात आले.
धारावीत मोकळा भूखंड नसल्यामुळे यापैकी काही झोपडीधारकांसाठी धारावीबाहेर संक्रमण शिबिरेही बांधावी लागणार आहेत. रेल्वेचा भूखंड धारावी पुनर्विकास प्रकल्प कंपनीच्या ताब्यात आला असून त्यावर पुनर्वसनाची घरे बांधण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. त्यासाठी धारावीचा बृहद्आराखडा तयार केला जात आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार असल्याचेही या सूत्रांनी सांगितले. धारावी ही केवळ निवासी नव्हे तर औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे निवासी सदनिकांबरोबरच अनिवासी सदनिकाही उभारल्या जाणार आहेत. व्यावसायिक सदनिकाधारकांना २२५ चौरस फुटांपर्यंतचे क्षेत्रफळ मोफत तर त्यावरील क्षेत्रफळ हे सवलतीच्या दरात दिले जाणार आहे. प्रदूषण न करणाऱ्या सर्व पात्र उद्योगधंद्यांचे धारावीतच पुनर्वसन केले जाणार असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.

29/08/2024

Address

Thane West

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dainik Jan Khulasa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dainik Jan Khulasa:

Share