01/11/2023
।।आग्रहाचे निमंत्रण।।
कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे शाखेच्या प्रथमच डिजिटल स्वरूपात 'मालगुंड' दिवाळी अंक प्रकाशित होत आहे. अतिशय नाविन्यपूर्ण स्वरूपात ही अक्षर-दीपावली रसिक वाचकांच्या भेटीला येत आहे.
विविध विषयांवरील वैविध्यपूर्ण लेख, कथा, कवितांनी हा अंक समृद्ध झाला आहे. कोमसाप ठाणे शाखेचे अध्यक्ष मनोज वैद्य त्यांनी या अंकाचे संपादन केले आहे.
'मालगुंड' दिवाळी अंकाचे शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात मान्यवरांच्या हस्ते आणि रसिकांच्या उपस्थितीतीत प्रकाशन होत आहे.
यावेळी कोमसाप चे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त आणि ज्येष्ठ साहित्यिक संदीप माळवी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किरण नाकती, ज्येष्ठ आरोग्यतज्ज्ञ डॉ. मेधा मेहेंदळे उपस्थित राहतील.
यावेळी 'हॅशटॅग पाऊस' हा पावसावरील कविता, गाणी आणि नृत्याविष्काराचा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विनोद पितळे, डॉ. प्रतीक्षा बोर्डे, गणेश गावखडकर, पंकज पाडाळे आणि नृत्यांगना यांचा त्यात सहभाग असेल.
सर्व रसिक वाचक आणि साहित्यिकांनी या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन संपादक मनोज वैद्य यांनी केले आहे.
🙏🙏🙏