PassBook Aanandache

PassBook Aanandache Its Special Diwali Magazine to Bank Workers

दरवर्षी ११ नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो, जो भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझा...
11/11/2024

दरवर्षी ११ नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो, जो भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांना समर्पित आहे. शिक्षणाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या दिवशी शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदाची थीम "Building a Brighter Tomorrow Through Education: Transforming India through Education" आहे.
शिक्षण हे माणसाचे जीवन अधिक सुखी करण्यासाठी आहे, कारण ते जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यास मदत करते. मात्र शिक्षण म्हणजे शालेय वर्गात जाऊन घेतलेले ज्ञान एवढे मर्यादित नाही.
शाळेच्या अभ्यासक्रमाबाहेरही वाचन महत्त्वाचे आहे. अवांतर वाचन म्हणजे केवळ छंद म्हणून केलेले वाचन, जे जीवनाच्या विविध पैलूंचे ज्ञान मिळवण्यास मदत करते. कादंब-या, कथा, नाटक यासारख्या साहित्यकृतींमधून मानवी जीवनाचे, संस्कृतीचे, आचारधर्माचे दर्शन होते. अशा वाचनामुळे विचारांची स्पष्टता आणि भाषेवरील प्रभुत्व प्राप्त होते. साहित्यिकांच्या जीवनातील संघर्ष आणि यशाच्या कहाण्या वाचल्यामुळे प्रेरणा मिळते आणि जीवनाच्या दृष्टिकोनात बदल घडतो.

अवांतर वाचनाने समृद्ध होणारे अनुभव मनाशी जोडले जातात, जे दीर्घकाळ लक्षात राहतात. हे वाचन केवळ ज्ञानच वाढवते असे नाही, तर स्वतःच्या विचारांची दिशा सुधरवते. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण दिनी *"सर्व विद्यार्थ्यांना"* वाचनाची गोडी लागावी आणि शिक्षणाचे खरे स्वरूप समजून प्रत्येकाने जीवनात यश मिळवावे ही सदिच्छा 🙏

Image credit - LatestLY

07/11/2024
02/11/2024

व्यास क्रिएशन्सच्या तिन्ही अंकांचे आपल्या सारख्या ऊत्तम श्रोत्यांच्या समोर,मान्यवरांच्या (पद्मश्री नयना आपटे, आनंद भाटे, आर्या आंबेकर आणि संकर्षण कऱ्हाडे) हस्ते, नव्याने पुन्हा प्रकाशन झाले. त्यातील ही छोटीशी clip माझ्या फेसबुक मित्र परिवारासाठी

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
31/10/2024

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळी अंक आणि मराठी माणूस यांचे नाते शंभर वर्षांपासून कायम आहे. एका हातात फराळाची बशी आणि दुसऱ्या हातात दिवाळी अंक, हा ...
30/10/2024

दिवाळी अंक आणि मराठी माणूस यांचे नाते शंभर वर्षांपासून कायम आहे.
एका हातात फराळाची बशी आणि दुसऱ्या हातात दिवाळी अंक, हा मराठी माणसाचा आनंदाचा क्षण होता.
आजही दर्जेदार दिवाळी अंकांची परंपरा जिवंत आहे. स्पर्धेच्या, फोल दाखवेगिरीच्या आणि virtual युगात; ही सच्ची मासिके विविध विषय, उपक्रम राबवत वाचन संस्कृतीला रुजविण्याचा, टिकविण्याचा स्तुत्य हेतू उरी बाळगून कार्यरत आहेत.
अभिजात माय मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने मराठीचे वैभव, आपल्या संस्कृतीचा मानबिंदू "दिवाळी अंक" वाचावेत, अगदी विकत घेऊन वाचावे; दुसऱ्या भेट द्यावे हीच प्रार्थना!
अभिमान मराठी, गौरव मराठी!!

यंदा व्यास क्रिएशन्सचे तिन्ही अंक "प्रतिभा दिवाळी अंक, आरोग्यम आणि पासबुक आनंदाचे" आपल्यासमोर मांडताना माझा उर अभिमानाने आणि आनंदाने भरून आले आहे.
खास आपल्यासारख्या चोखंदळ वाचक स्नेहींसाठी.....

*बँकर्स साहित्यिकांनो लिहिते व्हा!!*  *व्यास क्रिएशन्स्* प्रकाशन संस्थेचा प्रतिवर्षी बँकिंग विषयाला वाहिलेला *पासबुक आनं...
14/09/2022

*बँकर्स साहित्यिकांनो लिहिते व्हा!!*

*व्यास क्रिएशन्स्* प्रकाशन संस्थेचा प्रतिवर्षी बँकिंग विषयाला वाहिलेला *पासबुक आनंदाचे* हा दिवाळी वार्षिकांक प्रकाशित होत असतो. यंदा या अंकाचे *दहावे वर्ष* आहे. यंदा *पैसा – उत्क्रांती ते वित्तव्यवस्था* असा विशेषांकाचा विषय आहे. पैसा हे जगण्याचे साधन आहे. *पैशाच्या उत्क्रांतीपासून* मुद्रा, चलन, नाणी, नोटा ते अगदी *प्लॅस्टिक मनीपर्यंतचा* प्रवास यात मांडण्यात येणार आहे. बँकेचे आजी माजी अधिकारी, अध्यक्ष, संचालक, कर्मचारी, शिपाई, बँकिंग विषयाचे लेखक अभ्यासक यांना यात सहभागी होता येईल. बँकेत काम करीत असताना पैसा या संकल्पनेत वेळोवेळी होत गेलेले बदल, नाणी, नोटा यांचे व्यवहार करताना, कॅश काऊंटर सांभाळताना आलेले *रंजक, विनोदी, हृदयस्पर्शी अनुभव, आठवणी,* किस्से, लिहून आम्हाला पाठवा!
हा अंक आपल्यातील सुप्त गुणांना वाव देणारा आहे.
तेव्हा लगेच उचला लेखणी आणि लिहून पाठवा भन्नाट, अफलातून किस्से आणि अनुभव!
फक्त पैसा या विषयाला धरुनच! *मेल आयडी* [email protected]

अधिक माहितीसाठी संपर्क - *7030616622*

10/09/2022

Address

D-1 Samant Blocks Ghantali Devi Mandir Road Thane/W
Thane
400602

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when PassBook Aanandache posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PassBook Aanandache:

Share

Category