Rodij's News

Rodij's News News

टीएमटी मधीक सुट्ट्या पैशावरून होणारे वाद टाळणार ;  प्रवाशांना काढता येणार मोबाईल ॲपद्वारे तिकीट * मुख्यमंत्री एकनाथ शिंद...
14/10/2024

टीएमटी मधीक सुट्ट्या पैशावरून होणारे वाद टाळणार ; प्रवाशांना काढता येणार मोबाईल ॲपद्वारे तिकीट
* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले 'माझी टीएमटी' या मोबाईल ॲपचे लोकार्पण
* प्रवाशांना बसचे ठिकाण तसेच ती किती वेळात स्टॉप वर येणार हे जाणून घेण्याची सुविधा*

ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या प्रवाशांना विविध सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या 'माझी टीएमटी' (Mazi TMT) या मोबाईल ॲपचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या ॲपमुळे प्रवाशांना यूपीआयद्वारे डिजिटल तिकिट काढण्याची सुविधा मिळणार आहे. सध्या ही सुविधा काही बसमार्गावर सुरू करण्यात आली आहे. ती टप्प्याटप्प्याने टीएमटीच्या सर्व बसमार्गांवर प्रवाशांना वापरता येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (११ ऑक्टोबर २०२४) धर्मवीर आनंद दिघे वाचनालय आणि अभ्यासिकेचे लोकार्पण केले. त्याच ठिकाणी ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या 'माझी टीएमटी' (Mazi TMT) या मोबाईल ॲपचेही लोकार्पण करण्यात आले. या मोबाईल ॲपद्वारे तिकिट काढण्याची पद्धत, बसमधील वाहकाकडून त्याचे केले जाणारे व्हेरिफिकेशन याचा डेमो याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहिला. प्रवाशांसाठी ही चांगली सुविधा असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. यावेळी, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
या मोबाईल ॲपद्वारे प्रवाशांना यूपीआय वापरून डिजिटल तिकिट काढता येईल. तसेच, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बॅंकिंगचा वापर करून पैसे भरता येतील. त्याचप्रमाणे, प्रवाशांना बस कोठे आणि किती वेळेत स्टॉपवर येणार याची माहिती देण्याची सुविधाही या ॲपमध्ये आहे. प्रवाशांना ॲपवर प्रवासाच्या सुरुवातीचे ठिकाण आणि गंतव्य स्थान यांची माहिती भरून बसमार्ग, त्या मार्गावरील उपलब्ध बसगाड्या, त्यासाठी लागणारे तिकिट भाडे याचीही माहिती मिळणार आहे.
डिजिटल तिकिटांच्या व्यवस्थेमुळे वाहकांची रोख रक्कम हाताळण्याची संख्या कमी होईल आणि सुटे पैसे नसल्याने प्रवासी आणि वाहक यांच्यात होणारे वाद यामुळे टळतील, अशी अपेक्षाही टीएमटी व्यवस्थापनाला आहे. सध्या ॲपद्वारे तिकिटांची ही सुविधा काही बसमार्गावर सुरू करण्यात आली आहे. ती टप्प्याटप्प्याने टीएमटीच्या सर्व बसमार्गांवर प्रवाशांना वापरता येणार असल्याचे टीएमटी व्यवस्थापनाने सांगितले.
.....................................

स्वप्नातील घराचे स्वप्न साकार ; चावी आणि मंजुरी पत्रकाचे वाटपठाणे: प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत सन २०...
17/09/2024

स्वप्नातील घराचे स्वप्न साकार ; चावी आणि मंजुरी पत्रकाचे वाटप

ठाणे: प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत सन २०२४-२५ मधील मंजूर लाभार्थ्यांना मंजूरी पत्रांचे वितरण मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन, येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत सन २०२४-२५ मधील जिल्ह्यातील १४ मंजूर लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात घरकुल मंजूर पत्रक वितरण वितरण करण्यात आले तसेच प्रधानमंत्री आवास योजना टप्पा एक अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुल दोन लाभार्थ्यांना गृहप्रवेशाची चावी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत तीन लाभार्थी यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते चावी वाटप करून स्वप्नातील घराचे स्वप्न साकार होण्यास सुरुवात झाली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-१ अंतर्गत सन २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये आतापर्यंत पूर्ण झालेल्या दोन घरकुलांचे गृहप्रवेश करण्यात आले असून प्रशस्तीपत्र देऊन लाभार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी घरकुल बांधकाम करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली. ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे घरकुल वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन मार्गदर्शन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत २४-२५ करिता ७ हजार १४१ उद्दिष्ट प्राप्त झाले आहे त्यापैकी सद्यस्थितीला ३ हजार ५५६ लाभार्थींना मंजुरी देण्यात आली असून २ हजार ६०१ पहिला हप्ता वितरण करण्यासाठी FTO जनरेट करण्यात आलेले आहेत अशी माहिती प्रास्ताविक करताना प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे छायादेवी शिसोदे यांनी माहिती दिली.‌
यावेळी आयुक्त नगरपरिषद संचालनालय, नवी मुंबई मनोज रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी ठाणे संदीप माने, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन हरीश पाटील, मुख्याधिकारी कुळगाव बदलापूर मारुती गायकवाड,‌ अतिरिक्त मुख्य अधिकारी अंबरनाथ अभिषेक पराडकर, सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी सहायक प्रकल्प संचालक संतोष पांडे यांनी केले.‌.........

17/09/2024

ठामपा परिवहनच्या बसला आग ; वेळीच आग लागल्याचे लक्षात आल्याने मोठे अनर्थ टळले

ठाणे: येथील चेंदणी कोळीवाडा डेपो कडून दिवा खिडकाळी बस डेपोकडे निघालेल्या ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या MH 04 HY 7624 या प्रवासी बसला आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुंब्रा, किस्मत कॉलनी येथे समोर आली. यावेळी बसमध्ये सुमारे ९० ते १०० प्रवासी प्रवास करत होते. आग लागल्याची बाब वेळीच बसच्या वाहन व चालक या दोघांच्या लक्षात आल्याने त्यांनी बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बसमधून बाहेर उतरवले. त्यामुळे मोठे अनर्थ टळले. तर लागलेली आग अवघ्या दहा मिनिटांत नियंत्रणात आणण्यात ही यश आले. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
..........

बेस्ट बसच्या टायरला आग ; प्रवास करणारे 60 ते 65 प्रवासी सुखरूप * घोडबंदर रोडवरील घटना ठाणे: बृहन्मुंबई परिवहनच्या बसचे ल...
23/03/2024

बेस्ट बसच्या टायरला आग ; प्रवास करणारे 60 ते 65 प्रवासी सुखरूप
* घोडबंदर रोडवरील घटना
ठाणे: बृहन्मुंबई परिवहनच्या बसचे लायनर गरम होऊन टायरला आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील कासारवडवली सिग्नल जवळ घडली. जवळपास पाऊण तासांनी ती आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आले. याचदरम्यान बसमध्ये ६० ते ६५ प्रवाशी प्रवास करत होते, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
.................

मुंब्र्यातील आगीत 109 मीटर बॉक्स जळून खाक ; 300 ते 350 रहिवाश्यांना काढले सुरक्षित बाहेरठाणे: मुंब्रा येथील शिवाजी नगर य...
22/03/2024

मुंब्र्यातील आगीत 109 मीटर बॉक्स जळून खाक
; 300 ते 350 रहिवाश्यांना काढले सुरक्षित बाहेर

ठाणे: मुंब्रा येथील शिवाजी नगर या ठिकाणी असलेल्या तळ अधिक 5 मजली अमन हाईट्स या इमारतीच्या तळ मजल्यावरती मीटर रुमला आग लागल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास समोर आली. या आगीत इमारतीचे सर्वच म्हणजे 109 मीटर बॉक्स जळून खाक झाल्याने इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अंदाजे ३०० ते ३५० रहिवाश्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

पार्क केलेल्या ई-बाईकला आग; दोन वाहनांचे नुकसान ठाणे: कळव्यात ई-बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाल्याची घटना ताजी असताना, महागिर...
22/03/2024

पार्क केलेल्या ई-बाईकला आग; दोन वाहनांचे नुकसान

ठाणे: कळव्यात ई-बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाल्याची घटना ताजी असताना, महागिरी कोळीवाडा येथे पार्क केलेल्या ई-बाईकला आग लागल्याची घटना शुक्रवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास समोर आली. यामध्ये एक ई - बाईक पुर्णपणे जळून खाक झाली असून दुसऱ्या ई-बाईकची सीट जळून नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

आदिवासी बालकांची सातपुड्याहून उंच झेप…तुज पंख दिले देवानेकर विहार सामर्थ्यानेदरीडोंगर हिरवी रानेजा ओलांडून या सरिता - सा...
22/02/2024

आदिवासी बालकांची सातपुड्याहून उंच झेप…
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरीडोंगर हिरवी राने
जा ओलांडून या सरिता - सागरा

आदिवासी बालकांना “ आकाशी झेप घेण्याची ओढ “ निर्माण करण्याचा संदेश जणू आज खा डॉ श्रीकांत शिंदे यांनी आपल्या कृतीतून दिला..!

तर त्याचे झाले असे की माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या माध्यमातून एक उत्तम संवाद मेळावा सातपुडा पर्वत रांगेतील तापी आणि नर्मदेच्या खोऱ्यांच्या मध्ये असणाऱ्या धडगाव ( जि. नंदुरबार) येथे पार पडला..

या मेळाव्यात रखडलेली जवळपास सगळी कामे त्यांनी मार्गी लावली. काही दिवसांपासून अडकलेला ८ कोटींचा नगरपंचायतचा निधी देखील काही तासात मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून त्यांनी शासन निर्णयासह देऊनही टाकला..

ही त्यांची कामातली तत्परता एकीकडे; तर दुसरीकडे त्यांनी देशाचं भविष्य असणाऱ्या मुलांच्या डोळ्यातील चमक ओळखत त्यांची उंच झेप घेण्याची सुप्त इच्छा देखील पूर्ण केली..! धडगाव हे दुर्गम गाव, इथे हेलिकॉप्टर किंवा विमान हे डोक्यावरून जातानाच दिसते तेही क्वचित.. मग आता हेलिकॉप्टर गावात येणार म्हणून ते पाहायला काही आबाल वृद्ध - तरुण तर आलेलेच पण त्याहून जास्त मोठ्या प्रमाणावर आले होते ते म्हणजे शाळकरी मुले..

हेलिकॉप्टर पाहून आपण त्यातून आपला सुंदर गाव पहावा, आकाशात उंच पक्षांसारखे उडावे, घिरट्या घालाव्यात असे त्यांना वाटले असणारच.. ते त्यांच्या डोळांमधील स्वप्न टिपले खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांनी..! आणि मग काय घडली ही ऐतिहासिक हेलिकॉप्टर राईड..! हो ऐतिहासिक..! डोंगर दर्यात राबणाऱ्या कष्टकरी सामान्यांच्या मुलांच्या स्वप्नाना पंख देणारी..! उंच भरारी नभात..!

“डॉ श्रीकांत शिंदे यांच्या या संवेदनशीलेतेला सलाम..! काय अफाट माणूस आहे हा..!”
ही आजूबाजूची कुजबुज म्हणजे सर्वात मोठा पुरस्कार..! त्या उंच सातपुड्यासारखा..!

————————————

ठाणे महापालिका क्षेत्रातून ९०४ फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स काढण्यात आले*तात्पुरत्या बॅनरसाठी महापालिकेकडून परवानगी घेण्याच...
21/02/2024

ठाणे महापालिका क्षेत्रातून ९०४ फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स काढण्यात आले

*तात्पुरत्या बॅनरसाठी महापालिकेकडून परवानगी घेण्याचे आवाहन
*https://tmc.advertisepermission.in/ पोर्टल सुरू

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत दर बुधवारी अनधिकृत फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे काढण्याची कारवाई करण्यात येते. बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी स. ६ ते स. १० या वेळेत राबविण्यात आलेल्या विशेष कारवाई मोहिमेत महापालिका क्षेत्रातून ९०४ फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स काढण्यात आले.

ठाणे महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या प्रभाग समिती क्षेत्रात काही नागरिक परवानगी न घेता फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स लावतात. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते. यामुळे प्रत्येक बुधवारी हे फलक, पोस्टर्स हटविण्याबाबत विशेष मोहीम घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार, उपायुक्त (परिमंडळ), सर्व सहाय्यक आयुक्त यांच्यामार्फत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यात सर्वाधिक २६९ बॅनर्स, फ्लेक्स हे नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रातून हटविण्यात आले.

*तात्पुरत्या बॅनरसाठी घ्या परवानगी

ठाणे महापालिका क्षेत्रात प्रभाग समितीनिहाय, तात्पुरते बॅनर आणि पोस्टर लावण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, तात्परुते बॅनर, पोस्टर लावण्यासाठी एकूण २०४ जागा ठरविण्यात आल्या आहेत. महापालिकेची ऑनलाईन परवानगी घेऊन त्यानुसार भाडे भरल्यावर या जागांवर तीन दिवसांपर्यंत पोस्टर, बॅनर लावण्याची परवानगी मिळणार आहे. तात्पुरत्या जाहिरातींसाठी ८ बाय ६, ८ बाय ३ आणि ६ बाय ३ असे तीन प्रकार निर्धारित करण्यात आले असून त्यांच्यासाठी प्रती दिन, प्रती चौ. फूट १०० रुपये याप्रमाणे भाडे आकारले जाणार आहे. या जाहिरातींसाठी परवानगी घेण्यासाठी https://tmc.advertisepermission.in/या वेब पोर्टलवर अर्ज करता येईल. त्यात आवश्यक त्या जागा, फलकाचा आकार ही माहिती भरल्यानंतर किती भाडे भरावे लागेल याची माहिती येईल. त्यानुसार, ऑनलाईन भाडे भरल्यावर क्यू आर कोड तयार होईल. हा क्यू आर कोड तात्पुरत्या जाहिरातींवर लावणे बंधनकारक आहे.

*कारवाईची आकडेवारी

*प्रभाग समिती फ्लेक्स, बॅनर्सचा आकडा
1. नौपाडा -कोपरी २६९
2. वागळे - ७४
3. वर्तकनगर - ७५
4. लोकमान्य नगर-सावरकर नगर - १५०
5. माजिवडा -मानपाडा - ८०
6. उथळसर - ११
7. कळवा - ५०
8. दिवा - १२३
9. मुंब्रा - ७२
10. *एकूण - ९०४
=========

नाशिकच्या दोन वर्षीय चिमुकली "जानु "ला मिळाली दृष्टी ; जन्मजात दोन्ही डोळ्यात झालेल्या मोतीबिंदूवर ठाण्यात शस्त्रक्रियाठ...
09/02/2024

नाशिकच्या दोन वर्षीय चिमुकली "जानु "ला मिळाली दृष्टी ; जन्मजात दोन्ही डोळ्यात झालेल्या मोतीबिंदूवर ठाण्यात शस्त्रक्रिया

ठाणे : जन्मजात एक नाहीतर दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू असलेल्या नाशिक इगतपुरीच्या " जानु " या दोन वर्षीय चिमुकलीवर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात यशस्वी काही मिनिटांची लेझर शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. अशाप्रकारे अवघड शस्त्रक्रिया रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रथमच करून तिला दृष्टी मिळून दिली आहे. ठाणे जिल्हा रुग्णालयाची कीर्ती ऐकूण माळी कुटुंब आले होते. त्यांना येथील डॉक्टरांनी निराश होऊ न देता हसऱ्या चेहऱ्याने लाडक्या लेकीसोबत घरी लवकरच परतली. ही शस्त्रक्रिया करून जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे वारंवार नाके मुरडणाऱ्यांच्या डोळ्यात चांगलेच अंजन भरले गेले आहे. पुन्हा एकदा ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे गोरगरिबांसाठी वरदानदायी ठरत असल्याचे दिसत आहे.
नाशिक, इगतपुरी परिसरात राहणाऱ्या माळी कुटुंबातील जानु या दोन वर्षाच्या चिमुकलीला डोळ्यांनी नीट दिसत नव्हते. केवळ प्रकाशाची संवेदना तिला जाणवत होती. नाशिकात तीच्या डोळ्यांची तपासणी केल्यावर तिला मोतीबिंदू असल्याचे स्पष्ट झाले. सरकारी रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायची झाल्यास कुठे करावी असा प्रश्न तिच्या पालकांना होता. ठाणे सिव्हील रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया चांगली होत असल्याचे त्यांना समजले. मुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीच्या डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे चॅलेंज स्वीकारून ती शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. तसेच या शस्त्रक्रिया वेळेत करणे खूप गरजेचे असते. तर या शस्त्रक्रियेपूर्वी तिची शारीरिक तपासणी करून शस्त्रक्रियेच्या आठवडाभराने तिला घरी सोडण्यात आल्याची माहिती नेत्र सर्जन डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली. तर या शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे, डॉ.रुपाली यादव आणि केमाचारी यांनी परिश्रम घेतले...........

" ही शस्त्रक्रिया जरी काही मिनिटांची असली तरी रुग्णालयासाठी तितकीच चॅलेंजदायी होती. ती शस्त्रक्रिया यशस्वी होईल हा विश्वास होताच, ती पार पडली असून लवकर रुग्णाला घरी सोडण्यात येईल. ही शस्त्रक्रिया आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहेच. त्याचबरोबर त्या कुटुंबाचा चेहऱ्यावरील हास्य ही तितकेच महत्वाचे आहे."- डॉ कैलाश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे.
....

06/02/2024

सीगल पक्षाला जीवदान; महापालिका कर्मचाऱ्याचे धाडस

ठाणे: पंखात मांजा अडकल्याने कोपरी पूर्व येथून वाहणाऱ्या ठाणे खाडीच्या पाण्यात पडलेल्या ब्लॅक हेडेड सीगल पक्षाला जीवदान मिळाले. हे जीवदान ठाणे महापालिकेचे कर्मचारी आणि पक्षीप्रेमी भारत मोरे यांच्या धाडसाने मिळाले असून त्यांनी खाडीत पोहत जाऊन त्या पक्षाला सुखरूप बाहेर काढले. मोरे यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत, त्या पक्षाला पाण्यातून बाहेर काढले तसेच त्याला मुक्तसंचारासाठी सोडून दिले आहे. काही दिवसांपूर्वी कावळ्याच्या पायात मांजा अडकल्याने तो झाडाला लटलेला होता. त्या कावळ्याला ठामपा अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका करत जीवदान दिले आहे. .............

ठाण्यातील ११ विद्यार्थीनींकडूनकर्तव्यपथावर नृत्य सादर ; मुद्रा आर्ट अकादमीचा गौरवठाणे  : देशाच्या प्रजासत्ताकदिनी कर्तव्...
01/02/2024

ठाण्यातील ११ विद्यार्थीनींकडून
कर्तव्यपथावर नृत्य सादर ; मुद्रा आर्ट अकादमीचा गौरव

ठाणे : देशाच्या प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर झालेल्या संचलनामध्ये ठाण्यातील मुद्रा आर्ट अकादमीच्या ११ मुलींना नृत्य सादर करण्याचा बहुमान मिळाला. या मुलींवर कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांनी ठाण्याचे नाव उंचावले असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरवर्षी प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी सर्व राज्यांना आर. डी. परेड, वंदे भारत नृत्य उत्सव आणि चित्ररथाच्या सादरीकरणासाठी नवी दिल्लीत बोलाविले जाते. राज्यातील अव्वल कलाकारांना हा मान दिला जातो. यंदाच्या वर्षी `विकसित भारत आणि भारत लोकतंत्र की मातृ' हा विषय सादरीकरणासाठी ठेवण्यात आला होता. त्यानुसार सांस्कृतिक संचालनालयामार्फत ५० कलाकारांसह कर्तव्यपथावर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये ठाण्यातील मुद्रा आर्ट अकादमीतील ११ विद्यार्थीनींची सादरीकरणासाठी निवड केली होती.

या विद्यार्थीनींना सांस्कृतिक विविधता आणि लष्करी पराक्रमाचे दर्शन घडविणारी शास्त्रीय नृत्य सादर करावयाची होती. त्यानुसार मुद्रा आर्ट अकादमीतील आकांक्षा मिराशी, अनुजा काळसेकर, धर्मी रमानी, मेहेक मालदे, प्रक्षिका घोडके, साक्षी वाडजे, भुमिका म्हसकर, साक्षी वेंगुर्लेकर, शर्वरी सावंत, मनिषा राय, निती परसिया आदी ११ जणींची निवड झाली. त्यांना मुद्रा आर्ट अकादमीच्या संचालिका तेजश्री सावंत, भवानी पर्फिर्मिंग आर्टचे अमय पाटील यांनी शास्त्रीय नृत्य, भरतनाट्यम आणि लोकनृत्याचे प्रशिक्षण दिले होते. त्यानुसार त्यांनी कर्तव्य पथावर नृत्य सादर करून वाहवा मिळवली..............

Address

GB Road
Thane

Telephone

+919869448391

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rodij's News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rodij's News:

Share